गरज
गरज कपड्यांचं कपाट उघडलं - 'बायकांना नेहमी असं वाटतं, आपल्याकडे कपडे कमीच आहेत. जरी कपाट overflow होत असेल तरीही' - तसंच आता झालं माझं. सहज विचार आला मनात - 'खरंच आपल्याला एवढ्या साऱ्या कपड्यांची गरज आहे काय??' असंच होतं आपलं, कधी कुठे थांबायचं तेच कळत नाही. साठवणूक करत राहतो आपण. मग ती एखादी गोष्ट/वस्तू असो, पैसे असो नाही तर माणसं. या सगळ्याच गोष्टी मोजक्याच ठेवल्या तर नाही का चालणार? तुमचं अस्तित्व संपलं की कुठे हे सगळं तुमच्यासोबत जाणार आहे? नाही कोणती वस्तू, नाही पैसे, नाही माणसं.... माझ्या आई बाबांना नव नवीन वस्तूंचा संग्रह करायची खूप हौस होती. मार्केट मध्ये आलेली प्रत्येक नवीन वस्तू/machine आमच्याकडे असायची. गरज नसली तरी गरज निर्माण केली जायची. माझा मावस भाऊ आलेला एकदा घरी. आमच्या घरातल्या machines पाहून तो माझ्या आई ला म्हणतो - मावशी तुझाकडे जगातल्या सगळ्या मशीन्स आहेत बहुतेक 😃 popcorns बनवायचं machine, grill sandwich/chicken बनवायचं machine,fruit juice काढायचं machine, घरघंटी, बाजारात आलेली प्रत्येक नवीन भांडी.. माझ्या आईच स्वयंपाक घर म्हणजे एक उत्कृष्ट ...