आर्यभट्ट - दीपाली पाटवदकर

आर्यभट्ट - दीपाली पाटवदकर



भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन तर्फे 'चित्रमय भारत भारती' हा संकल्प हाती घेतलेला आहे. त्यात काही महान दार्शनिक व आधुनिक शास्त्रज्ञांची चरित्रे चित्रमय स्वरूपात वाचकांसमोर सादर केलेली आहेत. त्यातील एक - आर्यभट्ट.
या पुस्तकात माहिती मिळते ती खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ, ५ व्या शतकातील पाहिले आर्यभट्ट यांची.
आपल्याला माहीत आहेच की भारताने पहिला उपग्रह अवकाशात सोडला त्याला आर्यभट्टांचे नाव देण्यात आले होते. पुण्यातील IUCCA मध्येही त्यांचा पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो. नैनिताल मधील खगोलशास्त्र संशोधन केंद्रालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे.
अशा या महान व्यक्तीच्या कार्याची माहिती या पुस्तकात मिळते.
आजकालच्या पिढीला भारतीय शास्त्रज्ञांची माहिती क्वचितच असते. त्यामुळे मुलांना वाचण्यासाठी हे उत्तम पुस्तक आहे.
आर्यभट्टीय ग्रंथातील  काही मोजके गणितविषयक श्लोक - formulae/theorems खूप छान रीतीने मांडले आहेत.
लेखिका दीपाली पाटवदकर यांची प्रत्येक गोष्ट सहजरित्या उलगडून दाखवायची हातोटी त्यांच्या आधीच्या पुस्तकांमध्ये आणि लेखांमध्ये मी पाहिलेली आहे, त्यामुळे इथेही आर्यभट्ट सोप्या शब्दांत त्या मांडतात.
आवर्जून वाचावं असं हे पुस्तक. त्या निमित्ताने आपल्या भारत देशाला लाभलेल्या संपन्न इतिहासाची ओळख होईल.

हे आणि इतर पुस्तके खालील लिंक वर पाहू/मागवू शकता -
www.kalaapushpa.WordPress.com/category/catalogue/books


 ~ सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर