रोज, काहीतरी नवं

(क्रमशः)

००

लग्न करायचं??
का?

लग्न करायचं,...
ते इच्छा अपेक्षांचं ओझं एकमेकांवर लादयचं, आयुष्यभर..

त्या अपेक्षा आणि संशयांमध्ये मारुन टाकायचं एकमेकांना..
लग्न करायचं म्हणे..

लग्न करून पुन्हा एक नवीन जीव जन्माला घालायचा?
का?
त्या जीवाला सुद्धा या यातना सहन करायला?
त्या जीवाला जन्माला घालायचं; दुःख हाल अपेष्टा टक्के टोमणे सहन करायला?
पुन्हा मनुष्ययोनीत जन्माला घालायचं त्या नवीन जीवाला?

००

कधी पाहिलाय, काही घटकांचा खेळ..
मी पाहिलाय..
काही घटकांचं आयुष्य मोजताना पाहिलंय..
काही क्षणांत आयुष्य बदलताना पाहिलंय..
माणसंही बदलताना पाहिलीयेत, काही क्षणांत..
काही क्षणांत आयुष्य संपताना पाहिलंय..
तुम्ही पाहिलाय...,
असा....
काही क्षणांचा खेळ.....

००

हाच तो क्षण.
या क्षणाला तू श्वास घेतेय, कदाचित याच क्षणी दुसरीकडे कोणीतरी शेवटचा श्वास घेत असेल.
तर, आता आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची तक्रार करणं सोडून दे.
हा क्षण आनंदानं जगून घे..
कदाचित हा क्षण शेवटचा असेल..
कदाचित तुझा..
कदाचित माझा..

००

ती रडतेय, म्हणे माझी मुलगी 8 महिन्याची असताना गेली, माझ्या लेकाला बहीण नाही आज रक्षाबंधन ला राखी बांधायला.
म्हटलं बाई,..
जगात अशी लोकं आहेत, ज्यांना मूल होऊ शकत नाही. तुला एक मुलगा तरी आहे पदरात??!
अशी लोकं आहेत, ज्यांचं लग्न ठरत नाही, तुझा नवरा तरी तुझ्यासोबत आहे.
अशी लोकं आहेत, ज्यांचे आई-वडील नाहीत. तुझा हक्काच्या माहेरी तुझे लाड-कोड करायला आई वडील तरी आहेत.
तू खूप श्रीमंत आहेस गो बाई, नशीब लागतं त्यासाठी..
(तशी गपचूप उठून कामाला लागली..)

०००

रडतेयस..
रड, रड, रडून घे.. खूप रडून घे.. डोळ्यांत अश्रू आहेत तोपर्यंत तरी..
खूप त्रास होतो नंतर.. एकदा अश्रू कायमचे सुकून गेले की..
माझ्यासारखे...


००

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर