रामकथामाला

 रामकथामाला




College मधली गोष्ट. नेहाचा मित्र स्वप्निल, भेटला की greet करताना 'जय श्री राम' बोलायचा. छान वाटायच ते. Hi-Hello बोलणारी पिढी जेव्हा आपल्या आधीच्या पिढीचे संस्कार पुढे घेऊन चालते. मला भेटल्यावर पाहिलं वाक्य असायचं त्याचं - 'जय श्री राम घुडे साब' 😀 साब - साहेब 😁 मला या गोष्टीचीही मजा वाटायची ऐकताना 😄 पण झालं असं, मलाही या गोष्टीची अशी सवय लागली की तो भेटला की त्याच्या आधी मीच 'जय श्री राम' बोलून मोकळी व्हायचे 😄

म्हणजे बघा हा, सवय कशी लागते. अशाच सवयी आपण आपल्या पुढच्या पिढीला लावणं गरजेचं आहे, नाही का? 


सगळीकडे Marvel movies चे फॅन्स एवढे आहेत (जास्त का, मी ही त्यातलीच 😁). त्यातले काही characters पाहिले की लक्षात येतं, Americans ही त्यांच्या पुराण कथांमध्ये रमतात पण आपण आपल्या पुराण कथांचे दावे दिले की आपण बुरसट ठरतो. Thor, Odin, Loki, Bifrost हे cool पण त्याऐवजी आपण पवनदेव किंवा नारद अशी नावं घेतली तर लगेच समोरचा नाकं मुरडतो 😑


पुढील पिढीला तरी आपल्या Super Heroes ची ओळख करून देणं गरजेचं आहे. Recently Disney+Hotstar वर Legend Of Hanuman 13 Episodes ची series पहिली. खूप छान animated series आहे, लहान मुलांना आवडेल अशी, लहान च का, आम्हाला सुद्धा खूप आवडली 😋

1st Indian Superhero म्हणून मारुती ची ओळख व्हायला पुरेसं आहे. 😇


महत्वाचं म्हणजे त्यातला राम 😇 इतका शांत संयमी दाखवलाय, लहान मुलांना रामाच्या कथा दाखवणं खूप गरजेचं वाटतं अशा वेळी.. 


श्री राम...

रामाबद्दल किती बोललं, लिहिलं, सांगितलं, वाचलं तरी कमीच वाटतं.. परंतु हे शिवधनुष्य लीलया पेललंय दीपाली ताईनी - रामकथामाला मधून. 😊


आपण गूगल मध्ये एखादा keyword search करायला टाकतो आणि धडाधड त्या शब्दाशी निगडित सर्व काही आपल्या समोर येतं. तसंच काहीसं फीलिंग मला 'रामकथामाला' वाचताना आलं. सबकुछ राम. राम कुठे नाहीये? काव्य, वेद, पुराण, चित्र, शिल्प, नृत्य, लोककला, नाट्य, जगातल्या कानाकोपऱ्यात, अणूरेणुत राम आहे. आणि ज्यांनी रामाला सोडलं(काही मोजके देश), त्यांच्यात काही राम उरलेला नाही. 

असा हा अज्ञानाचा विनाश करणारा राम, असा हा ठायी ठायी वसलेला राम दाखवत दीपाली ताई संपूर्ण जगाची सफर घडवून आणतात. 

रामकथामाला हे माझ्यासाठी coffee table book नाहीच आहे, मी याला संदर्भ पुस्तिका म्हणेन. उद्या मला कोणत्या एका ठिकाणाला भेट द्यायची असेल तर आधी मी रामकथामाला उघडेन, त्या ठिकाणी रामाच्या संदर्भात काय माहिती मिळेल त्यासाठी.. 😊

मला यातली चित्र खूपच आवडली. वेळ मिळाला की ही चित्र काढून रंगवून पाहायचा माझा मानस आहे(बघू कधी वेळ मिळतोय, आधीच एक wall painting अर्धवट ठेवलंय 😣😒). 

बाकी राम भक्तांसाठी किंवा रामाच्या (माझ्यासारख्या) चाहत्यांसाठी हे पुस्तक वाचण्याची खूप छान पर्वणी आहे. ☺️👍

।। जय श्री राम ।।

🌺🌼🌺🌼🌺🌼🌺

तुका म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान । जीव निंबलोण उतरीन ।। 

🌺🌼🌺🌼🌺🌼🌺

~ सुप्रिया घुडे


Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर