महायुग by स्वप्नील सोनवडेकर
पुस्तक : महायुग
लेखक : स्वप्नील सोनवडेकर
पृष्ठसंख्या : २०३
https://www.amazon.in/-/hi/Swapnil-Sonawdekar/dp/1685099653
ब्रह्माच्या एका दिवसाला “कल्प” असे म्हणतात. एक कल्प उलटले की महाविनाश घडतो. ब्रह्माचा हा एक दिवस एक हजार महायुगांचा मिळून बनलेला असतो.
या एक हजार युगातच चौदा मन्वंतरे घडतात. प्रत्येक महायुग हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा चक्रातून जाते. सत्ययुग चार हजार वर्षांचे, त्रेतायुग तीन हजार वर्षांचे, द्वापारयुग दोन हजार वर्षांचे तर कलियुग एक हजार वर्षांचे असते.
याशिवाय यातील सत्य आणि त्रेता, त्रेता आणि द्वापार अशा प्रत्येक दोन युगात मध्यंतरीची काही वर्षे असतात. हा मधला काळ एकूण दोन हजार वर्षांचा असतो. त्यामुळे प्रत्येक महायुग एकंदर बारा हजार वर्षांचे असते आणि ब्रह्माच्या एका दिवसात अशी तब्बल एक हजार महायुगे असतात.
म्हणजे ढोबळपणे सांगायचे तर एका मन्वंतरात ४ महायुगे असतात. सद्यकाळातील कल्प हे वराहकल्प किंवा श्वेतवराह कल्प म्हणून ओळखले जाते.
ही सगळी माहिती मी का सांगतेय?
तर स्वप्नील सोनवडेकर यांची महायुग कादंबरी वाचण्याआधी पुराणांची थोडी तोंडओळख असेल तर ही कादंबरी वाचताना बऱ्याच गोष्टींची लिंक लागत जाते.
अर्थात, लेखकाने ही fantasy & fiction लिहिण्याआधी पौराणिक कथांचा व्यवस्थित अभ्यास केलेला जाणवतो.
महायुगांच्या समयरेखेत अडकलेल्या २ युवकांची हि गोष्ट. १९८७, २०१५, २०१९, ३२०० अशा वेगवेगळ्या समयरेखेत कल्की दास म्हणून वावरणाऱ्या या २ युवकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, आणि शेवटी कली ला मारण्यासाठी विष्णूचे शेवटचे अवतार कल्की यांना या कल्कीदासांची कशी मदत होते याचे रोमांचकारी वर्णन या कादंबरीत वाचायला मिळेल.
भगवान विष्णु यांच्यावरील मराठीतील हे एकमेव fantacy नॉवेल असावे.
"महायुग " नक्की वाचा. धन्यवाद.
~सुप्रिया घुडे
Comments
Post a Comment