शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : १

शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : १

नेक्स्ट ट्रिप डेस्टिनेशन कोणतं बरं? 
मागच्या वेळी अक्कलकोट ला जाताना श्री. सौरभ मिरजकर यांनी सर काकांना कडगंची ला भेट देण्यास सुचवले होते. 

त्या नंतर त्यांनीच सुचवलं कि कोकणातून शेगाव ला एक ट्रेन जाते. मग काय, आमच्या नेक्स्ट ट्रिप च डेस्टिनेशन फिक्स झालं. 

रजू आत्ये म्हणते त्या प्रमाणे, दत्तभक्त आपोआप एकमेकांना भेटतात. 

तसंच होतय गेले ३ वर्षं..  दत्त संप्रदायातील भक्त एकमेकांना दत्तगुरूंच्या दर्शनाचा मार्ग दाखवतायेत.. आणि मग सुरु झालाय दत्त भक्तांचा प्रवास एकत्र..  सद्गुरुंच्या भेटीच्या वाटेवर... 

जायची तारीख नक्की 
शेगाव च्या श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिराबद्दल गेले कित्येक वर्ष बरंच ऐकून होतो. माझ्या आई - बाबाना सुद्धा तिथे एकदा जायची इच्छा होती. परंतु कोकणातून विदर्भात जायचं म्हणजे खूपच लांब पडतं, ट्रेन बदलत जावं लागणार त्यामुळे तिथे जाणं कधी झालं नाही. 

मार्च २०२३ मध्ये शिमग्याला सुजल, किर्ती आणि मी भेटलो तेव्हा नेक्स्ट ट्रिप शेगाव च फिक्स केली आणि जून महिना जवळपास फिक्स केला. 

स्वप्निल मामाने कोकण मार्गाने जाणाऱ्या recently सुरु झालेल्या मडगाव - नागपूर स्पेशल ट्रेन बद्दल सांगितलं. स्वाती मावशी, काका आजोबांना त्याच ट्रेन ने शेगाव ला नेऊन दर्शन घेऊन आली होती. बस्स मग काय, ही ट्रेन जायची फिक्स झाली. 

नेहमी आम्ही ६ जणं असतो ट्रिप मेंबर्स - सर काका, रजू आत्ये, अपूर्वा काकी, सुजल, किर्ती आणि मी. स्मिता आत्ये ने आमच्यासोबत ट्रिप ला यायची ईच्छा दर्शवली होती. बंगळुरू - म्हैसूर ला यायला तिला शक्य नव्हतं. म्हटलं शेगाव ला येते काय विचारू. आणि एका प्रश्नात तीच उत्तर आल - येणार 😀

असे आमचे ट्रिप मेंबर्स ७ झाले यावेळी. मे  महिन्यात लगेच १८ जून ला निघायची तिकीट बुकिंग करून ठेवली. 

शेगाव सोबत अजून काय बघायचं?

शेगाव ला जायचं नक्की केल्यावर  त्याविषयी बरेच लेख, विडिओ पाहायला सुरुवात केली. 

माझ्यासारखाच एक ब्लॉग मिळाला वाचता - वाचता, श्री विजयकुमार मराठे यांचा. त्यांनी त्यात शेगाव सोबत जवळपास अजून काय काय पाहिलं ते लिहिलं होत. 

त्यात त्यांनी उल्लेख केला होता - कारंजा लाड चा. तिथला घुडे वाडा पाहायची इच्छा होतीच. त्याप्रमाणे शेगाव आणि कारंजा लाड पाहता येईल अशी ३ दिवसांची ट्रिप फायनल केली. 


कारंजा लाड
कारंजा लाड हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद असलेले एक शहर आहे. या अत्यंत प्राचीन असलेल्या नगरीचे माहात्म्य स्कंदपुराणातील पातालखंडात आले आहे. करंज ऋषींवरूनच या नगरीला करंजपूर हे नाव मिळाले असे म्हणतात. करंजपूरचे कार्यरंजकपूर, आणि नंतर कारंजा झाले. या नगरीत जैन लाड समाजाची वस्ती असल्याने 'कारंजा लाड' असा या गावाचा उल्लेख केला जातो. 

शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले कारंजे हे नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असल्याचे वासुदेवानंद सरस्वतींनी शोधून काढले आहे. येथील काळे आडनावाच्या घराण्यात नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदते आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणी आहेत.

नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा, सुमारे साठ वर्षीपूर्वी, काशीच्या काळ्यांचे मुनीम असलेल्या घुडे नावाच्या गृहस्थांना विकला गेला आहे. . काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ लीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र वद्य प्रतिपदा, शा.श. १८५६ या दिवशी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना केली आणि पूजेअर्चनेची व्यवस्थाही केली आहे.

कारंजा लाड च्या दत्त मंदिराबद्दल lockdown च्या काळात एक विडिओ फॉरवर्ड होत आमच्यापर्यंत आला. तेथील घुडे वाड्याबद्दल कळलं. आमच्या रत्नागिरीच्या घुडे वाठार (वाडी) ,मध्ये सुद्धा एकमुखी दत्त मंदिर आहे. आमचा  दत्त एकमुखी कसा, हा बरेच वर्ष प्रश्न पडलेला होता. तीन मुखी असायला हवा ना. त्याचा उलगडा असा कालांतराने झाला. एकमुखी दत्त म्हणजे श्री दत्तगुरूंचे अवतारच असतील नाही का?! पुण्यातल्या नारायणपूर मध्ये सुद्धा एकमुखी दत्त आहे. 

काय घ्या, कदाचित पूर्वीच्या काळी या कारंजा लाड च्या एखाद्या घुडे वंशाची शाखा रत्नागिरी मध्ये येऊन वसली असावी आणि येताना ते आपल्यासोबत एकमुखी दत्त घेऊन आले असावेत... 

कारंजा लाड ची मूर्ती आणि आमच्या घुडे वाठार मधली मूर्ती पाहायला गेलं तर चेहरा - भाव अगदी तंतोतंत जुळतात.. 


नृसिंह सरस्वती, कारंजा लाड



एकमुखी दत्त मंदिर, घुडे वाठार, रत्नागिरी

म्हणजे अजून कशा गोष्टी जुळतात बघा हा.. 

कारंजा लाड च दत्त मंदिर शोधून काढलं आमच्या सिंधुदुर्ग, कुडाळ  मधल्या माणगाव च्या टेम्ब्ये स्वामींनी... ज्या माणगाव ला आम्ही लहानपणापासून भेट देतोय.. 

आमची रजू आत्ये च सासर आहे कुडाळ ला बर्डे (सर काका)  यांच्याकडे.. बरं कारंजा लाड च्या दत्त मंदिराचे विश्वस्त आहेत घुडे आणि बर्डे 😀 

म्हणजे किती तो योगायोग असावा ना.. त्यामुळे आता शेगाव पेक्षा हि कारंजा लाड ला भेट देण्याची उत्सुकता जास्त लागून राहिली होती. 😇 आणि महत्वाचं म्हणजे घुडे घराण्याच्या पोरींना (रजू आत्ये, स्मिता आत्ये, किर्ती, सुजल आणि मी) एकत्र घुडे वाड्यात घेऊन जायची माझी ईच्छा होती. 😍

नेहमीप्रमाणे ट्रिप ला लागलेली नरटी 😀😖
हे नेहमीचं च झालंय. आम्ही ट्रिप चा विषय नाही काढला कि पुरी कायनात हमारे ट्रिप में "खोडा" घालने लग जाती हैं . 😂😒😕😖

आमच्या तिघींच्या सुट्टीचे वांदे होतेच. तरी नशीब यावेळी आमच्यापैकी कोणी आजारी पडलं नव्हतं. म्हणजे आयत्या वेळी काहीही होऊ शकतं, एवढी आम्हाला आता जाणीव झालेली आहे.  जवळपास एक आठवडा बाकी होता, तोपर्यँत कोणी ट्रिप चा विषय हि काढत नव्हतं. तरी जास्त डिस्कशन करत बसायचं नाही असच ठरवलं होत. कधी कधी स्वतःची च नजर स्वतःला लागते म्हणतात. असो जास्त विचार नाही करायचा. 

. . . 

४ दिवसांवर ट्रिप येऊन ठेपली, आमच्या तिघींच्या सुट्ट्या पास झाल्या होत्या..  आणि सर काका - आत्येचा कॉल कि आमचं मांजर अत्यंत आजारी आहे, 🐱 आणि दिवसेंदिवस परिस्थिती क्रिटिकल होत चालली आहे. २ दिवस डॉक्टर घरात येऊन बसले आहेत. 

आता ट्रिप च काही नक्की नाही एवढं लक्षात आलं होत. त्यात मांजराचं हिमोग्लोबीन कमी झालं आणि प्लेटलेट्स वाढले. वहिनी ने आत्ये आणि काकांना request केली कि ट्रिप ला जाऊ नका.
आम्ही ट्रिप सर काकांसाठी arrange करतो, ते नसतील तर ट्रिप कसली. २ दिवस अगोदर रात्री आम्ही तिघीनी फायनल केलं, उद्या शनिवारी उठून फायनल कॉल घ्यायचा आणि ट्रिप कॅन्सल करायची. भयंकर मूड ऑफ झाला होता, परंतु काही इलाज नव्हता. मांजर बिचारं खूपच आजारी होत. 

परंतु त्याच रात्री राजू काकांनी आत्ये ला एक उपाय सुचवला, मांजराला पपई च्या पानांचा रस द्यायचा. आशु काकीने दुर्वांचा रस देण्यास सुचवलं. तोपर्यंत इथे डॉक्टर सुद्धा बदलला, पहिल्या डॉक्टर च्या औषधाने मांजर अजूनच आजारी पडत चाललं होत. वाहिनीच्या वडिलांनी टोपभर दुर्वा आणून दिल्या. आणि रात्रीच मांजराला दुर्वा आणि पपईच्या पानांचा रस थेंब थेंब सुरु केला. नवीन डॉक्टर ची औषध सुरु होतीच. आणि काय आश्चर्य, सकाळी मांजर स्वतः आपल्या पायाने घराबाहेर चालत गेलं आणि माडाच्या बुंध्यात जाऊन आपले प्रातःर्विधी उरकून आलं 💩
मांजराने कौल दिला होता, आम्ही ट्रिप ला जायला मोकळे होतो 😻

ट्रिप ला निघायची तयारी 👜👞👗👘👔👕👓👣
कुडाळ ते शेगाव अशी टिकेट्स बुक केली होती. कुडाळ ला (०८.४२pm ) सर काका - रजू आत्ये - स्मिता आत्ये बसणार होते. रत्नागिरी ला (१२.४५am) अपूर्वा काकी आणि सुजल. दुसऱ्या दिवशी त्याच ट्रेन ला कल्याण ला (०८.१७am ) किर्ती आणि मी बसणार होतो.  शेगाव ला पोचायला दुपारचे साडेतीन वाजणार होते. म्हणजे ideally अठरा तासांचा प्रवास होणार होता. ट्रेन मधलं खाणं तर आम्ही नेहमी avoid करतो. त्यात म्हैसूर ट्रिप चा पोट खराब होण्याचा अनुभव गाठीशी होताच 😷😵
त्यामुळे घरातूनच शिदोरी बांधून न्यायची असं ठरलं. मग काय, पुरणपोळ्या, चपात्या, लसूण खोबरं सुकी चटणी, आमरस, अळूवड्या, पौष्टिक लाडू, चिवडे, चकल्या, ड्राय स्नॅक्स असे मिळून सगळ्याच्या ३ पिशव्या खाउच्याच झाल्या होत्या 🍩🍪🍫🍬🍰🍱🍲🍴🍵
And finally against all odds, रविवारी आमची ट्रिप सुरु झाली.... 

(क्रमशः)
~सुप्रिया घुडे 

भाग : २ https://supriyaghude.blogspot.com/2023/07/blog-post.html

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर