Posts

Showing posts from November, 2021

Lockdown मधील पाककौशल्य भाग ८

Image
Lockdown मधील पाककौशल्य भाग ८ Cookpad India मराठी community तर्फे Lockdown मध्ये आयोजित केलेल्या "महाराष्ट्राचे किचन स्टार" स्पर्धे मध्ये मी भाग घेतला होता. आठ आठवडे online स्पर्धा चालली. प्रत्येक आठवड्याला एक challenge, प्रत्येक challenge मध्ये किमान २ पाककृती असं करत सगळे challenges complete केले आणि मेहनतीचं फळ म्हणून माझी TOP १० मध्ये निवड झाली. माझ्यासाठी ही नक्कीच खूप  मोठी गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला स्वयंपाकातलं काहीही येत नव्हतं ती महाराष्ट्रातल्या कानाकोपर्या त बनवले जाणारे सगळे पदार्थ करू शकली . या स्पर्धेत सादर केलेल्या सर्व पदार्थांचे फोटो आणि recipe link खाली देत आहे. महाराष्ट्र मधील विविध प्रांतातील पदार्थ ❇कोकण   🔱कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे. तांदूळ आणि नारळ हि कोकणातील महत्त्वाची पीकं ! त्यामुळे या दोन्हींचा कोकणी पदार्थात सढळ हस्ताने वापर होतो. तर अशा या दोन घटकांचा वापर करून मी बनवला आहे - नारळी भात. हा मुख्यत्वे श्रावणात नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधन ला बनवला जातो. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून, नारळ देऊन...