Lockdown मधले पाककौशल्य भाग १
Lockdown मधले पाककौशल्य भाग १ या आठवड्यातले काही पदार्थ, कामामुळे उसंत मिळत नव्हती त्यामुळे फक्त फोटो काढून ठेवले, विचार केला करू नंतर upload. बरं फोटो वाढतच चालले आहेत तर म्हटलं आजतरी photostory टाकू 🙂 • चैत्रान्न ~ पालक पराठा/ठेपले ~ काकडी • मटार पालक उसळ ~ कोबीची फोडणी घालून पचडी/कोशिंबीर • कैरीचं लोणचं • डाळ-भात-लोणचं-बटाट्याची भाजी ~ घरात बनवलेलं आमरस ~ Readymade • साबुदाणा खिचडी • शेवयाची खीर • चैत्रान्न ~ पालक पराठा/ठेपले ~ काकडी यावर्षी कैऱ्या मिळतील असं काही वाटत नव्हतं. त्यामुळे दरवर्षी चा चैत्रान्न चा नेम चुकणार असाच मनात विचार येत होता, तेवढ्यात इथल्या भाजीवाल्याने कैऱ्या आणल्या. चैत्रान्न साठी ~ हिरव्या मिरच्या, लाल सुकी मिरची, लवंग, काळीमिरी, हिंग, हळद, चमचा भर उडीद डाळ, असतील तर शेंगदाणे किंवा काजू, आल्याचे छोटे तुकडे यांची फोडणी दिली. त्यात जेवढं आंबट सोसेल तेवढ्या कैऱ्या किसून mix केल्या. त्यात आधी बनवलेलं भात घातला. आणि सगळं छान मिक्स करून गॅस बंद करून झाकून ठेवला. तो aroma आतल्या आत मुरायला हवा. पालक ठेपले ~ एक जु...