Posts

Showing posts from October, 2019

पंचतारांकित

Image
पंचतारांकित - प्रिया तेंडुलकर सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची कन्या - प्रिया तेंडुलकर. परंतु याहीपलीकडे तिने स्वतःची ओळख निर्माण केली ललितलेखन करणारी अभिनेत्री म्हणून. चित्रकला, मॉडेलिंग, 5 स्टार हॉटेल मधली receptionist आणि अभिनेत्री असा प्रवास करताना स्वतःचं घडत गेलेलं व्यक्तिमत्त्व तिने 'पंचतारांकित' मध्ये शब्दबद्ध केलेलं आहे. वडिल विजय तेंडुलकर हे प्रियाचे सर्वात जवळचे मित्र. वडिलांनी दिलेलं प्रोत्साहन, प्रत्येक कामात त्यांचा असलेला पाठिंबा, त्यांनी वेळोवेळी केलेले उपदेश तिच्या प्रत्येक लिखाणात जाणवतात. प्रिया तिच्या मित्रासोबत वेश्यावस्तीतून सोडवून आणलेल्या २ बाल वेश्यांची कहाणी सांगते, ती खरंच हृदय पिळवटणारी आहे. एका पंचतारांकित हॉटेल मध्ये receptionist च काम करताना आलेले कटू-गोड अनुभव खूप छान वर्णन केले आहेत. अशा हॉटेल्स मध्ये काम करणाऱ्या बायका या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवलेल्या शोभेच्या बाहुल्या असतात. कधी कधी त्यांना शरीर विक्रीसाठी भाग पाडलं जातं, कधी त्या स्वतः त्या क्षेत्रात उतरतात, परिस्थितीमुळे म्हणा. यात बरेच हात गुंतलेले असतात...

MANORAMA TELL ME WHY : October 2019

Image
MANORAMA TELL ME WHY Knowledge Magazine For Children October 2019 🔹 Volume 13 🔹 No.: 10 This issue is about the kingdoms of ancient India, several smaller and larger kingdoms like below - Nanda, Mauryan, Shaka, Kushana, Pandya, Chera, Chola, Satvahana, Gupta, Samudragupta, Vakataka, Ikshvaku, Kadamba, Ganga, Pallava, Vardhana, Rajput, Chalukya, Rashtrakuta, Seuna, Yadava, Kakatiya, Hoyasala, Bahmani, Vijayanagara, Maratha, Sikh Delhi Sultanate like - Khalji, Tughlaq, Sayyid, Lodi, Mughal This issue is about powerful and influential rulers and their glorious rule, conquests and invasions, power struggles, splendid victories and fatal failures. This will answer you all your questions regarding all ancient dianasties. Who ruled various regions of Indian subcontinent that unified to form our country as we know it today? Which dianasties shaped the history, culture and heritage of our homeland? Which were the prominent empires that took birth in India? Overall this is...

गोफ - गौरी देशपांडे

Image
गोफ - गौरी देशपांडे हळुवार गुंफत जाणारा गोफ. एकमेकांत गुंफत जाताना गाठ बसण्याची शक्यता अधिक. पण अलगत गुंफत जाणारा हा गोफ तसाच अलगद सोडवता यायला हवा, ती खरी कला. सासू - सुनेच्या नात्यातला हा गोफ लेखिका लीलया विणत गेली आहे. कथेतली २ महत्वाची पात्रं माँ(सासू) आणि वसुमती (सून), या दोघींच्या बाजूने उभं राहून आपण विचार करायला लागतो. या दोघींच्या आजूबाजूच्या पत्रांनाही या दोघींच्या गोफात गुंतवायला लागतो. गौरी देशपांडे च कोणतंही पुस्तक घ्या, तिचं लिखाण डोक्यात शिरणे कठीण. अचानक कोणतं पात्रं कसं कथेत शिरेल नाही सांगू शकत नाही. आपण विचार करतो, काय हे अचानक? परंतु कथा जशी पुढे सरकत तेव्हा हा गोफ उलगडत जातो. कथेतले मला भावलेले काही परिच्छेद मी इथे देत आहे - "पण एकाएकी पोटातून वाटलं, की मुले किती आईबापांना चकवतात! अगदी अनाथाश्रमातच टाकून नाही दिले मुलांना, तर कसलेही दुष्ट आईबापसुद्धा एखाददुसरा तरी मायेचा कण आपल्या बरक्याश्या पोरावर फेकतातच. आणि ते सारे कण चोखून घेत मुले 'मोठी' होतात. आणि तिथेच तर सारा घोटाळा माजतो. थोर होऊन तोंडास तोंड देणाऱ्या, आपल्याइतक्या उं...

विकास

Image
विकास सगळं पटतंय, सगळं कळतंय, पण वळत काहीच नाहीये. नक्की काय वळून घ्यायचं तेच कळत नाहीये. . . निसर्ग पण हवा आहे, दळणवळणाची साधनं पण हवी आहेत, विकास पण हवा आहे. पण या विकासापायी आपण आपल्याच मुळावर घाला घालत आहोत काय? याला जबाबदार कोण? गावाकडील वाढते विकेंद्रीकरण आणि शहराकडील लोकसंख्येचे होणारे केंद्रीकरण..??! ही लोकसंख्या शहराकडे का वाढावी? उद्योगधंदा / नोकरी.. आमच्या गावाकडे येणारे उद्योगधंदे आम्हीच आंदोलनं करून हाकलवून लावत आहोत आणि शहराकडे पळत आहोत. या शहरांत परप्रांतीय बनून राहात आहोत... नाही का आम्ही 'परप्रांतीय'? एक प्रांत सोडून दुसऱ्या प्रांतात राहायला गेलो की दुसऱ्या प्रांतासाठी आपण परप्रांतीय च की. कोणी या पिढीत गाव सोडून आलंय, कोणी एक - दोन पिढ्या पूर्वी.. हे सगळेच परप्रांतीय! आणि त्या दुसऱ्या प्रांतात आपल्याच सुखसोयीनसाठी विकास केला की परत आपणच विरोध करायचा, हे कसं वाटतंय??! सगळ्याला विरोध! विरोधाला विरोध! मग कसा उपाय काढायचा? असच चेंगराचेंगरी त मरायचं का?? नाहीतर सगळ्याच आपल्यासारख्या परप्रांतीयांनी आपापल्याला गावात जायचं?! तिथेच उद्योग शोधा, ...