माया

माया



Compulsory bed rest म्हटल्यावर घरात काही काम करण्याचा प्रश्नच उरत नव्हता. मी स्वतः आता कुठे जेवण बनवायला शिकलेय, त्यामुळे किर्ती कडून चपात्या वगैरे बनवण्याची अपेक्षा करणं तर दूरची गोष्ट 🙊 
आई-वडिलांनी केलेल्या लाडाचे दुष्परिणाम आता आम्हा दोघींना भोगावे लागणार आहेत, हे कळून आम्ही चुकलेलो होतो 😧 आता खरी शोधमोहीम सुरू होणार होती - mission कामवाली बाई 💃

शेजारीपाजारी, society committee members सगळ्यांना आधीच whatsapp messages धाडून मोकळी झाले होते - urgently in need of housemaid. 🙏
तरीही लवकरात लवकर घरी पोहोचणं गरजेचं होतं, नाही म्हटलं तरी दुसर्याच्या शोध मोहिमेवर किती अवलंबून राहणार. Discharge मिळताच काही दिवसात; मी सर काका, आत्ये, काकी, किर्ती, सुजल अशा सगळ्या लवाजम्या सकट घरी पोहोचले.
बाई कशी शोधायची यावर आमच्यात बरीच खलबत सुरू झाली. 
आत्ये आणि कीर्ती ने तर ठरवलं होतं, समोर येईल त्या स्त्री ला विचारायचं - "तुमच्याकडे बाई येते का कामाला??! " 😑
जवळच आदिवासी पाडे आहेत, तिथे जाऊन विचारून यायचं का असा पण विचार मांडला गेला.

सुदैवाने दुसऱ्या दिवशी शेजारीण (#1) तब्येतीची विचारपूस करायला आली - "उद्या सकाळी एक बाई येईल घरातली कामं करायला. आगरी आहे पण शाकाहारी जेवण पण बनवून देईल. गरीब आहे. लेकाला पोद्दार English medium ला घातलंय तिने. त्यामुळे त्याच्या शिक्षणाच्या खर्चासाठी दिवसभर काम करते सगळीकडे."
कोणत्या जातीची असावी याबद्दल प्रश्न नव्हताच आम्हाला. आम्हाला बाई मिळाली होती. घरात आनंदी आनंद सुरू झाला आणि मला, नोकर मिळाल्यावर देव मिळल्यागत आनंदी झाल्याचा गोविंदा चा movie Hero No. 1 समोर दिसायला लागला 😝

मग अनुभवी उपदेश सुरू झाले - कामवाल्या बायका कशा असतात. त्यांना कसं आधीच दमात ठेवायचं, त्यांचे जास्त लाड नाही करायचे पण सोडून जाणार नाही एवढी काळजी घ्यायची, वगैरे, वगैरे. आग्री आहे म्हणजे Nonveg खायला पुन्हा सुरू केलंस तर मस्त मासे पण बनवून देईल ती, अशी स्वप्न पण रंगवून झाली.. 

अखेर तो दिवस उजाडला आणि आमच्या घरात 'माया' आली ☺

बुटकी, सावळी साडी नेसलेली, हसतमुख चेहरा.
ती आल्यावर घरातल्या समस्त बायकांनी अक्षरशः तिच्यावर धाड घातली. बावरूनच गेली बिचारी.
डाळ/आमटी बनवशील ना, आता जास्त लोकं आहेत म्हणून नाहीतर नंतर कमी चपात्या बनवाव्या लागतील, भाजी कमी तिखट आणि पथ्याच्या, अशा एक ना एक हजार प्रश्नांचा भडिमार तिच्यावर आत्येने सुरू केला आणि ती बिचारी गोड हसूूून सगळ्याला 'हो' म्ह्नत होती.
शेवटी कीर्ती आणि सुजल आत्येला kitchen च्या बाहेर  ओढत घेऊन आल्या, त्या शिवाय माया ला काम सुरू करणं शक्य च नव्हतं. मी आणि सर काका मस्त मजा बघत होतो 😁

माया तशी लगेच रुळली. स्वतःहून माझ्या खाण्या-पिण्याची काळजी घ्यायला लागली. मासे खाणं तब्येतीसाठी साठी कसं चांगलं आहे ते पटवून देत होती 😊 मग मी म्हटलं - "गेली बरेच वर्ष nonveg खाणं बंद केलंय पण जेव्हा
खायला सुरू करेन तेव्हा तुम्ही बनवलेलं फिश फ्राय पाहिलं खाईन 😀 तुम्ही आगरी आहात म्हणजे मस्त fish बनवत असाल.."
ती एकदम ओशाळल्यागत झाली. मला कळेना काय झालं तशी बोलते - "आम्ही आग्री नाही, आदिवासी आहोत. इथल्या जवळच्या पाड्या वरच राहतो."
मलाच वाईट वाटलं, बिचारी माझ्यामुळे दुखावली तर गेली नाही ना, मी लगेच म्हटलं - "अरे मग चांगलंच आहे. तुमच्या पद्धतीच veg/nonveg सगळं आवडेल आपल्याला. खाण्यासाठी जन्म आपुला".
तशी पुन्हा गोड हसली 😊 माया आहेच तशी, स्वतःच्या नावासारखी 'मायाळू' ☺

एके दिवशी अडीच एक वर्षाच्या मुलाला घेऊन आली. गपचूप घरातल्या खुर्ची वर त्याला बसवून kitchen मध्ये कामाला लागली. मी विचारलं - तुमचा लेक का? तर हो बोलली. एक सावळसं गोंडस बाळ माझ्या समोर शांतपणे बसलेलं होतं. नाव काय - तर गोड आवाजात उत्तर आलं "संयोग" 😍  
2 chocolates, cream biscuit आणि एक लाडू आणून समोर ठेवला तरी संयोग शांत. माया ला म्हटलं - "अत्यंत देवमाणूस आहे लेक तुमचा. Generally याच्या वयाची लहान पोरं दुसर्याच्या घरात गेली की football सारखी उडत असतात. आणि हा माणूस बघ किती समजूतदार.." माया पुन्हा गोड हसली. Like Mother, like son. 
 थोड्या वेळाने पाहिलं तर लाडू थोडा खाल्लेला होता आणि बाकी सगळं संपलं होतं 😁 मला विचारतो - "आई ला देऊ लाडू? तिला आवडतो." त्याला म्हटलं - "तुझ्या आईला देते दुसरा लाडू, तू खा हा" मग तसा खुश होऊन खाल्ला लाडू.
एवढ्या लहान वयात sharing चं महत्व कळतंय त्याला👍.
😘 त्याच्यासाठी computer वर youtube वर poems/rhymes लावल्या. या पठ्याच्या त्या पण पाठ 😮 मायाला विचारलं - "किती दिवस झाले याला jr. Kg च्या वर्गात बसून?"
माया - "3 महिने"
घरात शिक्षणाच background नसून एवढी प्रगती??!!👍
"खूप हुशार आहे लेक तुझा माया" ☺
मग संयोग comfortable झाला आणि त्याच्या पाड्यावरच्या (मराठी आणि आदिवासी mix भाषेत) गप्पा सुरु झाल्या. काही कळत नसलं तरी मजा वाटत होती ऐकायला. बरेचसे आदिवासी शब्द कळत नव्हते, काहींचे अर्थ अध्ये मध्ये माया सांगत होती पण मी आणि कीर्ती भान हरपून त्याच्या गोष्टी ऐकत होतो, अगदी गोपीकेनी मुरलीधराचा पावा ऐकावा तसंच 😍

काही दिवसानंतर अचानक माझी तब्येत परत down झाली. सगळे गावी परत गेलेले असल्याने किर्ती एकटीच माझ्या दिमतीला होती. नेहमीप्रमाणे सकाळीच माया आली, मी दिसत नाही बघून कीर्ती ला विचारते - "मोठया ताई कुठे गेल्या?"
किर्ती - "ताई झोपली आहे bedroom मध्ये. कालपासून बरं वाटत नाहीये तिला"
तडकाफडकी डॉक्टर कडे जाणं शक्य नसल्याने मी आराम करत होते, माया आलीच न राहवून.
माया - "खूपच बरं वाटत नाहीये का ताई तुम्हाला?"
मी - "हो अगं, डॉक्टर बोलले आराम कर म्हणून झोपलेय"
ती लगेच पाठ, हात-पाय चेपायला लागली. आई ची आठवण आली मला..
खरंच, कुठे तुझे उपकार फेडू गो बाय माया.....

२-३ दिवसांनी अंथरूण सोडून पुन्हा मला २ पायांवर उभं राहिलेलं पाहिल्यावर माया तोंडभरून हसली 😀
म्हणते - "आता कसं ताई तुम्हाला बघून बरं वाटतंय"
मी - "हो तुझा हातगुण" 😁
माया - "आमच्याकडे आदिवासी बायका एक प्रकारच्या मातीचा लेप लावतात. काहीही दुखत असेल तर लगेच बरं होत. एक कीडा असतो , तो ती माती तयार करतो"
मी घाबरले, म्हटलं आधी माझ्या डॉक्टर ला विचारावं लागेल.. तशी म्हणते - "तुमचा डॉक्टर काय असे उपाय करायला देणार हाय व्हय" 
तिच्या या reaction वर हसून पुरेवाट झाली माझी..

एके संध्याकाळी शेजारीण (#२) आली तब्येतपाणी आणि इतर चौकशा करायला 😋
"कैसी है वो बाई? काम करती है ना बराबर??"
मी - "अरे हा, बहोत help हो रही है उसकी"
शेजारीण - "पहले वो इतना नाटक कर रही थी. Time नही है. मुझसे नही होगा इतना काम. ऐसें excuse दे रही थी.
फिर हम सब ने decide किया था की हम सब मिलके आपके लिये खाना बनायेगे 1-2 महिने के लिये"

यावर हसावं की रडावं तेच कळेना मला 😯

शेजारीण - "हम सब लोग इतना समझा रहे थे
उसको के तुम्हारी तब्येत ठीक नाही है, जरूरत है कामवाली की. पर वो मान ही नही रही थी. पर पता नही क्या हुआ अचानक, काम करने राजी हो गयी वो"...

दुसऱ्या दिवशी माया ला विचारलंच मी, कशा काय काम करायला तयार झालात?
माया - "माहीत नाही पण असं वाटलं की तुम्हाला मदतीची खूप गरज आहे म्हणून तयार झाले मी. असं आतून वाटलं..."
......
.
आणि पुन्हा एकदा मला तो प्रत्यय आला..
..
आई - बाबांना कळतंय की त्यांच्या दोन्ही लेकींना आता त्यांची नितांत गरज आहे..
आणि त्या 'मायेपोटी' त्यांनी या 'माया' ला पाठवलीये......

- सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर