माया

माया Compulsory bed rest म्हटल्यावर घरात काही काम करण्याचा प्रश्नच उरत नव्हता. मी स्वतः आता कुठे जेवण बनवायला शिकलेय, त्यामुळे किर्ती कडून चपात्या वगैरे बनवण्याची अपेक्षा करणं तर दूरची गोष्ट 🙊 आई-वडिलांनी केलेल्या लाडाचे दुष्परिणाम आता आम्हा दोघींना भोगावे लागणार आहेत, हे कळून आम्ही चुकलेलो होतो 😧 आता खरी शोधमोहीम सुरू होणार होती - mission कामवाली बाई 💃 शेजारीपाजारी, society committee members सगळ्यांना आधीच whatsapp messages धाडून मोकळी झाले होते - urgently in need of housemaid. 🙏 तरीही लवकरात लवकर घरी पोहोचणं गरजेचं होतं, नाही म्हटलं तरी दुसर्याच्या शोध मोहिमेवर किती अवलंबून राहणार. Discharge मिळताच काही दिवसात; मी सर काका, आत्ये, काकी, किर्ती, सुजल अशा सगळ्या लवाजम्या सकट घरी पोहोचले. बाई कशी शोधायची यावर आमच्यात बरीच खलबत सुरू झाली. आत्ये आणि कीर्ती ने तर ठरवलं होतं, समोर येईल त्या स्त्री ला विचारायचं - "तुमच्याकडे बाई येते का कामाला??! " 😑 जवळच आदिवासी पाडे आहेत, तिथे जाऊन विचारून यायचं का असा पण विचार मांडला गेला. सुदैवाने दुसऱ...