जावे तिच्या वंशा ~ प्रिया तेंडुलकर
जावे तिच्या वंशा ~ प्रिया तेंडुलकर
Middle class किंवा upper middle class कथेच्या नायिकांभोवती रेंगाळणार्या कथा.
पहिली कथा आवडली, नंतरची २-३ प्रकरणं वाचल्यावर वाटायला लागलं कथा अर्धवट सोडलेल्या का वाटतायेत?! तरीही पुढच्या कथा वाचत राहिले.. एक ध्यानात आलं खरं.. कथा अर्धवट नाही सोडल्या आहेत, तिथूनच तर खरी कथेला सुरू होणार आहे.. प्रत्येक कथेच्या शेवटाला तो धागा तसाच मोकळा सोडलाय, वाचकांसाठी, विचार करायला.. खरं पाहिलं तर हाच realistic approach नाही का?!
नाहीतरी आपल्या आयुष्यातही आपली कथा चालतच तर आहे.. आपण जिवंत असेपर्यंत.. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तिपूरता तो धागा संपतो.. आपला धागा तर आयुष्यभर चालतच असतो..
मला या कथासंग्रह मधल्या ४ कथा खूप आवडला -
●मारियाची बहीण जेन
●नव्या कोऱ्या पांढऱ्या साडीचे एक टोक
●आई नावाची बाई
●मात
कथांच्या शेवटचे twist एकदम जबरदस्त आहेत.
Comments
Post a Comment