Suicide
' ना जा sss… कहिं अब ना जा sss दिल sss के सिवा sss'… एका सुंदर बायकी आवाजात गाणं ऐकू येत होतं , रात्री ८ . ३० च्या तुफान भरलेल्या लोकल मध्ये सुद्धा .. लगेच पुढच्या ओळी पुरुषी आवाजात - " है यही दिल , कूचा तेरा ऐ मेरे हमदम , मेरे दोस्त न जा कहीं ..." कोण गाणं म्हणतंय म्हणुन वळुन पाहिलं तर एक तृतीयपंथीय दोन्ही आवाजात गाणं म्हणत ' होता '. देव पण कोणाला कोणत्या कलेचं दान देयील काही नाही सांगू शकत . गाणं म्हणत , ' टाळ्या वाजवत ', ( तेवढ्या गर्दीतही ) सगळ्यांच्या डोक्यावरून हात फिरवत ' तो ' पैसे मागत फिरत ' होता '. earings -bangles घेऊन एक फेरीवाली ने ' त्याला ' हाक मारली - " काजल , अगले station उतरेंगे क्या ?" काजल - " नही , २ station बाद . " असं म्हणून ' काजल ' पुन्हा आपल्या कामाला ' लागली '. एक station येउन गेलं तशी मी थोडी पुढे दरवाज्याकडे सरकले . train ने थोडा वेग घेतल...