सोलापूर ट्रिप २०२२
सोलापूर ट्रिप २०२२ ~ प्रस्तावना ~ Lockdown च्या आधी म्हणजे मार्च २०१९ मध्ये आम्ही सोलापूर ला जाऊन आलो होतो. त्यावेळी काही धावत्या भेटी झाल्या होत्या त्या अश्या - अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट चा राजवाडा / शस्त्रागार, तुळजापूर मंदिर, नळदुर्ग, सिद्धरामेश्वर मंदिर आणि सोलापूर भुईकोट . उन्हाळा असल्याने तेव्हा नळदुर्ग चा नर-मादी धबधबा पाहता आला नव्हता. आणि सोलापूर च्या भुईकोटात आम्ही उशिरा पोहोचलो त्यामुळे बाहेरचं गार्डन बघून परतलो होतो. तेव्हा ज्या दिवशी आम्ही सोलापूर हुन परतलो त्यानंतर एका आठवड्यात पहिला lockdown लागला होता 😨 नंतर Lockdown चालू असताना वाटलं होतं हा corona कधीच संपणार नाही आणि आयुष्य असं घरात बसूनच वाया जातंय की काय 😂 तब्बल २-३ वर्षांनी पूर्ण lockdown उठला आणि आम्हाला वेध लागले पुढील फॅमिली ट्रिप चे 🤩 Lockdown नंतर पहिली कोणती ट्रिप करायची असा विचार चालूच होता. आमच्या आत्येला अचानक स्वामी समर्थांच्या भेटीचे वेध लागतात 😀 म्हटलं चला lockdown नंतर ची पहिली ट्रिप स्वामी समर्थांकडून च सुरू करू. अक्कलकोट ला गेलं की जवळच तुळजापूर ला जाऊन कुलस्वामिनी आई तुळजाभवान...