Posts

Showing posts from September, 2019

The Breadwinner

Image
The Breadwinner by  Deborah Ellis मराठी अनुवाद : अपर्णा वेलणकर Breadwinner - a person who earns money to support their family, typically the sole one. कुटुंबाचा पोशिंदा "... आता तू माझी बेटी पण आहेस आणि बेटा पण, परवाना." - अब्बु तालिबान्यांनी अफगाण काबीज केल्यानंतर, हजारो विस्थापित कुटुंबांपैकी एका कुटुंबातील एक मुलगी - परवाना. सर्वत्र स्त्रियांवर बंधने असताना, ११ वर्षांची लहान मुलगी; केस कापून, मुलांचे कपडे घालून, कमावून आणून स्वतःच्या कुटुंबाला सांभाळणारी. वय वाढलं तरी तिचं शरीर खुरटंच. तालिबान्यांच्या नजरेला खुपेल असं अजून काहीच शरीरावर उभारलं नव्हतं; त्यामुळे बाई असूनही परवाना रस्त्यावर पाऊल ठेवण्याचा गुन्हा करू शकत होती... तालिबानी हे मूळचे अफगाणच. पण देशाचा कारभार कसा करावा याबद्दल त्यांच्या स्वतःच्या काही विकृत कल्पना होत्या. 'तालिबान' या शब्दाचा खरा अर्थ 'धर्मचरणाचं अध्ययन करणारा विद्यार्थी'. धर्म माणसाला उन्नत होण्याची, अधिक चांगला माणूस होण्याची प्रेरणा देतो; दया, करुणा या भावना माणसांमध्ये निर्माण करतो. याउलट तालिबानी अल्लाचं...

जैतापूरची बत्ती - मधु मंगेश कर्णिक

Image
जैतापूरची बत्ती - मधु मंगेश कर्णिक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल या पुस्तकात लेखक श्री. कर्णिक यांनी; विचारपूर्वक, गंभीरपणे, व्यापक दृष्टिकोनातून, सकारात्मक खुल्या मनाने लिहिले आहे. त्यासाठी त्यांनी बराच अभ्यास केलेला दिसून येतो. भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांना भेटी देऊन त्याबद्दल सर्व बाजू मांडल्या आहेत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रकल्प नको म्हणणाऱ्यांमध्ये स्थानिक लोक व त्यांना मार्गदर्शन करणारे बाहेरचे म्हणजे प्रकल्पक्षेत्राच्या बाहेरचे लोक यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सरकार तर 'प्रकल्प उभारणारच' म्हणते आहे. वैज्ञानिक ही त्यांची सकारात्मक बाजू मांडताहेत. सामान्य माणूस मात्र यामध्ये गोंधळलेला आहे. त्याला चोवीस तास वीज हवी आहे. पण प्रदूषण, किरणोत्सर्ग याला तो घाबरतो आहे. खरे काय आणि खोटे काय याबद्दल तो संभ्रमित आहे. अणुऊर्जा प्रकल्पाची भीती जशी सर्वसामान्य कोकणवासीयांना; जैतापूर, माडबन, साखरी, नाटे येथील ग्रामस्थांना वाटत आहे तशी मला पण वाटते. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ मी खुद्द रत्नागिरीकर. जैतापूर आमच्यासाठी लांब नाही. पण आंदोलन सुरू झाल्यापासून social media वर जे ...