मी, आई आणि ICU
मी, आई आणि ICU
१२- फेब्रुवारी - २०१८
माझ्या डोळ्यासमोर चितेत “ती” भस्मसात होतेय.. कोणीतरी माझ्या खांद्यावर मडकं ठेवून त्यावर ‘अश्म’ ने भोक पाडतय आणि मी ते मडकं मागल्या - मागे टाकून बोंब मारतेय. मोठी मुलगी म्हणून आईला मुखाग्नी देण्याची वेळ आली आहे माझ्यावर.. गेले महिनाभर पोटच्या पोराप्रमाणे लेकीने आईची आजारपणात सेवा केल्याच पुण्य(?!) म्हणे....
१२-जानेवारी-२०१८
गेले आठवडाभर माझी तब्येत ठीक नव्हती, आणि मला बरं नसलं की आईची धावपळ सुरू होते. एकसारखे फोन करून सांगेल, हे कर, ते खा. पण यावेळी आईचा फोन नाही, त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. मध्येच एकदा व्यवस्थित बोलली पण आवाज ठीक नव्हता. माझ्या आजारपणासाठी मात्र घरगुती उपचार सांगायचे विसरली नाही.
आई ही शेवटी आईच असते..स्वतः कितीही आजारी असली तरी, तिच्यापासून लांब राहणारं तिचं लेकरू आजारी आहे म्हटल्यावर, आपलं लेकरू खाऊन पिऊन औषधं घेतंय की नाही ती काळजी करत बसेल पण स्वतः तोंडाला चव नाही म्हणून घोटभर चहा सुद्धा घेणार नाही..
किर्ती ला विचारलं - खरं सांग आई ला काय होतंय. ती बोलली माहीत नाही पण झोपून राहतेय, BP वाढलंय बहुतेक.
माझी तब्येत बरी झाली आणि आज मी रत्नागिरी ला पोहोचले.
बरं झालं नाहीतर अजून किती दिवस अंगावर काढलं असतं तिने काय माहीत, आणि त्यात माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं ऐकेल तर शप्पथ.
पुढच्या एक महिन्यात आमच्या पुढ्यात काय वाढून ठेवलं होतं काळाने याची पुसटशी ही कल्पना मला, कीर्ती ला आणि खुद्द आई लाही नव्हती.
इथूनच सुरुवात झाली होती,
तिच्या वाईट काळाची, आणि माझ्या वाईट वेळेची.
३ वर्षांपूर्वी बाबा गेले आणि आम्ही तिघी खऱ्या अर्थाने पांगळ्या झालो. आम्ही आई ला नेहमी बाबांसोबत पाहत आलोय, आई ने इतकी सेवा केली आहे बाबांची तेवढ मी अजून कोणत्याच बाईला पाहिलं नसेल. पण बाबांनी उगाचच अचानक जीव सोडला, अचानक heart arrest.
आणि आई पूर्णपणे उदासीन झाली. आणि असं आईला पाहणं आम्हा दोघींना खूपच त्रासदायक होतं. बाबांचा फोटोच घेऊन बस, देवासमोर उभी राहून पूजा करताना रडायला सुर कर असे आईचे प्रकार सुरू झाले. आईच्या डोळ्यांसमोर काळाने तिचं सर्वस्व हिरावून नेलं होतं. आणि आम्ही आमचं उरलेलं सर्वस्व आमच्यासमोर तुटताना बघत होतो.
सतत काम करणाऱ्या आई ला अंथरुण धरलेलं बघवत नव्हतं. आदल्या दिवशी आत्ये आणि चुलत बहिण सहज म्हणून भेटायला आल्या तर हिची अशी परिस्थिती बघनू लगेच डॉक्टर कडे न्यायचं ठरवलं पण आई दुसऱ्या कोणाचं ऐकेल तर ना. ती माझ्यासाठी थांबलेली, सुप्रिया आली की डॉक्टर कडे जाणार.
आई चा फक्त homeopathy वर विश्वास. पोट जास्तच मोठं आणि घट्ट फुगलेलं दिसायला लागलं. गॅस मुळे एवढं होणं शक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशीची Pathology lab ची appointment घेऊन लगेच सगळ्या test करून घेतल्या. Reports एकदम धक्कादायक निघाले. Liver खराब झालेलं असून, it is causing ascites, थोडक्यात पोटात पाणी होणे. आता हे पोटातलं पाणी काढून टाकायचं, आणि एकदा काढायला सुरुवात केली की नेहमीच काढावं लागणार. Reports बद्दल आई ला सांगणं शक्यच नव्हतं तिने अर्धा जीव तिथेच सोडला असता. तिच्या समोर सगळं व्यवस्थित असण्याचं नाटक करणं खूप कठीण जात होतं.
आईची तब्येत प्रत्येक दिवसाला ढासळत होती. पोटात पाणी झाल्याने जेवायला होत नव्हतं, झोपल्यावर खोकला सुरू व्हायचा, बसून तरी कसं झोपणार, कुशीवर वळता येत नव्हतं, जेवण जात नव्हतं त्यामुळे अजून अशक्तपणा.
रत्नागिरीतल्या डॉक्टर नि saline लावण्यासाठी एक nurse ची व्यवस्था केली पण त्या nurse ने पहिल्याच दिवशी आई ला प्रश्न विचारून डोकं खराब करून ठेवलं - नवरा नाहीये का, कधी गेले, दोघी मुलीच का, मग आता कसं करणार तुम्ही...
काही बायकांना कधी कुठे काय बोलावं याची अजिबात अक्कल नसते, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ती nurse होती. झालं, मी आणि आईने त्या बाईला एक दिवसात घरचा रास्ता दाखवला.
आजारपणाने अगदी लहान मुलगी झाली होती आई. आणि मी तिची आई बनून तिला खाऊ पिऊ घालायचे. रात्रभर तिच्या शेजारी बसून राहायचो आम्ही दोघी, अचानक त्रास झाला की धावपळ सुरू. मोठी मावशी आली भेटायला तेव्हा तिला आई सांगत होती - खूप करतायेत लेकी माझ्यासाठी. त्यांना त्रास झालेला बघवत नाहीये.
पण आईच्या तब्येतीपुढे आम्ही हतबल झालो होतो. परिस्थितीपुढे बुद्धी काम करेंनाशी होते. आणि जिथे बुद्धीचं क्षेत्र संपत तिथे श्रद्धेचं क्षेत्र सुरू होतं. माघी गणेशाचं आगमन झालं. गणपतीला बोलले - आई माझी पूर्ण बरी होऊ देत, पुढच्या वर्षी नाव ठेवायला जागा राहणार नाही अशी तुझी सेवा करेन.
सगळ्या reports च्या copies मुंबई मधील नातेवाईक आणि office collegues ना पाठवले होतेच. मुंबई च्या डॉक्टर्स कडून एकच reply - liver transplant. आता माझ्या पायाखालची जमीन सरकायची बाकी होती. मुंबई ला तातडीने आई ला घेऊन जाणं खूप गरजेचं होतं, पण म्हणतात ना सगळे problems एकत्रच येतात. नेमक्या वेळी माझा सोबतीला कोणीच मिळेना. शेवटी मुंबईच्या मावशीला यायला सांगितलं, बस्स आई ला मुंबई पर्यंत न्यायला मला कोणीतरी सोबत हवं होतं.
२६-जानेवारी-२०१८
मुंबई ला निघण्यासाठी आईला प्रवासाचा त्रास होणार नाही अशी comfortable 4-wheeler रत्नागिरी च्या dr नि fix केली. लहानपणा पासून healthy असलेली आई एकदम खंगलेली बघून शेजारी-पाजारी सुद्धा हळहळायला लागले. मामा, मामेभाऊ, मावशी, किर्ती आणि मी अशी सगळी आई ला सांभाळत मुंबई मध्ये पोचलो.
प्रवासाच्या त्रासाने असेल पण त्या रात्री आई ची तब्येत खूपच खराब झाली.
काकांचे family doctor Dr. Nichani यांची दुसऱ्या दिवशीची apointment घेऊन आई ला दाखवायला घेऊन गेलो. Dr. बघताच क्षणी बोलले, ही Liver damage ची नाही तर tumour ची case दिसतेय. लगेच KEM ला घेऊन चला.
माझा अर्धा जीव इथेच गेला होता, पण आईला सांगितलं, बस्स चांगल्या हॉस्पिटल ला जाऊ म्हणजे लवकर बरी होशील.
KEM ला पोचलो पण तिथलं वातावरण बघूनच आई घाबरली. मग दुसऱ्या एका नामवंत हॉस्पिटल चा option निघाला, पण तिथे admit करायचं म्हणजे चांगली ओळख हवी. आणि नेमकी तिथल्या ex-staff ची ओळख मामाशी निघाली. Gastreoenterologist Dr देसाई यांच्या अखत्यारितAdmit करून घेतलं, आणि general वॉर्ड मध्ये उपचार सुरू झाले. यावेळी आम्ही खऱ्या अर्थाने relax झालो होतो, की आता आई बरी होणार.
हॉस्पिटल मध्ये patient सोबत एकच व्यक्ती allowed असते, पण आईचं आमच्या दोघींशिवाय कोणीही नाही म्हटल्यावर doctors नि मला आणि कीर्ती ला आई सोबत राहायची परवानगी दिली. सगळे नातेवाईक घरी जायला निघाले, तशी आई बोलली त्यांना cab ने जाऊ देत, पैसे देऊन ठेव. एवढ्या आजारपणात सुद्धा कशा गोष्टी आई ला सुचू शकतात याचंच जास्त आश्चर्य वाटलं मला. पण आता आम्ही positive होतो की पाच-एक दिवसात आई इथून बरी होऊन घरी येणार.
हॉस्पिटल मधलं जेवण जेऊन झाल्यावर काही वेळ आईशी आम्ही बोलत बसलो, तिला एकसारखं सांगत होतो तू बरी होणार. कारण patient स्वतः मनाने उभं राहणं जास्त गरजेचं असतं.
परंतु नशिबाचे खेळ इथेच संपायचे नव्हते. रात्री ११ नंतर आई ला नेहमीसारखा पुन्हा त्रास सुरू झाला. ऍडमिट झाल्यावर पोटातलं पाणी काढलं होतं, पण लगेच ascites formation सुरू झालं, ते का होतंय त्याचे reports पण यायचे होते. Doctor/nurses ची धावपळ सुरू झाली. Doctor आमच्या दोघींवर प्रश्नांची सरबत्ती करायला लागले - कधीपासून त्रास होतोय, तुम्ही दोघीच आहात का, अजून मोठं कोणी जबाबदार माणूस नाहीये का, बाबा कुठेयत, आता emergency लागली तर कोणाला बोलावणार..एक ना दोन, काय उत्तरं द्यायची माझी तर वाचाच बसली. अजून एक senior डॉ आले, दुपारी काढलेल्या ascites चे reports घेऊन, त्यांनी परिस्थिती मला समजावून सांगितली, ascites मध्ये suspicious cells दिसत होते, तातडीने ICU मध्ये ADMIT करणं गरजेचं होतं.
मी किर्ती ला बोलले, आधी काकांना call कर, सगळ्यांना परत बोलाव, मी तशीच आईच्या पाठून ICU मध्ये.. देवाचा धावा करण्याऐवजी माझाकडे काहीही उरलेलं नव्हतं..
ICU च्या बाहेर मी कितीतरी वेळ बसून राहिले होते, की आता एखादा डॉ बाहेर येतिल म्हणजे आतल्या परिस्थितीचा अंदाज येईल. तेवढ्यात bed no 61 च्या (आई शेवटपर्यंत इथेच होती) relatives ना शोधत एक senior nurse बाहेर आली. सगळी medical history विचारून घेतली. मी शाळेत असताना आईचं operation झालेलं माहीत होतं, fibroids असल्याने uterus काढलं होतं, पण ovaries काढल्या होत्या का, याचं उत्तर मलाही माहीत नव्हतं, आणि माहीत असलेली व्यक्ती एकमेव बाबा, ते पण नाहीत. त्या nurse ला आश्चर्य वाटत होतं की अशा critical patient ला मी एकटीच्या जीवावर इथे आणलंय, तिने तसं बोलूनही दाखवलं. परिस्थिती माणसाला सगळं काही करायला भाग पाडते, हे कसं समजावणार होते मी तिला??!!
मी तिला म्हटलं, फक्त एकदा आई ला बघून घेऊ दे, मी खूप वेळ नाही दिसले तर घाबरेल ती, पण rules नुसार आता पहाटे ५ नंतरच तिला बघू शकणार होते.
Injection घ्यावं लागतं, उगाचंच tests करायला लावतात म्हणून allopathy doctors ना टाळाटाळ करणारी बाई आज ICU मध्ये admit होती, त्यात मीसुद्धा समोर नाही म्हटल्यावर तिने हिम्मत नको हरायला, फक्त हेच tension होतं मला. पुढचे १५ दिवस इतक्या जगभरातल्या tests होणार होत्या, त्या जीवाचे होणारे हाल बघून जीव तीळ-तीळ तुटत होता. हॉस्पिटल ची पायरी चढायची वेळ येऊ नये आयुष्यात तेच खरं.
किर्तीची आणि माझी परीक्षा तर आई ICU मध्ये गेल्यावर सुरू झाली. ICU मध्ये patient ला restricted timing मध्ये आणि एकाच व्यक्तीला भेटता येतं, पण इथे आमच्या तिघींची family condition बघून आम्हा दोघी बहिणींना आई जवळ राहायची परवानगी दिली.
आम्हा दोघींना दुसऱ्या दिवशी बघून घरी जायचा धोशा लावला आईने. तिथे आलेले critical patient बघून ती अजून घाबरायची. रडायला सुरू करायची. एकदा असेच डॉ visit ला आले, कीर्ती होती तिच्या सोबत, मी bill payment चं बघायला गेलं, कीर्ती वर ओरडली सुप्रिया ला बोलाव आधी. लहानपणापासून मी तिच्यावर depend होते, आता ती माझ्यावर depend व्हायला लागली होती. मी जरा नजरेआड झाले की शोधायला लागायची. पुढचे १५ दिवस मी जवळच राहायचे तिच्या पण लपून लक्ष ठेवायचे, नाहीतर लगेच मला बोलावून रडून घरी चल बोलायची. खूप वाईट वाटायचं.
लहानपणापासून मी नेहमी आई ला चिकटून असायचे. आई जरा कुठे दिसेनाशी झाली की मी भोकाड पसरायला सुरू. अगदी ती toilet ला गेली तरी मी रडायला सुरू करायचे. शाळेत Admission घेतल्यानंतर तर २ वर्ष आई रोज माझा वर्गात बसून राहायची. नाहीतर मी रडून शाळा डोक्यावर घ्यायचे. १२वि नंतर मी हॉस्टेल ला गेले तेव्हा सगळे नातेवाईक बोलले, ही नाही राहू शकत, ही परत येणार. पण बाबांनी समजावलं, मोठं व्हायचं असेल तर काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतात.
अशी मी लहानपणी नेहमी आई चा पदर धरून, आणि पदर हातातून सुटला की नातेवाईक बोलायचे - बघ वायर सुटली, वायर सुटली..
आता तर वायर कायमची तुटली...
एक दिवशी मी आणि कीर्ती ने आईला समजवायच ठरवलं, तिला बोलले, बघ आता घरी जाऊन काय करणार, आपण बरं होऊनच घरी जायचंय, पुन्हा treatment अर्धवट सोडून तसाच त्रास होणार ना. मग आई ला बोलले - खरं सांग आई, मी लहानपणापासून तुला जसा त्रास दिला त्याचा वचपा काढतेयस ना तू, अगदी माझ्यासारखी वागतेयस.त्यावेळी आई थोडी हसली होती,
गेल्या कित्येक दिवसात...
TB च्या टेस्ट positive आल्या, बरेच आजार एकत्र वाढत चालले होते. तिसऱ्या दिवशी confirm झालं की काही वर्षांपूर्वी operation केलं त्यात uterus काढलं पण ovaries तशाच ठेवल्या, त्याच आता जीवघेण्या ठरल्या, ovaries मध्ये tumour वाढत गेला, And now it became malignant, संपूर्ण शरीरात तो पसरत चाललाय, एकेक अवयव निकामी करतोय, थोडक्यात तिला ovarian cancer detect झाला, with advanced stage.....
माझा धीर सुटत चालला होता, पण तरीही मी नशीबापुढे हरायला तयार नव्हते. जगात इतके चमत्कार होतात, कदाचित माझा बाबतीत सुद्धा होईल..
Dr नि माझ्यासमोर options ठेवले, chemotherapy लगेच करणं शक्य नव्हतं, तेवढी आई ची तब्येत चांगली नव्हती, खर्च तर वाढत चालले होते, दुसरीकडे कुठे न्यायचं म्हटलं तर पुन्हा एवढा जीवाला त्रास होणार.
Dr देसाई बोलले - तुझी बहीण अजून लहान वाटतेय - एवढी समज नाहीये तिला, आणि तूच एकटी सगळी धावपळ करतेय, तुला सगळा खर्च झेपणार आहे का, नाहीतर तू आई ला घरी घेऊन जा..
घरी घेऊन जाऊ?? आणि डोळ्यांसमोर तिला होणाऱ्या वेदना फक्त बघत बसू?? त्यापेक्षा हॉस्पिटल मध्ये ठेवून १% chance असेल आई ला बरं करण्याचा, तर तो पण मला सोडायचा नव्हता.
माझ्याकडे फक्त एकच उत्तर होतं - मी कर्ज काढेन पण माझं माणूस जिवंत मला घरी न्यायचंय. बाकी तुमच्यावर सोपवलं.
हॉस्पिटल च्या trust कडून दारिद्र्यरेषेखालील cancer patients ना मदत मिळते, आणि मला ती मिळणं शक्य नव्हतं. पण dr देसाई नि माझ्यासाठी letter दिलं ट्रस्ट ला द्यायला. मुंबई मधल्या बऱ्याच trust ना द्यायला applications मी ready केली. Office मधून पण मदत करायला तयार झाले. नातेवाईकांनी लगेच मदत पाठवली.
कुठेतरी आई वडिलांची पुण्याई माझा मदतीला येत होती. मला आई ची गरज होती, आणि आता त्यासाठी मी कुठेही हात पसरायला तयार झाले होते.
कसं असतं ना, आपण donation देण्यासाठी कुठल्या न कुठल्या संस्था शोधत असतो, पण आपल्या आसपास च किती लोकांना पैशांची अथवा मानसिक आधाराची गरज असते, याचा आपण कधी विचार केलाय???
ICU मध्ये ADMIT झाल्यापासून मोठी मावशी आणि काकांनी स्वामी समर्थांची पारायणं सुरू केली होती. कीर्ती rest room मध्ये बसून पारायणं करत बसायची. मी आई च्या शेजारी बसून तारक मंत्र वाचायचे.
आई च अंग खूप दुखायचं, cancer ने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती, तिच्या वेदना बघवत नव्हत्या, मग मी तीच अंग चेपत राहायचे, तिला धीर द्यायचे, की एवढ्या सगळ्यांना स्वामी समर्थ मदत करतात, आपल्यालाही करतील.
पण जगातला कोणताही देव माझा मदतीला आला नाही. आजही मी रोज देवासमोर निरांजन लावते, तेही आई ने दिलेलं आहे म्हणून. आता तर सगळ्यावरचा विश्वासच उडालाय. आता समोर देव दिसला की सवयीप्रमाणे नमस्कार केला जातो, पण यंत्रवत. मग मनात येतं, तेव्हा का नाही माझ्या मदतीला आला. असेल तर येईल ना..
आई ला आता जेवण गिळताना त्रास व्हायला लागला, dr नि central line टाकायचा विचार केला. प्रत्येक declaration वर आई ची मी parent म्हणून सही करताना खूप भीती वाटायची, आपला निर्णय बरोबर असेल का, पण माझाकडे दुसरा option तरी काय होता???
Central line टाकल्यावर आईच बोलणं बंद झालं आणि माझं tension वाढलं. ती रागाने सगळं ओढून काढायला लागली. ती अशी लहान मुलीसारखी वागायची मला सांभाळताना नाकी नऊ यायचे. एकदा तिला बोलले - अगं असं करू नको, dr आपल्याला हाकलावून देतील, तर ती अजून तशीच वागायला लागली. अशी परिस्थिती आली की मी सुद्धा रडतेय आणि ती सुद्धा आणि आम्ही दोघी परिस्थितीपुढे हतबल झालो होतो.
आता जर देवाने माझी मदत केली नाही तर जगातल्या सगळ्या देवाचं विसर्जन करेन, सगळे मेलेत मग माझ्यासाठी..
आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेली. शेवटचा उपाय राहिला - ventilator.
आपलं मन पण किती वेडं असतं, आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला की जाणवतं, dr फक्त दाखवायला hopes देत होते, आणि मी वेड्यासारखी आई हवी म्हणून सगळे उपाय करत होते. परिस्थिती माणसाला किती अगतिक करून टाकते.
११-फेब्रुवारी-२०१८
आज आईची नजर ओळखीची वाटेना. मी नेहमीसारखा तिचा हात हातात घेऊन बोलत होते. ती एकटक माझाकडे बघत होती.
Doctor बोलले - patient ने respond करणं बंद केलंय, better we will remove all life supporting system.
ICU मधल्या त्या multiparameter Patient monitor चा आवाज गेले १५ दिवस मेंदूत भिनलाय. पण आता सगळेच आवाज बंद झालेत....
“तिचाच” आवाज बंद झालाय..कायमचा..
एका महिन्यात सगळा खेळ संपला. देवावरची श्रद्धा पण नशीबापुढे हरली.
सगळे मला नावं ठेवायचे - आई-वडिलांनी लाडवून ठेवलेली, वागण्या-बोलण्याची जाण नसलेली एक मुलगी.
तेच सगळे आता म्हणतात आईचं केवढं केलं पोरीनें, एखाद्या आईने पोटच्या पोरीचं करावं तसं.
पण माझी image सुधारण्यासाठी एवढी मोठी किंमत मोजायची नव्हती मला.
नाही व्हायचंय मला माझ्या आईची आई.
मला तिची मुलगीच बनुन राहायचं.
मला आई हविये. त्या लाडवलेल्या मुलीची आई!
- सुप्रिया घुडे
(११-फेब्रुवारी-२०१९)

निशब्द....
ReplyDelete😔
Deleteनिःशब्द
ReplyDeleteमाझी ही अशीच गोष्ट. आम्ही ही दोघीच बहिणी तुझ्या सारख्याच. माझीच कहाणी मीच वाचतेय असं वाटलं . मी ही असंच धीराने तोंड दिलं सगळ्याला तुझ्या सारखंच. मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या आईला मी माझ्या समोर अग्नीच्या आधीन होताना पाह्यलंय. मरे पर्यंत न विसरणाऱ्या या आठवणी. तु ही खुप धीराची आहेस. सावर स्वतःला .
ReplyDelete