Posts

Showing posts from October, 2018

आयुष्यात काय कमावलं?

Image
"किशोर घुडे यांची मोठी लेक बोलतेय का? sorry हा, तुमचा आवाजच नाही ओळखला मी." "sorry काय त्यात, तेवढं रंगाचं काम..." "रंगाचं काम होऊन जाईल, साफ-सफाई पण सगळी करून ठेवतो, तुम्ही येण्या अगोदर" "पैशांचं कसं करू सांगा, कोणाकडे transfer करायचे.." "पैशांचं काय घेऊन बसलात. तुमच्या आई बाबांशी खूप चांगले संबंध होते आमचे, तुम्ही आल्यावर बघू, कामाचं काही टेन्शन घेऊ नका, ते सगळं करतो मी.." काय बोलावं पुढे तेही सुचेना मला. आई-वडिलांची पुण्याई म्हणजे काय याची पदोपदी जाणीव होतेय हल्ली. आई बोलायची, माणसं ओळखायला शिक, नेहमी चांगली माणसं जोडावी. बाबा माझे सरळ माणूस, त्यामुळे कोणालाही जवळ करायचे. अनावधानाने वाईट माणसांना जवळ करून बरेच 'चांगले' अनुभव आले आम्हाला, तो विषय वेगळा 😣 पण आई - बाबांनी बरीच माणसं जोडली. कधी विचित्र वागलेच तर आई बडबडायची - "आई-वडिलांनी जेवढं कमवलंय ते टिकवायचं आणि वाढवायचं बघा" आता त्याचा अर्थ समजायला लागलाय. आता कोणी येऊन बोललं - "तुमच्या आई-वडिलांचे खूप उपकार आहेत आमच्यावर, खूप मदत केली त्य

गणेश चतुर्थी २०१८

Image
या माणसाने आमचा जीव टांगणीला लावला होता, गणेश आगमनाच्या दिवशी, चतुर्थी ला.. संयोग - मायाचा लेक. १२-सप्टेंबर-२०१८ माया नेहमीप्रमाणे सकाळी आली कामाला माझ्याकडे.  माया ची कामं आटोपेपर्यंत नेहमी खेळत राहणारा तिचा लेक आज गपचूप खुर्चीत बसून झोपलेला बघून आश्चर्य वाटलं, तिला विचारलं तर कळलं ताप येतोय. मग माझंच अंथरूण घालून दिलं त्याला, झोपलं लेकरू. १३-सप्टेंबर-२०१८ सुट्टी नव्हती आम्हाला ऑफिस मधून त्यामुळे रत्नागिरी न जाता गणेशोत्सव इथेच होता, म्हटलं माया आली तर बाकी कामं आटोपेल, मी मोदक करायला घेईन. पण ११ वाजले तरी काही तिचा मागमूस नाही, वाटलं लेकाला बरं नाहीये म्हणजे येणार नाही बहुतेक. आता तब्येतीचं कारण काढून उपयोग नव्हता, खायला हवं तर आचारी बनायची तयारी हवी 😀  डाळ - भात - बटाट्याची भाजी केली आणि मोदकाची तयारी सुरू केली. तेवढ्यात माया लेकाला घेऊन दारात हजर. म्हणते तुम्ही आवरलं का सगळं, संयोग ला बरं नाही तर सकाळीच dr कडे जाऊन आले. आता माझं काम आटोपलं होतं, पण बाकीच्या घरात जायचं होतं, लेकाला बरं नसताना कुठे घेऊन फिरणार म्हणून दिवसभर संयोग ची baby sitting माझ्याकडे, म्हटलं येईल