देशप्रेम
१४ ऑगस्ट २०१४. सकाळची
वेळ, साधारण ०८ वाजून ४५ मिनिट…ऑफिस ला निघायला खूपच उशीर
झालाय मला आज… बस ने जावं कि रिक्षा… बस ने खूपच उशीर होयील. रिक्षा आयत्या वेळी एकही
थांबणार नाही. नको असेल तेव्हा ४ जण येतील समोर. शेवटी शेअर रिक्षाच्या रांगेत उभी
रहिले. माझा समोर अजून १० माणसं. आज नक्की ०९.०३ ची लोकल चुकणार…
"… आज ऑफिस मध्ये
tri -color theme आहे. सहाजिकच दरवर्षीप्रमाणे या निमित्ताने देश प्रेम उफाळून येत
सगळ्यांच, तसंच आज माझा बाबतीत झालंय. whatsapp वरच्या सगळ्या messeges ची एकदा मनात
उजळणी सुरु झाली…
देशाचा अपमान होयील
असा काही वागू नये… तिरंगा रस्त्यावर टाकू नये… सिग्नल तोडू नये… हवालदाराला चिरी-मिरी देऊन वेळ निपटवून नेवू नये… वगैरे वगैरे…
"
तेवढ्यात माझा नंबर
लागला आणि माझी विचारांची शृंखला तुटली. मी शेअर रिक्षात बसले. मन पण आपलं कसं असतं
ना. जर मोकळी जागा मिळाली कि विचारांची गर्दी व्हायलाच हवी.
रिक्षावाला जोरात रिक्षा
पळवत होता. आणि लगेच पुढच्या चौकात Red सिग्नल लागला… रिक्षावाल्याची सिग्नल तोडायची लगबग सुरु झाली. आम्हा
passengers ना सुद्धा उशीर होत होताच…
तेवढ्यात मला 'देशप्रेमा'ची
आठवण आली…. रिक्षावाल्याला म्हटलं आरामात घ्या कसली घाई
आहे, सिग्नल तोडू नका. इतर २ passenger नी माझाकडे रागात बघितलं (तशी मला ही असं बोलताना
डोळ्यांपुढे चुकलेली लोकल दिसत होतीच)… तरीही 'मराठी बाणा' प्रमाणे… एकदा ठरवलं ना कि मग मागे फिरायचं नाही… त्याप्रमाणे मी रिक्षावाल्याशी हुज्जत घालायला
सुरुवात केली. शेवटी तो बोलला - 'Madam, आता office timing ला जास्त भाडी मिळतात.
तेवढेच जास्त पैसे मिळतील. 'मामा' नाही आहेत सिग्नल वर तर काय हरकत आहे. '
मी गप्पच बसले. बरोबरचे
passenger थोडे खुशच झाले. माझ विचार चक्र पुन्हा सुरु झालं.
"… तेवढेच जास्त
पैसे मिळतील.. " तेच वाक्य डोक्यात घोळत होता. त्याचही काय चुकल म्हणा… सगळ्यांच च हातावर पोट. मलाही उशीर झाला असता
पोचायला तर late - mark लागलाच असता. दोष देणार तरी कोणाला.
आपण सगळे भारतीय एका
दुष्टचक्रात अडकलेले आहोत - " महागाई - गरिबी - भ्रष्टाचार"…
यापुढे 'देशप्रेमा'
चा विचार करायला वेळ आहे कोणाला…
14-AUG-2014
©SKG - CITY
through My Eyes
Comments
Post a Comment