आयुष्यात काय कमावलं?
"किशोर घुडे यांची मोठी लेक बोलतेय का? sorry हा, तुमचा आवाजच नाही ओळखला मी."
"sorry काय त्यात, तेवढं रंगाचं काम..."
"रंगाचं काम होऊन जाईल, साफ-सफाई पण सगळी करून ठेवतो, तुम्ही येण्या अगोदर"
"पैशांचं कसं करू सांगा, कोणाकडे transfer करायचे.."
"पैशांचं काय घेऊन बसलात. तुमच्या आई बाबांशी खूप चांगले संबंध होते आमचे, तुम्ही आल्यावर बघू, कामाचं काही टेन्शन घेऊ नका, ते सगळं करतो मी.."
काय बोलावं पुढे तेही सुचेना मला. आई-वडिलांची पुण्याई म्हणजे काय याची पदोपदी जाणीव होतेय हल्ली.
आई बोलायची, माणसं ओळखायला शिक, नेहमी चांगली माणसं जोडावी. बाबा माझे सरळ माणूस, त्यामुळे कोणालाही जवळ करायचे. अनावधानाने वाईट माणसांना जवळ करून बरेच 'चांगले' अनुभव आले आम्हाला, तो विषय वेगळा 😣
पण आई - बाबांनी बरीच माणसं जोडली.
कधी विचित्र वागलेच तर आई बडबडायची - "आई-वडिलांनी जेवढं कमवलंय ते टिकवायचं आणि वाढवायचं बघा"
आता त्याचा अर्थ समजायला लागलाय.
आता कोणी येऊन बोललं - "तुमच्या आई-वडिलांचे खूप उपकार आहेत आमच्यावर, खूप मदत केली त्यांनी आम्हाला"
तेव्हा लक्षात येतं - 'काय कमावलं आयुष्यात - 'चांगली' माणसं कमवली'
Comments
Post a Comment