Suicide
'ना जा sss… कहिं अब
ना जा sss
दिल sss के सिवा
sss'…
एका सुंदर बायकी आवाजात
गाणं ऐकू येत
होतं, रात्री ८.३० च्या
तुफान भरलेल्या लोकल
मध्ये सुद्धा..
लगेच पुढच्या ओळी पुरुषी
आवाजात -
"है यही दिल,
कूचा तेरा
ऐ मेरे हमदम,
मेरे दोस्त
न जा कहीं..."
कोण गाणं म्हणतंय
म्हणुन वळुन पाहिलं
तर एक तृतीयपंथीय
दोन्ही आवाजात गाणं म्हणत
'होता'. देव पण
कोणाला कोणत्या कलेचं दान
देयील काही नाही
सांगू शकत. गाणं
म्हणत, 'टाळ्या वाजवत', (तेवढ्या
गर्दीतही) सगळ्यांच्या डोक्यावरून हात
फिरवत 'तो' पैसे
मागत फिरत 'होता'.
earings -bangles घेऊन
एक फेरीवाली ने
'त्याला' हाक मारली
- "काजल, अगले station उतरेंगे क्या?"
काजल -
"नही, २ station बाद. " असं
म्हणून 'काजल' पुन्हा आपल्या
कामाला 'लागली'.
एक station
येउन गेलं तशी
मी थोडी पुढे
दरवाज्याकडे सरकले. train ने थोडा
वेग घेतला तसा
अचानक आमच्या compartment मध्ये
गोंधळ सुरु झाला.
पलीकडच्या
door कडे एक १७-१८ वर्षाची
मुलगी बाहेर उडी
मारणार तेवढ्यात 'काजल' ने
तिला आतमध्ये ओढून
घेतलं. ती मुलगी
ओरडत होती, रडत
होती - "मुझे नही
जीना है… मुझे मरना
हैं… ". कोणाला
काहीच समजेना. 'काजल'
ने तिचा हात
घट्ट धरून ठेवला
होता. तिला संभाळल.
तिचे डोळे पुसले.
आणि 'काजल' बोलत
होती -
"अरे लडकी, पगली होगयी
हैं क्या? क्यू
मरने जा रही
थी. ऐसा नही
करते बच्चा, नही
रोते … " पुन्हा 'काजल' तिचे
डोळे पुसायला लागली.
तोपर्यंत इतर बायकांचा
बराच गोंधळ सुरु
झाला होता.
बाई (१) - "શું થયું?"
बाई (२) - "एक लडकी
जान दे रही
थी."
बाई (३) - "काय पण
आज-कालच्या पोरी,
जर काय झालं
की जीव द्यायला
मोकळ्या…"
बाई (२) - "कुछ नही,
प्यार-व्यार का
चक्कर रहेगा"
सगळ वातावरण थोडं तंग
झालेलं होतं.
'काजल' तिथे तिला
समजावत होती.
"क्या
हुआ बच्चा, बोल.
बोलेगी तो अच्छा
feel करेगी. तू रोना
बन्द करदे पेहेले.
नही तो मै
रोना शुरू कर
दुंगी"
अस म्हणून 'काजल' खरंच
आपल्या भसाड्या आवाजात रडायला
लागली. तशा सगळ्या
हसायला लागल्या, ती मुलगी
सुद्धा. वातावरण जरा हलकं
झालं.
ती मुलगी थोडी comfortable झाली
तशी बोलायला लागली
-
"मेरी
सौतेली मां मुझे
बहोत मारती है,
मेरे पिताजी ने
मेरी मां मर
गयी इसलिये ये
दुसरी औरत घर
पे लायी. और
पिताजी हर बात
इसी औरत कि
सुनते है. उसने
कुछ पिताजी को
मेरे खिलाफ़ आज
भडकाया, तो आज
पिताजी ने भी
बहोत मारा. मुझे
मर जाने दो.
नही जिना है
मुझे… "
असा म्हणून ती पुन्हा
उठली. 'काजल' ने तिला
बसवलं. शांत केल.
सगळ्या बायका आता त्या
मुलीच्या बाजूने बोलयला लागल्या.
आपापल्या परीने समजावायला लागल्या.
सगळ्यांनाच तिच्याबद्दल वायीट वाटायला
लागलं होतं.
तशी 'काजल' तिच्याशी बोलू
लागली -
"दुनिया
मे बहोत दुख
- दर्द है बेटा.
अभी तो तू
बहोत छोटी है.
कभी हिम्मत मत
हार. इस दुनिया
मै बहोत ऐसे
लोग है जो
हमसे भी ज्यादा
दुखी है. Suicide हर
दुख का जवाब
नही है…
"
'काजल' सारख्या एका सामान्य
व्यक्तीने किती महत्वाची
गोष्ट समोर ठेवली
होती. किती clear approach होता
'तिचा' आयुष्याकडे पाहण्याचा. लोकं
हेच एखाद्या 'साधू'
कडून ऐकण्यासाठी लाखो
रुपये खर्च करतात.
असो, तो प्रत्येकाच्या
'श्रद्धेचा' भाग झाला…
परंतु त्यावेळी हजर असलेली
व्यक्ती 'काजल' चे शब्द
ऐकत होती.
'काजल' पुढे बोलत
होती -
"चल तू मेरे
घर चल. तुझे
खाना खिलौंगी. नये
कपडे दुंगी. फिर
तू जा अपने
घर. पर suicide मत
कर. "
इतक्या सहज 'काजल'
ने तिला घरी
यायला invitation दिल, एवढी
'माणुसकी' तिथे उपस्थित
असलेल्या कोणत्याच 'पांढरपेशा' हृदयात
नाही आली.
'काजल' -
"अरे बच्ची, मै जब
मुंबई मे आयी
थी, कोई नही
था मेरा यहा.
रास्ते पे सोती
थी. पडा हुआ
खाना खाती थी.
एक तो मै
'ऐसी' हु, तो
मेरे घरावालोने भी
मुझे अपनानेसे इन्कार
कर दिया. तो
क्या करती. घर
छोड के मै
आ गयी इधर.
हमारे जैसे लोग
सर उठा कर
जी भी नही
सकते. तभी मुझे
मेरे गुरु मिले
और उन्होने मुझे
हौसला दिया. मै
अब जैसी हु
खुश हु... "
नकळत डोळ्यांमधून पाणी यायला
लागलं होतं. कळत
नव्हतं कि नक्की
कोणाच्या दुखाचं जास्त वायिट
वाटत होतं, त्या
मुलीचं कि 'काजल'
चं… ''
माझं
station आलं, सगळचं धुसर दिसत
होतं. उतरताना पुन्हा
त्या गाण्याच्या ओळी
मात्र ऐकू येत
होत्या -
'ना जा sss… कहिं अब
ना जा sss
दिल sss के सिवा
sss'…
Fri 19-09-2014 17:18
©SKG - CITY
through My Eyes
Comments
Post a Comment