लेण्यांच्या देशा - रवींद्र गोळे
लेण्यांच्या देशा - रवींद्र गोळे राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।। कवी गोविंदाग्रज यांच्या गीतातील या २ ओळी. महाराष्ट्र ज्यांनी 'पाहिलाय' त्यांनाच उमजतील. लेण्यांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रातील अग्निजन्य खडक उपयुक्त आहे. देशात एकूण बाराशे लेणी आहेत. त्यापैकी ८०% म्हणजे ८०० लेणी महाराष्ट्रात आहेत. यावरच लेखक रवींद्र गोळे यांचं हे पुस्तक - 'लेण्यांच्या देशा'. या पुस्तकात महाराष्ट्रातल्या सर्व लेणी समूहाची दखल घेतली आहे. लेखक वाचकाला ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, कलात्मक पार्श्वभूमी देऊन लेण्यांकडे पाहण्याची दृष्टी विकसित करतात. • लेणी म्हणजे बौद्ध भिक्षूंची विश्रामगृह होती, त्यांना संस्कृतमध्ये लयनम् व प्राकृतमध्ये लेणं म्हणतात. भारतातील पाहिलं ज्ञात लेणं 'बाराबार' हे बिहार राज्यात आहे आणि महाराष्ट्रातील 'भाजे लेणं' हे सर्वांत जुनं आहे. • लेण्यातील शिल्प, मांडणी यांच्या आधारे लेण्यांची विभागणी ३ गटांत होते - बौद्ध, जैन आणि हिंदू (ब्राह्मणी) • बौद्ध लेण्यांचे पुन्हा २ प्रकार - विहार आणि चैत...