18 to 25 Nov 2023 Delhi-Agra-Mathura trip
🤩यह दिल्ली है मेरे यार.. बस इश्क़ मोहब्बत प्यार 🤩
18 to 25 Nov 2023 मध्ये आमची Delhi-Agra-Mathura trip ठरली. आणि नेमक तिथे पोहोचल्यावर आमच्या लक्षात आलं की इंडियन गवर्नमेंट कडून हाच आठवडा वर्ल्ड हेरिटेज वीक म्हणून declare करण्यात येतो. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून संरक्षित केलेले monument पाहायला जास्तच मजा वाटली.
३ महिने अगोदरच विमानाची बुकिंग केली असल्याने तिकीट दर स्वस्त पडला अनायासे total Trip cost इथेच कमी झाली.
नेहमीप्रमाणे ही ट्रिप सुद्धा अगदी शेवटच्या घटकेपर्यंत कॅन्सल च व्हायची होती.
अपूर्वा काकी,सुजल, किर्ती या ट्रिप मधून कॅन्सल झाल्या त्यामुळे माझे आधारस्तंभ सुटले. आता मला ३ व्यक्तींना सांभाळून न्यायची जबदारी होती - सर काका, रजू आत्ये आणि स्मिता आत्ये.
दिल्ली च्या प्रदूषणाबद्दल आणि थंडी बद्दल एवढ ऐकून होतो की झेपेल की नाही ही ट्रिप इथपासून सुरुवात होती. त्यातकरून माझ्या ऑफिस colleague नि दिल्ली च्या हरयाणवी लोकांच्या attitude बद्दल एवढी मनात भीती भरली की मी जवळपास ट्रिप cancel करण्याच्याच मार्गावर होते. तेवढ्यात एके रात्री कॉल वर सत्येन (दादा)ने एवढा कॉन्फिडन्स boost केला माझा, त्याची कोणी एक विद्यार्थिनी एकटी दिल्ली ला राहून आली होती, तिच्याशी वार्तालाप झाला आणि नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा दादा ने मार्ग दाखवला 😅
या ट्रिप मध्ये आम्ही दिल्लीची १६ ठिकाणं, आग्रा ची ३ आणि मथुरा ची २ ठिकाणं पहिली.
म्हणजे, येण्या जाण्याचे प्रवासाचे २ दिवस वगळता, अन्य ७ दिवसांत आम्ही total २१ ठिकाणांना भेट दिली.
तेही कोणत्याही टुरिस्ट कंपनी ची मदत न घेता . नशिबाने आम्हाला या ट्रिप मध्ये सगळी चांगली माणसं भेटली. दिल्ली तील सर्व प्रवास आम्ही मेट्रो नेच केला, माझ्या मुंबई मेट्रो प्रवासाचा अनुभव कामी आला. त्यामुळे आमची ट्रिप जास्तच सुखदायक आणि स्वस्त झाली.
दिल्ली मध्ये कोणत्याही स्थळाला भेट द्या, खूप चालावं लागतं. Daily १२ ते १८ हजार पावलं तर सहज चालून होत होती.
मधल्या २ दिवसात, दिल्ली ते आग्रा आणि परत दिल्ली हा प्रवास करण्यासाठी आम्ही कॅब बुक केली, तिथे एक खर्च वाढला. परंतु तो सुद्धा worth होता. कॅब चालक एक राजस्थानी सद्गृहस्थ होते. बाहेरच्या ठिकाणी कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे रिस्क च होती. पण त्या प्रवासात या व्यक्तीवर विश्वास बसला आणि त्यांनीही आम्हाला खूप सांभाळून विश्वासाने आग्रा दाखवल. देव कसा कोणत्या रूपात मदत करेल नाही सांगू शकत.
शेवटचे २ दिवस पुन्हा आम्ही आग्र्यातून दिल्ली त आलो. आधीचे सगळे दिवस आम्ही तोंडाचा मास्क काढला नव्हता. परंतु शेवटच्या २ दिवसांत मी आणि स्मिता आत्ये गाफील राहिलो, मास्क काढून जीवाची दिल्ली केली आणि तिथेच फसलो. येतानाच सर्दी तापाने आजारी, आम्ही दोघीही. त्या मनाने सर काका आणि रजू आत्ये ने अजिबात मास्क शेवटपर्यंत काढला नाही. असो, तेवढच काय ते (स्वतःच्याच चुकीमुळे) थोडं गालबोट लागलं. बाकी ट्रिप अगदी संस्मरणीय झाली.
बरं, आता २ वर्षांनी याची आठवण का काढली जाते आहे कारण....
जे काही व्हिडिओ त्यावेळी चित्रित केले होते ते एडिट करून अपलोड करायला अजिबात वेळ मिळत नव्हता. तब्येतीच कारण म्हणा किंवा ऑफिस workload म्हणा..
वाटलं होत सगळ असच फुकट जात की काय.
व्हिडिओ एडिट करायचे म्हणजे सगळे छोटे छोटे व्हिडिओ compile करून, त्या जागाविषयी माहिती गोळा करून, मराठीत भाषांतर करून मग त्याचे रेकॉर्डिंग करून व्हिडिओ तयार करायचा. आता एवढा वेळ काही मिळत नव्हता. मध्यंतरी काही ठिकाणाचे नुसते व्हिडिओ compile करून त्यात बॅकग्राऊंड music सेट करून केले व्हिडिओ अपलोड. पण त्यात काही मजा वाटेना. जोपर्यंत त्यात माझ्या स्टाईल ने माहिती रेकॉर्ड होत नाही तोपर्यंत काही मजा नाही 😁🤭😋
काय करावं सुचेना..
अचानक एक idea ची कल्पना आली 💡
ऑफिस मध्ये AI चा use करणारी मी पर्सनल लाईफ मध्ये का नाही करत आहे 🤔
लगेच गुगल translator, ChatGPT, TextToSpeech चा वापर करत धडाधड बरेचसे व्हिडिओ एका आठवड्यात अपलोड केले आहेत.
Obviously, AI चा वापर पूर्णपणे आपल्याला हवा तसा result देत नाही. बऱ्याच त्रुटी आहेत. परंतु मी त्यातून बऱ्याच गोष्टी शिकले आणि स्वतःच्या चुकांमधून शिकून अजून चांगला AI चा वापर कसा करता येईल, असे प्रयत्न चालू आहेत.
सर्व व्हिडिओ ची लिंक खाली एकच post मध्ये देत आहे. बऱ्याच चुका असतील. चूकभूल माफ करणे. आणि आमच्या ट्रिप च्या अनुभवांचा / व्हिडिओ चा उपयोग तुम्हाला तुमच्या पुढील ट्रिप साठी होईल अशी इच्छा बाळगते.
धन्यवाद.
~ सुप्रिया घुडे
राजघाट - महात्मा गांधी स्मारक, दिल्ली : https://youtu.be/VkKhWudrycg?si=kUJytj05SpnoyMTn
GURDWARA SRI BANGLA SAHIB : https://youtube.com/shorts/r7aWp5AEJF0?si=8caG2Zi9MW6HLYsD
इंडिया गेट, दिल्ली || INDIA GATE, Delhi : https://youtu.be/-OcNbWdDc5k?si=0HuIHvoyr2Bfcbes
Humayun's Tomb, Delhi : https://youtu.be/06VJ9967zfk?si=ivAq26dKuUrmJTCX
Safdarjung’s Tomb || Delhi : https://youtu.be/7ivD-R6XKL0?si=4pRPEr8Tp2XKYH1j
Central Secretariat, New Delhi : https://youtu.be/sgs5AitkRLE?si=MxnUbebpptt73Bcy
Qutb Minar / Qutub Minar / Qutab Minar : https://youtu.be/kCTW_uXlA_k?si=CF7LV3YJeJNbd_RG
Red Fort / Lal Qila, Delhi : https://youtu.be/vtiKOeBDLmk?si=z-nacSZ0o5ZECluP
Taj Mahal, Agra, Uttar Pradesh : https://youtu.be/s_8mZcPgXpU?si=QBAlXoeIQaDFzf3Q
Agra Fort, Uttar Pradesh : https://youtu.be/65KsCRfW8Yg?si=mQucFWvrZEtnQ7nL
फतेहपूर सिक्री, आग्रा, Uttar Pradesh : https://youtu.be/Ohac3PvlWUk?si=jyC6uCi_pJiR5kPK
Lotus Temple, Delhi : https://youtu.be/d4sPBrNWwDw?si=y7EtCOY452SwSSRx
Purana Qila / Old Fort Delhi, India : https://youtu.be/HxbX587kjjU?si=9UvJScmv_25BKzTM
Agrasen / Ugrasen Ki Baoli : https://youtube.com/shorts/ZJJY4uc_S0g?si=CTfqqW-1Z99ozGCd
Jantar Mantar, New Delhi : https://youtu.be/SmTfSz2PgeQ?si=Ak9IEfkJh6KWgF-m
Hauz Khas Complex : https://youtu.be/aH30TajJuEo?si=K1EyMbJuqq0RGl68
मथुरा : https://youtube.com/shorts/CgYdfzy73Ss?si=BJixaXieEI6yoe5h
Squirrel@JantarMantar : https://youtube.com/shorts/yu928h1lIVg?si=GVeUhR-4s5koulap
दिल्ली ट्रीप - १८-१९-२०-२४-२५ नोव्हेबर २०२३ : https://youtu.be/p28Cdqn5d0c?si=IbeWWDZUiq4BNTYx
🛫Mumbai To Delhi🛬 Flight Experience ✈️ : https://youtu.be/whGKr3aSYjA?si=cgA9zEeikkczvI8w
🛫 Delhi To Mumbai 🛬 Flight Experience ✈️ : https://youtu.be/L46sBx5qVJg?si=kv0E_-TKsyPTV9Pp
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा:स्थळ-लाल किल्ला, आग्रा 😎🚩 : https://youtube.com/shorts/qc03Imhhics?si=1QROLHvQc8IZ3fvl
Delhi To Agra || Road Trip || 21-Nov-2023 : https://youtu.be/ZrUFT-3vdYw?si=5sFq2lWFjM7XcPAD
Comments
Post a Comment