Lockdown मधले पाककौशल्य भाग १


Lockdown मधले पाककौशल्य भाग १

या आठवड्यातले काही पदार्थ, कामामुळे उसंत मिळत नव्हती त्यामुळे फक्त फोटो काढून ठेवले, विचार केला करू नंतर upload. बरं फोटो वाढतच चालले आहेत तर म्हटलं आजतरी photostory टाकू 🙂

 • चैत्रान्न ~ पालक पराठा/ठेपले ~ काकडी
 • मटार पालक उसळ ~ कोबीची फोडणी घालून पचडी/कोशिंबीर
 • कैरीचं लोणचं
 • डाळ-भात-लोणचं-बटाट्याची भाजी ~ घरात बनवलेलं
आमरस ~ Readymade
 • साबुदाणा खिचडी
 •  शेवयाची खीर

 • चैत्रान्न ~ पालक पराठा/ठेपले ~ काकडी

यावर्षी कैऱ्या मिळतील असं काही वाटत नव्हतं. त्यामुळे दरवर्षी चा चैत्रान्न चा नेम चुकणार असाच मनात विचार येत होता, तेवढ्यात इथल्या भाजीवाल्याने कैऱ्या आणल्या.
चैत्रान्न साठी ~ हिरव्या मिरच्या, लाल सुकी मिरची, लवंग, काळीमिरी, हिंग, हळद, चमचा भर उडीद डाळ, असतील तर शेंगदाणे किंवा काजू, आल्याचे छोटे तुकडे यांची फोडणी दिली.  त्यात जेवढं आंबट सोसेल तेवढ्या कैऱ्या किसून mix केल्या. त्यात आधी बनवलेलं भात घातला. आणि सगळं छान मिक्स करून गॅस बंद करून झाकून ठेवला. तो aroma आतल्या आत मुरायला हवा.

पालक ठेपले ~ एक जुडी पालक चे ३ भाग केले, एकभाग पालक ठेपले बनवण्यासाठी. दुसरा भाग दाल-पालक साठी. आणि तिसरा भाग मटार पालक बनवायला.
तर ठेपले बनवण्यासाठी पालक बारीक चिरून घेतला. त्यात मिरची आणि लसूण बारीक चिरून टाकली. सगळं मिश्रण मिक्सर ला एकजीव केलं, पाणी न घालता, करण पालक ला पाणी सुटतं. मग चपातीच पीठ मळतो त्यात हे पालक मिश्रण, मीठ, तेल, ओवा, जिरं घालून चांगलं एकजीव केलं. ५ मिनिटं झाकून ठेवून मस्त पोळ्यांसारखं शेकून घेतलं.

 • मटार पालक उसळ ~ कोबीची फोडणी घालून पचडी/कोशिंबीर

मटार पालक उसळ ~मटार पनीर करतो तसंच फक्त पनीर available नव्हतं त्या ऐवजी पालक puri टाकली. हल्ली मला वाटण बनवायची एवढी आवड लागलेली आहे की कोणतीही gravy वाली उसळ/भाजी करायची म्हटली की माझं वाटणाशिवाय जमतच नाही 😁 आता घरीच आहे म्हणून एवढी कौतुक चालू आहेत, माझा कामवाली बाईला तर वाटण बनवायचा खूप कंटाळा येतो, वेळखाऊ काम म्हणे. 
Gravy साठी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, खोबरं मस्त तेलात परतून घ्यायचे. त्यात खडे मसाले जेवढे असतील तेवढे आपल्या चवीप्रमाणे मी घालते त्यात. मग हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना मिक्स करून घ्यायचा. हे सगळं थंड झालेलं मिश्रण मिक्सर ला लावून एकजीव  करून घ्यायचं. माझ्याकडे पाटा-वरवंटा इथल्या घरात नाहीये म्हणून, नाहीतर lockdown मध्ये मस्त वापर केला असता 😊 आता ह्या मिश्रणाला हिंग, राई, जिरं, हळद, मसाल्याची फोडणी देऊन मटार टाकायचे, थोडे काजू पण टाकायचे आणि शिजू द्यायचं. 

ओला मसाला, सुका मसाला आणि खडे मसाले यांचं गणित जर जुळलं तर तुमची receipe एकदम wow item झालीच समजा 😆

कोबीची पचडी ~ कोबीची भाजी एवढी नाही आवडत मला, त्यापेक्षा ती अर्धी कच्ची कोशिंबीर मध्ये जास्त आवडते. so पचडी साठी कोबी चिरून, त्याला तव्यावर हळद, हिंग, मोहरी, हिरव्या मिरची ची फोडणी दिली. आणि अर्धी कच्ची च ठेवून जेवताना त्यावर लिंबू पिळून खाल्ली. शेंगदाणे नव्हते, नाहीतर त्याच कूट पण टाकता आलं असतं.

 • कैरीचं लोणचं

साठवणीचं लोणचं यावर्षी बनवण्यासाठी तेवढ्या कैऱ्या मिळणं कठीण आहे. तर ३ छोट्या कैर्यांचे हे लोणचं. एका आठवड्यात गट्टम झालेलं आहे.

 • डाळ-भात-लोणचं-बटाट्याची भाजी ~ घरात बनवलेलं
आमरस ~ Readymade

 • साबुदाणा खिचडी नाश्त्यासाठी

हा मेनू संकष्टी निमित्त. उपवास तर धरत नाही आम्ही पण उपवासाचे पदार्थ आवर्जून खातो. 😋 साबुदाणा खिचडी तर मी स्वतःहून पहिल्यांदाच बनवली होती 🤗
आदल्या रात्री साबुदाणे पाण्यात धुवून झाकून ठेवले, तेवढ्या ओलेत्याने ते फुगले बऱ्यापैकी. सकाळी बनवण्याआधी त्यांना चवीपुरतं मीठ चोळून घेतलं.. खिचडी बनवताना कढीपत्ता, मिरची, हिंग, मोठी, उकडलेले तुकडे करून बटाटे, शेंगदाणे घातले. त्यात भिजवलेला साबुदाणा घातला. थोडासा पाण्याचा भपकारा मारून शिजवून घेतले.

 •  शेवयाची खीर
आज १० मे - आई बाबांचा लग्नाचा वाढदिवस. मग काहीतरी गोड स्वतः बनवलेलं म्हणून खीर. वाटीभर शेवया तुपावर खरपूस भाजल्या. जेवढ्या छान भाजल्या जातील तेवढी खिरीचा लज्जत वाढते. मग त्यात dryfruits चा हात आखडता न घेता मारा केला 😜 brown sugar अर्धी वाटी add केली. गोड पदार्थ बनवताना शक्यतो मी brown sugar च वापरते, म्हणजे guilt free खाता येतं 😛 म्हणजे आपलं उगाच, स्वतःच्या मनाला समाधान 😝 आणि सर्वात शेवटी दूध घातलं. खीर तैय्यार 🤠

तर हे या आठवड्यातले पदार्थ. पुढच्या आठवड्यात काही नवीन बनवलं तर पुन्हा पोस्ट येईलच. 
अश्विनी ने बीटरूट कटलेट ची receipe दिलेली आहे, बघू बीट मिळाले तर बनवेन. आमचं सायलेंट मध्ये पाककृती challenge असल्यासारखं वाटतं मला 😀 ती काहीतरी बनवते आणि माझा डोक्यात खूळ सोडते 😄 त्या पालक पराठे चा पण फोटो तिने मला पाठवला, मला मस्त आवडलं हा healthy प्रकार. आणि दोनदा बनवले मी 👍

Book Review साठी थोडा वेळ लागेल. एक series वाचायला घेतली आहे, त्यातली सगळी पुस्तकं वाचून झाली की येईन review साठी 😊👍

तोपर्यंत Stay Home. Stay Safe. 🏡

~ सुप्रिया घुडे
१०-मे-२०२०

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर