Work From Home

Work From Home



"असं जेवण माया(आमची बाई) रोज बनवेल तर..."  🤤
आज egg बिर्याणी बनवली होती मी, तर ती खाऊन माझ्या बहिणीचे हे उद्गार 🤓
मी - "ती सकाळी येते hardly तासभारसाठी. आपली ऑफिस ला जायची गडबड. ती तेवढयात चपाती, भाजी, कधीतरी आमटी, झाडू-पोछा, भांडी घासणार की जेवण टेस्टी होतंय की नाही ते बघत बसणार.. वेळेअभावी तिच्याकडूनही जास्त अपेक्षा नाही ठेवू शकत"

दोन एक वर्षांपूर्वी मीच सगळी कामं करायचे. तेव्हा वेळेत ऑफिस ला येणं-जाणं पण होतं म्हणा. आता जबाबदाऱ्या वाढल्या, तसं वेळेत घरी येणं जमेनासं झालं . त्यात आजारपणामुळे कामाला बाई ठेवणं भागच होतं. तब्येत बरी झाल्यावर तिला काढायचं पण जीवावर आलं, कोणाचं आपल्यामुळे घर चालतंय तर उगाच का ना. त्यात बिचारीचा स्वभाव चांगला, gossiping नाही करत बसत, मग काय, केलं तिला continue.

अध्ये मध्ये स्वतःच्या घरचे, लेकाचे lockdown मधले फोटो मला व्हाट्सअप्प वर पाठवत असते ती 😀

पण मुद्दा असा की तिने बनवलेल्या पदार्थांना taste कशी आणायची? 😃

तर सगळीच आम्ही work from home करतोय तर माझ्या बहिणीच मत की "तिलाही तू work from home दे" 😲
म्हटलं "आता म्हणजे काय करु?" 🤔
"तर तिला रोज बनवलेल्या पदार्थांचे video करून पाठव whatsapp ला, आणि सांग तिला हे सगळे पदार्थ शिकून घे, आणि lockdown उठल्यावर पुन्हा कामावर रुजू झालीस की हे सगळे पदार्थ तू बनवून खाऊ घालायचे आम्हाला"  🤣

म्हटलं हे भारी आहे 😃 असाही एक प्रकार, work from home चा 👩‍🍳

०३.मे.२०२०

~ सुप्रिया घुडे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर