Lockdown मधील पाककृती भाग २
Lockdown मधील पाककृती भाग २
• सोयाबीन(chunks) बिर्याणी
• दडपे पोहे
• मलई पेढा
• मालपोहे
• भरलेलं कारलं
• अंडा खांडोळी (कोल्हापुरी street food)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
• सोयाबीन(chunks) बिर्याणी
मी MTR चा हैद्राबादी बिर्याणी मसाला घेऊन ठेवलाय. कोणताही rice item करायचा म्हटला की १-२ चमचे यातला मसाला घातला की मस्त aroma येतो 🤤
पाणी उकळून घेऊन त्यात वाटीभर सोया chunks टाकले. थंड झाल्यावर पिळून घेऊन, पुन्हा एकदा थंड पाण्यातून काढून पिळून घेतले. त्यांना मीठ चोळून बाजूला ठेवले.
कांदा उभा चिरून तळून घेतला, त्यावर पण थोडं मीठ शिंपडून घेतलं. असा तळलेला कांदा बिर्याणी वर वरून भुरभुरवला की मस्त चव येते.
साधा कोलम rice कूकर ला लावून घेतला. आधीच हवं तेवढं मीठ टाकून घेतलं की मग बिर्याणी बनवताना मीठ वरून टाकायची गरज नाही भासत. एक चमचा तेल टाकलं की भात थोडा मोकळा पण होतो.
कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, लाल सुकी मिरची, कढीपत्ता;
सुके मसाले ~ काळीमिरी, वेलची, दालचिनी, लवंग, दगडफुल (अजूनही कोणते घरात available असतील तर ते पण वापरण्यास हरकत नाही 😄); थोडे खलबत्त्यात कुटून घेतलेले;
हळद, मोहरी, जिरं, हिंग, ओवा, बडीशेप असा सगळा जिन्नस तेलावर परतून त्यात घरचा मसाला मग बिर्याणी मसाला घालून मिश्रण एकजीव करून घेतलं. यात सोयाबीन chunks टाकून मसाला मुरवून घेतला. आता हे मिश्रण आणि शिजलेला भात असा एक भांड्यात alternate layer करत, त्यात अध्ये मध्ये पुदिना-कोथिंबीर भुरभुरून बिर्याणी चा सेटअप करून घेतला 😃
३-४ मिनटं मोजून एकदा हा सेटअप गॅसवर ठेवून मुरू दिला. तळलेला कांदा सर्वांत वरती भुरभुरून बिर्याणी खाण्यासाठी तैय्यार 🤗
• दडपे पोहे
माझा बहिणीने तिच्या कराटे कॅम्प ची एक आठवण सांगितली, त्यांना एकदा नाश्त्याला दडपे पोहे दिले होते. आम्ही कधी हा पदार्थ घरात बनवला नव्हता. youtube वर निरनिराळ्या recipe मिळाल्या. तसा दोनदा संध्याकाळची न्याहारी म्हणून करून पाहिलं. थोडक्यात मला ती पोह्याची भेळ च वाटली 😀
एकदा बाजारात मिळतात ते जाड पोहे आणि दुसऱ्यांदा गावठी पोहे वापरून पाहिले. पोहे ताकात भिजवून ठेवायचे किंवा लिंबू पिळून घ्यायचं. परंतु माझं पर्सनल मत की लिंबाच्या रसापेक्षा ताकातल्या पोह्याची चव छान लागते.
ताकात भिजवलेल्या पोह्यात कांदा बारीक चिरून mix करून घेतला. मीठ टाकायची गरज नाही, ताकाचा आंबटपणा च पुरेसा असतो. आता या पोह्याला वरून फोडणी द्यायची.
फोडणीसाठी भांड्यात तेल गरम करून शेंगदाणे गुलाबीसर तळून घ्यायचे. त्यात हिंग, मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, किंचित हळद टाकायचं. गॅस बंद करून तडतडायचं बंद झालं की फोडणी पोह्यांवर टाकायची. मिक्स करून ताव मारायला सुरुवात करायची 😋
• मलई पेढा
lockdown मुळे एकसारखं बाहेर पडणं शक्य होत नाही, मग अर्धा एक लिटर extra दूध घरात ठेवावच लागतं. कधी दुधाचं पातेलं गरम करायचं, फ्रीज मध्ये ठेवायचं राहिलं तर ते फाटलं म्हणूनच समजा. foul smell (आंबटसर वास) येत नसेल तर पनीर बनवता येतं. त्यात अजून एक पदार्थ मिळाला ~ पेढा/लाडू.
तर असं नासलेलं दूध एक स्वच्छ कापडात गाळून घेऊन टांगून ठेवायच, काही तासांत छान पनीरचा गोळा तयार होतो.
एका पॅन मध्ये २-४ चमचे तूप टाकून त्यात मिल्क powder घोळवून घ्यायची. मी अर्ध्या लिटर च्या पनीर ला १० ग्राम ची Nestlé Milkpowder घेतली होती. जास्त गोड हवं असेल तर Milk Powder च प्रमाण वाढवू शकता. त्यात थोडं दूध add करायचं आणि मंद आचेवर ढवळत राहायचं. condensed milk तयार होतं. proper consistency झाली की त्यात बनवलेलं पनीर कुस्करून एकजीव करून घ्यायचं. लाडू अथवा पेढा बनवण्यासाठी जेवढ्या घट्ट मिश्रणाची आवश्यकता आहे तेवढं आटवायच. मिश्रण कोमट झालं की तुपाच्या हाताने छोटे छोटे गोळे वळून घ्यायचे. १-२ दिवसांत संपवायचे, दुधाचा पदार्थ असल्याने जास्त दिवस टिकत नाही.
• मालपोहे
पुन्हा हा एक संध्याकाळच्या न्याहारीचा जुगाड 😜
मालपोह्यांच्या बऱ्याच पाककृती इंटरनेट वर मिळतात, त्यातल्या त्यात सोपी, पटकन बनवून खाऊन कामाला बसता येईल अशी रेसिपी मी निवडली.
१ वाटी गव्हाचं पीठ(किंवा मैदा), १ वाटी रवा, अर्धी वाटी मावा/खवा (नसल्यास हरकत नाही) मिश्रण एकजीव करून घेतलं. त्यात थोडं थोडं दूध ओतत आंबोळी च batter इतकी consistency करून घेतली. खवा घातला नसेल तर २ चमचे साखर घालू शकता. अर्धा तास मिश्रण झाकून ठेवलं. पॅन मध्ये थोडं थोडं batter टाकून तुपात तळून घेतले. तुपातच तळावेत, चव छान लागते. सगळे मालपोहे एका ताटात घेतले. चार चमचे साखरेचा पाक बनवून तो मालपोह्यांवर ओतला. बेताचंच गोड हवं असल्यास साखरेचा पाक ऑपशनल आहे.
मालपोहे एका sitting मध्ये गट्टम 🤤😝
• भरलेलं कारलं
कारलं अजिबात आवडत नाही आम्हाला, परंतु आवडत नाही म्हणून मुद्दाम करून पाहायचं असा तो अट्टाहास. 😄
३ कारली होती. म्हटलं २ भरलेली करू आणि एक तळलेलं.
भरलेल्यांसाठी महत्वाचं म्हणजे सारण.
अर्धी वाटी शेंगदाणे, ५-६ पाकळ्या लसूण, थोडे तीळ, धने, हळद पॅनवर खरपूस भाजून घेतलं. यात खोबरं पण घालायचं, पण माझाकडंचे नारळ संपलेत म्हणून मी नाही घातलं. मग ही भाजणी कोथिंबीर आणि पुदिना घालून, मिक्सर वर जाडसर भरड पावडर बनवून घेतली. थोडं मीठ मिक्स करून घेतलं. असं हे सारं फ्रीज मध्ये ठेवलं की आठवडाभर आरामात पुरतं. या सारणात दोनदा २ कारल्यांचे भरलेला प्रकार केला.
एका कारल्याचे ३ भाग करून आतला मगज काढून टाकला. मग एक चिर पडून आतून मीठ हळद लावून चाळणीवर वाफवून घेतले. थंड झाल्यावर आतल्या भागात आगोळ(कोकम रस) चोपडून घेतला, म्हणजे कडूपणा पूर्णपणे जाईल 😋. मग आतमध्ये सारण भरून पॅनवर shallow fry केले. 😊
तिसऱ्या कारल्याची तळलेली काप करायला बरेच दिवस गेले, मग ते कारलं खराब झालं, आणि ती योजना बारगळली 😑
• अंडा खांडोळी (कोल्हापुरी street food)
मूळचे कोल्हापूर चे असलेले आमचे ex- colleague प्रविण यांचा एके दिवशी status पहिला. नाव आणि पदार्थ वेगळेच वाटले, म्हणून लगेच रेसिपी मागून घेतली.
तसं म्हटलं तर ब्रेड ऑम्लेट च हा, पण तुकडे केलेले म्हणून खांडोळी नाव असावं. थोडे माझे काही addition करून हा पदार्थ बनवला. पुन्हा... संध्याकाळचा नाश्ता 😀
पॅनवर तेल गरम करून अंड फोडून टाकलं. पिवळा बलक पसरवून घेतला. त्यावर बारीक चिरलेला कांदा - टोमॅटो evenly पसरवला. मीठ, हळद, लाल तिखट/मसाला भुरभुरला. ब्रेड च्या एका बाजूला butter लावून butter न लावलेली बाजू आम्लेट वर ठेवून दाबून घ्यायची, म्हणजे ब्रेड ला ऑम्लेट चिकटल पाहिजे. मग हे ब्रेड आम्लेट पालटून ब्रेड ची butter लावलेली बाजू खरपूस भाजून घेतली. पुन्हा यावर हवं असल्यास कांदा टोमॅटो टाकू शकता. मी cheese किसून वरून टाकलं. मग एका डिश मध्ये ठेवून थंड झाल्यावर तुकडे केले, वरून नायलॉन शेव भुरभुरवली. Hot & Sweet Tomato Ketchup सोबत मस्तच लागतं 😋🤤
हे थोडे वेगळे पदार्थ होते म्हणून यांच्या रेसिपी दिल्या. बाकी नेहमीच्या पदार्थांचे photos काढले होते ते असेच अपलोड करतेय 😊
मटार - पनीर
डाळ-खिचडी मग वरून तडका/फोडणी
Musk Melon Juice
Jeera Rice ~ Dal Tadka ~ Bhendi Fry ~ Salad
~ सुप्रिया घुडे
Khup mast recipes Supriya:-)
ReplyDelete😊🙏
Delete