विकास
(वरील photo Flavours Restaurant, Ratnagiri येथील आहे)
आपण किती भले मोठे शब्द वापरत असतो. विकसनशील भारत, देशाचा विकास, वगैरे वैगैरे..
परंतु हे सगळं करताना, आपण समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चाललोय का??
∆१४-नोव्हेंबर-२०१८∆
माया लेकाला-संयोग ला घेऊन सकाळी आली घरात कामाला. संयोग शाळेच्या गणवेशात नव्हता. म्हटलं "काय ग, आज colourful day आहे काय ग शाळेत?"
माया - "काय तरी बाल दिन आहे म्हणे, त्यासाठी"
<काय तरी बाल दिन>??!! 🙄😑
तिला विचारलं - "तुम्हाला महित आहे, बाल दिन काय आहे?"
"माहित नाय, संयोग ला शाळेत नवीन कपडे घालून यायला सांगितलंय.."
तिला तरी काय बोलणार म्हणा.. आदिवासी पाड्यातली पोरं शाळेत जायला लागली हीच मोठी गोष्ट आहे..
.
.
समोरच्या idot box वर आरक्षणावरून गदारोळ चाललेला दिसतोय.
आणि कीर्ती माझी तंद्री भंग करायला विचारतेय -
"खरं आरक्षण तर या आदिवासी लोकांना मिळायला हवं ना ताई??!"
मी - "....."
∆पुन्हा एकदा अशीच घाई गडबडीची सकाळ∆
सकाळी tv वर बातम्या सुरू केल्या शिवाय माझा दिवस सुरू होत नाही. काम करताना बातम्या ऐकत माया मला बरेच प्रश्न विचारून शंका समाधान करून घेत असते स्वतःचं. त्या दिवशी "पुतळे" आणि "समृद्धी महामार्ग" यावरून बातम्या चालू होत्या.
माया - "मोदी हे सगळं जे बांधून देणार आहेत तर त्यांच्या जमिनीचे पैसे देतील ना तिथल्या लोकांना??"
मी - "हो देतील ना, त्यांच्या account मध्ये 🤐.."
माया - "आम्ही पण इथल्या जमिनी builder ला विकल्या थोडे पैसे मिळाले"
ती हसत बोलली खरी पण बिचारीला काय माहीत builders नि या लोकांना थुकपट्टी लावून मिळवलेल्या जमिनीतून करोडोची प्रॉपर्टी कमवली आणि त्यातल्याच एका जमिनीच्या तुकड्याचे लाखो रुपये देऊन मी राहतेय...
०९-ऑगस्ट-२०१८
बातमी झळकली - आज आदिवासी दिवस.
आधी कधी या गोष्टींचा विचार नव्हता केला, पण पालघरवासिय झाल्यापासून, पाड्यांमधून फिरून इथल्या लोकांना जवळून पाहायला लागल्यापासून खूप कौतुक वाटायला लागलंय मला☺️
माया चपात्या लाटत होती, तिला बोलले - "माया, आज आदिवासी दिन आहे 😃"
मीच एवढी excited होते, माझा उत्साह बघून तिने मंद स्मित केलं आणि तिचा लगेच पुढचा प्रश्न -
"त्याने काय होतं? 🤔"
हम्मम्म, त्याने काय होणार???!!!! 🙍🙎🙍🙎

Comments
Post a Comment