मेरे हमदम, मेरे हमराही

मेरे हमदम, मेरे हमराही, मेरे shoes; how much I missed you yesterday ☺️🤗👟



नेहमी shoes वापरायची एवढी सवय लागलेली आहे ना, एक दिवस दुसरी चप्पल घालायची म्हटलं तर जीवावर येतं. लोकल च्या गर्दीत तर shoes best. कोणाचा पाय जरी आपल्या पायावर पडला, दीड दीड तास उभ्याने प्रवास करायचं म्हटलं, एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर धावायचं म्हटलं तर shoes च उपयोगी पडतात नेहमी. पण ही सवय अशी वाईट लागलेली आहे की काल साडी नेसायची होती तर shoes कसे घालायचे हा परत प्रश्न पडला 🤔 'लोकं काय म्हणतील' असे मलाही प्रश्न पडतात 😋 कौतुक हिल्स घालून निघाले खरी पण आपल्याला काही अशा चप्पल घालून चालायची सवय नाही. रात्री घरी आल्यावर ठरवलं, झक मारत गेले सगळे, सरळ साडी नेसली तरी shoes घालायचे 😝 हसतील त्यांचे दात दिसतील 😁

खरं म्हणजे सगळ्या प्रकारच्या चपला घालायची सवय करून घ्यायला हवी खरी. कधी कुठे उपयोग होईल नाही सांगता येत. मागच्या महिन्यातलीच गोष्ट.

आमच्या ऑफिस मधल्या एका colleague च्या मुलीचं लग्न होतं. मी कधीच कोणाच्या लग्नाला जात नाही. पण reception घरा जवळ असल्याने जावं लागणारच होतं. लग्नाला वगैरे जाण्यासाठी ड्रेस आपल्याकडे नाहीयेत ही एक गोष्ट त्या निमित्ताने लक्षात आली, आणि त्यावर साजेसे चप्पल पण नाहीयेत 😑
ऑफिस आणि outing याशिवाय लागणारे वेगळे कपडे - चप्पल असावे खरे आपल्याकडे, असो.

एक चप्पल होत, म्हटलं असो हेच जाईल ड्रेस वर. ते चप्पल बरेच वर्ष वापरलं नसल्याने चालायची सवय नव्हती. शेवटी व्हायचं ते झालं, ट्रेन मधून स्टेशन ला उतरेपर्यंत एका चपलेचा sole निघाला. रात्री ०९.३० ची वेळ. विरार स्टेशन. या वेळेला मोची पण नव्हते तिथे.
आता काही खरं नाही. पूर्ण reception चप्पल हातात घेऊन फिरावं लागणार बहुतेक. तेवढ्यात बहिण बोलली, 'feviquick मिळतं का बघूया?'
माझं तर डोकच चालेनास झालं होतं. थांब बघू इथल्या दुकानात मिळतंय का. आणि ती गेली शोधायला. मी एका ठिकाणी उभी राहिली होते, तेवढ्यात बाजूला उभी असलेली एक मुलगी स्वतः बोलायला आली माझ्याशी - 'माझ्याकडे आहे feviquick, तुम्हाला देऊ का?'
मला अचानक कळलंच नाही, हिला कसं कळलं मला काय हवंय ते.
मी - 'माझी बहिण गेली आहे दुकानात ती आणेल, पण थँक्स तुम्ही offer केल्याबद्दल'
ती - 'तुम्हाला आता इथे काहीही नाही मिळणार. माझ्याकडे आहे ते घ्या. सॉरी मी थोडं वापरलंय.'
मी - 'अहो सॉरी काय, तुम्ही या क्षणाला मला मदत केलीत ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. जरा थांबा मी लगेच थोडंस वापरून परत देते तुम्हाला'
मी बाजूच्या ATM जवळ जाऊन sole चिकटवून घेतला, म्हटलं बहिण आलीच घेऊन तर नवीन आणलेलं feviquick या मुलीला देता येईल, नाहीतर हेच परत करेन. बहीण रिकाम्या हातानेच आली, त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे या वेळेला काही मिळणं शक्य नव्हतं.
बहीण - 'wow हे कुठे मिळालं तुला?'
मी - 'अगं बिचाऱ्या ह्या मुलीने दिलं..'
असं बोलून मी वळून बघतेय तर ती मुलगी निघून पण गेली होती 🙁
पुन्हा घरी पोहोचेपर्यंत आम्ही दोघी याच incident बद्दल बोलत होतो. कदाचित तिने आमचं बोलणं ऐकलं असेल आणि तिला माझी मदत करावीशी वाटलं असेल. माझी बहिण बोलली - 'कदाचित तू कोणाला मदत केली असशील त्याचीच परतफेड मिळाली असेल तुला'
God knows, पण खरंच अगदी देवासारखी माझ्या मदतीला आली ती पोरगी, एवढं नक्की.

ता. क. - shoerack मधल्या सगळ्या चपला अध्ये मध्ये वापरून पायांना सवय करून ठेवायची असं ठरवलेलं आहे आम्ही (आम्ही म्हणजे आम्ही स्वतः)😛
👞👟👠👡👢

~ सुप्रिया घुडे


Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर