आज रविवार. आज मस्त आराम करायचा..
आज रविवार. आज मस्त आराम करायचा.. ... असं शनिवारीच ठरवलं होतं. तो रविवारची पहाट उजाडलीच ती हवेत गारठा घेऊन. मस्त त्या दुलई तुन अंग बाहेर निघत नव्हतं. पण बहिणीला काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं, त्यामुळे तिला सोडायला मला उठणं क्रमप्राप्त होतं. असो, तीला सोडून आल्यावर पुन्हा रजईत शिरायचं असं ठरवून बाहेर पडले. बाहेर जमीन ओली दिसली, अरे एवढं दव पडलंय?? मग लक्षात आलं, दवबिंदू नाही पावसाची रिपरिप आहे ती. 🤦 पण थंडी जशी हवी तशीच 🤗🌨️ घरी येताना वर्तमानपत्र घेऊन आले, नेहमी त्या tv/ मोबाईल वर बातम्या वाचून/पाहून कंटाळा आला होता. गॅलरी समोर बसून, इत्यंभूत पेपर वाचत, हातातल्या ऊन ऊन चहाचा घोट रिचवत रविवार सकाळची सुरुवात झाली 😍 तासा - दीड तासाने बहिणीचा इच्छित स्थळी पोहोचल्याचा कॉल येईलच तेवढ्यात एक झोप काढून घेऊ म्हणून पुन्हा रजई गुंडाळून घेतली. पण म्हणतात ना, गाढवाला ओझं वाहायची एवढी सवय झालेली असते की एखाद्या दिवशी ओझं कमी झालेल असेल तरी त्याला त्रास होतो 😅 तशी परिस्थिती आहे माझी 😜 जरा स्वस्थ बसलं की कामांची लिस्ट डोळ्यांसमोर दिसायला लागते. घरातली कामं करायला रविवारच तर मिळतो. प...