Posts

Showing posts from August, 2018

रोज, काहीतरी नवं

(क्रमशः) ०० लग्न करायचं?? का? लग्न करायचं,... ते इच्छा अपेक्षांचं ओझं एकमेकांवर लादयचं, आयुष्यभर.. त्या अपेक्षा आणि संशयांमध्ये मारुन टाकायचं एकमेकांना.. लग्न करायचं म्हणे.. लग्न करून पुन्हा एक नवीन जीव जन्माला घालायचा? का? त्या जीवाला सुद्धा या यातना सहन करायला? त्या जीवाला जन्माला घालायचं; दुःख हाल अपेष्टा टक्के टोमणे सहन करायला? पुन्हा मनुष्ययोनीत जन्माला घालायचं त्या नवीन जीवाला? ०० कधी पाहिलाय, काही घटकांचा खेळ.. मी पाहिलाय.. काही घटकांचं आयुष्य मोजताना पाहिलंय.. काही क्षणांत आयुष्य बदलताना पाहिलंय.. माणसंही बदलताना पाहिलीयेत, काही क्षणांत.. काही क्षणांत आयुष्य संपताना पाहिलंय.. तुम्ही पाहिलाय..., असा.... काही क्षणांचा खेळ..... ०० हाच तो क्षण. या क्षणाला तू श्वास घेतेय, कदाचित याच क्षणी दुसरीकडे कोणीतरी शेवटचा श्वास घेत असेल. तर, आता आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची तक्रार करणं सोडून दे. हा क्षण आनंदानं जगून घे.. कदाचित हा क्षण शेवटचा असेल.. कदाचित तुझा.. कदाचित माझा.. ०० ती रडतेय, म्हणे माझी मुलगी 8 महिन्याची असताना गेली, माझ्या लेकाला बही...

भिन्न - कविता महाजन

Image
भिन्न - कविता महाजन 'एड्स' हा गाभा, या गाभ्याभोवती फिरणाऱ्या 'भिन्न' व्यक्तिरेखांच्या नजरेतून साकारलेली ही कादंबरी. भिन्न वाचून मन सुन्न नाही झालं तर नवल. एड्स या आजाराविषयी आधीच एवढे समज-गैरसमज आहेत, कि या बद्दल खुलेपणाने चर्चा होणं दूरची गोष्ट. २००५ च्या आकडेवारीनुसार जगात आजपर्यंत एकूण ३ कोटी ८६ लाख HIV ग्रस्त आहेत, आणि २८ लाख लोक एड्स ने मरण पावले आहेत. ही आकडेवारी आटोक्यात आणण्यासाठी एकमेव उपाय आहे, समाज प्रबोधन आणि HIV ग्रस्त रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचं आहे. HIV च्या प्रसारणाचं मूळ जातं वेश्या आणि तृतीयपंथीयांकडे त्यामुळे साहजिकच समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन एकूणच वाईट आहे. पण खरंच त्यांना या आजाराविषयी काहीच माहित नाहीये का, का ही लोकं आपल्यासारखे चांगली कामं करून पोट भरू शकत नाहीत, याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण लेखिकेने या कादंबरीत केलेलं आहे. कादंबरी वाचून झाली कि आपोआप समाजाच्या या घटकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. वेश्या असोत, तृतीयपंथीय असोत, समलिंगी संबंध ठेवणारे असोत, drug addict असोत... त्यांच्य...

विंचूर्णी चे धडे - गौरी देशपांडे

Image
विंचूर्णी चे धडे - गौरी देशपांडे विंचूर्णी - फलटण, साताऱ्याच्या जवळील एक छोटंसं गाव. माळरान असल्याने विंचू खूप, म्हणून तसं नाव. लेखिकेची बहीण- मेहुणे तिथे राहायला असल्याने ती सुद्धा तिथे एक छोटंसं घर बांधते. आणि हळू हळू मांजर, कुत्रे, मेंढ्या, छोटे मोठे प्राणी यांच्यासोबत, नवरा, मुलं, नातवंड, पावणे - रावळे सांभाळत; विंचूर्णी - पुणे - मुंबई - हॉंगकॉंग प्रवास, तसेच लेखन काम सांभाळत; लेखिका तिथलीच एक होऊन जाते.  विंचूर्णी ला राहायला असताना, घरातली/बाहेरची काम करायला येणाऱ्या तिथल्या गावातीलच व्यक्ती आणि वल्लींच्या कथा/व्यक्तिरेखा या पुस्तकात वाचायला मिळतात.  मला खास आवडलेल्या व्यक्तिरेखा - बॉन्स बिलाबॉंग, गोरखची गोष्ट, नानींची नवलकथा, आणि बाकी पण सगळ्याच ☺️ पुस्तकांत अध्ये-मध्ये असलेली रेखाचित्रे कथेला खास उठाव आणतात. गौरी देशपांडे च्या इतर पुस्तकांपेक्षा हे एक वेगळ्या पठडीत बसतं, आणि कदाचित याचं लेखन आयुष्याच्या पन्नाशीत वगैरे केलेलं असावं. पुस्तक वाचताना, लेखिकेने तिथल्या गावात बदल घडवून आणण्यासाठी केलेले छोटे - छोटे प्रयत्न, in general सरकारी...