Posts

Showing posts from June, 2020

Lockdown मधील पाककृती भाग २

Image
Lockdown मधील पाककृती भाग २  • सोयाबीन(chunks) बिर्याणी   • दडपे पोहे  • मलई पेढा  • मालपोहे  • भरलेलं कारलं  • अंडा खांडोळी (कोल्हापुरी street food) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~  • सोयाबीन(chunks) बिर्याणी  मी MTR चा हैद्राबादी बिर्याणी मसाला घेऊन ठेवलाय. कोणताही rice item करायचा म्हटला की १-२ चमचे यातला मसाला घातला की मस्त aroma येतो 🤤 पाणी उकळून घेऊन त्यात वाटीभर सोया chunks टाकले. थंड झाल्यावर पिळून घेऊन, पुन्हा एकदा थंड पाण्यातून काढून पिळून घेतले. त्यांना मीठ चोळून बाजूला ठेवले.  कांदा उभा चिरून तळून घेतला, त्यावर पण थोडं मीठ शिंपडून घेतलं. असा तळलेला कांदा बिर्याणी वर वरून भुरभुरवला  की मस्त चव येते. साधा कोलम rice कूकर ला लावून घेतला. आधीच हवं तेवढं मीठ टाकून घेतलं की मग बिर्याणी बनवताना मीठ वरून टाकायची गरज नाही भासत. एक चमचा तेल टाकलं की भात थोडा मोकळा पण होतो. कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, लाल सुकी मिरची, कढीपत्ता;  सुके मसाले ~ काळीमिरी, वेलची, दालचिनी, लवंग, दगडफुल (अजूनही कोणते घरात available असतील तर ते पण वापरण्यास हरकत नाही 😄); थोडे खलबत्त्यात कुटून घेतलेले;  हळद, मोहरी,