शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : १
शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : १ नेक्स्ट ट्रिप डेस्टिनेशन कोणतं बरं? मागच्या वेळी अक्कलकोट ला जाताना श्री. सौरभ मिरजकर यांनी सर काकांना कडगंची ला भेट देण्यास सुचवले होते. त्या नंतर त्यांनीच सुचवलं कि कोकणातून शेगाव ला एक ट्रेन जाते. मग काय, आमच्या नेक्स्ट ट्रिप च डेस्टिनेशन फिक्स झालं. रजू आत्ये म्हणते त्या प्रमाणे, दत्तभक्त आपोआप एकमेकांना भेटतात. तसंच होतय गेले ३ वर्षं.. दत्त संप्रदायातील भक्त एकमेकांना दत्तगुरूंच्या दर्शनाचा मार्ग दाखवतायेत.. आणि मग सुरु झालाय दत्त भक्तांचा प्रवास एकत्र.. सद्गुरुंच्या भेटीच्या वाटेवर... जायची तारीख नक्की शेगाव च्या श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिराबद्दल गेले कित्येक वर्ष बरंच ऐकून होतो. माझ्या आई - बाबाना सुद्धा तिथे एकदा जायची इच्छा होती. परंतु कोकणातून विदर्भात जायचं म्हणजे खूपच लांब पडतं, ट्रेन बदलत जावं लागणार त्यामुळे तिथे जाणं कधी झालं नाही. मार्च २०२३ मध्ये शिमग्याला सुजल, किर्ती आणि मी भेटलो तेव्हा नेक्स्ट ट्रिप शेगाव च फिक्स केली आणि जून महिना...