Posts

Showing posts from September, 2020

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर

Image
 बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर विषयदृष्ट्या विचार करता; प्रेमभावना, सामाजिक परिस्थिती, व्यक्तिजिवन, कल्पकता प्रधान कथा, हलकी-फुलकी विनोदपर कथा असे विषय दृष्टीसमोर ठेवून या कथांचे संकलन केलेले दिसते. यातील प्रेमकथेतील नायिका या सामान्य घरातल्या, दुर्दैवी, दारिद्र्यात पिचणार्या, क्वचित अशिक्षित आहेत, परंतु त्यांच्या प्रेमाची जात उंच आहे.  कुसुमाग्रज यांनी अगदी हळुवारपणे प्रेमकथांचे भावकाव्यांशी असलेले ऋणानुबंध दर्शविले आहेत.  समाज जीवनातील परिवर्तनाचा व्यक्तिमनावर होणारा परिणाम दर्शवणारी, मनोविश्लेषण व वास्तव दर्शन यांचा मेळ साधून सामाजिक आशय प्रकट करणारी कथा, हा कुसुमाग्रज यांच्या कथांचा महत्वाचा भाग आहे.  एका ठराविक रिंगणात कथा फिरवत न ठेवता कुसुमाग्रजांनी यांत आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही बाजूनी विविधता व नावीन्य आणले आहे. कुसुमाग्रजांची ही व्यक्तिचित्रणे निष्ठा मानणारे आणि जपणारे असामान्य माणसे आहेत, आणि यांत पुरुष पात्रांपेक्षा स्त्री पात्रेच अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहेत, हे खास नमूद करावेसे वाटते.  काव्यमय भाषाशैली हे कुसुमाग्रजांचे सामर्थ्य आहे.  "स्त्रीत्व ...

आम्ही मांजरप्रेमी

 आम्ही मांजरप्रेमी दिवेलागणीला दिवाबत्ती करायला पुढचा दरवाजा उघडायला आणि ही समोर यायला 🐈 गावाला ठीक पण इथे buildings मध्ये देशी मांजर क्वचितच कोणी पाळत असेल, त्यांना त्या विदेशी मांजारांसारखं घरात डांबून नाही ठेवू शकत ना.  ही अचानक पाहुणी कुठून आली कोण जाणो. तिचं म्याव - म्याव सुद्धा घसा बसल्यासारखं वाटलं.  शेजाऱ्यांचा दरवाजा उघडा होता, त्यांना विचारलं - तुमचं आहे काय ओ हे?  ते पण बोलतात - नाही ओ, तिला दूध दिलं तर नाही तोंड लावलंन. मी बिस्कीट दिलं खायला. म्हणजे आमच्याकडे मांजर होतं, तिला आई न चुकता मारी बिस्कीट द्यायची. ठरलेला शिरस्ता. ती आणि तिचं पोर 'चिंगू' चट्टा- मट्टा करायचे. पण हिने नाही खाल्लं. पुन्हा माझ्याकडे बघून - म्याव - म्याव. दुपारची कच्च्या केळ्यांची shallow fry केलेली कापं होती ती दिली. ते सुद्धा नको झालं त्या बाईला, म्हणजे मांजरीला. 🐱 बहीण बोलली - कदाचित non vegetarian असेल. आता तिचा कोणता आवडीचा पदार्थ काय माहीत. आमच्या जुन्या घरात एक मांजर आहे - 'जितू' त्याला टोमॅटो खूप प्रिय. आम्हाला टोमॅटो नेहमी फ्रीज मध्ये ठेवावे लागतात त्यामुळे. बाहेर एखादा चु...

Baby Sitting

Image
 Baby Sitting आज आम्हा दोघींकडे साधारण ३ तासांसाठी baby sitting च काम होत. म्हणजे तसंही आम्ही कुठेही असलो; इथे किंवा रत्नागिरीत म्हणा, तर जवळपासची लहान पोरं आमच्या घरात असतात. आज आमच्या शेजारील(दांपत्य) घरातलं समान आणण्यासाठी DMart ला जायचे होते. दोघा लहान मुलांना घेऊन या covid परिस्तिथी त बाहेर पडायचं टेन्शन आलेलं त्यांना. त्यामुळे मोठ्या तन्मय ला आमच्याकडे २-३ तासांसाठी सोडून त्यांचं जाऊन यायचं ठरलं. मग तन्मय school ला जातो तसं खाऊ-पाणी घेऊन आमच्याकडे दाखल झाला 😀 माझं तर ऑफिस च काम चालू होतं. माझ्या बहिणीसोबत त्याचं Ludo, साप शिडी, housie खेळून झालं. मग शाळेतल्या- building मधल्या गप्पा गोष्टी झाल्या.  लहान मुलांसमोर काही महत्वाचं बोलू नये, कुठे काही पचकतील सांगू नाही शकत 😀 दुसऱ्या एका शेजारच्या घरातल्या गोष्टी, ज्या त्याच्या आईसमोर बोलून झाल्या असतील, त्या त्याने आम्हाला सांगून टाकल्या 😂 तो आहे north indian परंतु हिंदी, गुजराती, मराठी, इंग्रजी सगळ्या भाषा सरमिसळ बोलतो. आणि आमच्या बहिणीची हिंदी तर इतकी भयानक 😄 त्या दोघांचा चेष्टामस्करी संवाद चालला होता - ती - कोनसे स्टॅण्...

पाखरमाया - मारुती चितमपल्ली

Image
पाखरमाया - मारुती चितमपल्ली पुस्तकाच्या नावावरून असं वाटलं होतं की फक्त पक्ष्यांची माहिती असेल. वाचायला सुरू केल्यावर लक्षात आलं; पक्षीच नव्हे तर जलचर, उभयचर, प्राणी, कीटक, आकाश, पर्जन्य, वृक्षसंपदा, अशा कितीतरी गोष्टी आणि त्यासोबत त्यांचे विणलेले अनुभव, या सगळ्यांचा एकत्रित मिलाप म्हणजे 'पाखरमाया' आहे.  मला कॉलेज मध्ये असताना Botony आणि zoology चा अभ्यास करताना nursery आणि poultry च डोळ्यांसमोर यायची, आणि त्यात ते लॅटिन biological नावं लक्षात ठेवायची म्हणजे... चितमपल्ली यांचे हे दुसरं पुस्तक वाचतेय मी, त्यांचे अनुभव वाचताना त्यापालिकडच्या जिवंत निसर्गाची ओढ लागते. महत्वाचं म्हणजे प्राणी पक्षी, वृक्षांची त्यांनी दिलेली मराठी किंवा आदिवासी बोली भाषेतील नावं इतकी साजेशी वाटतात, म्हणजे उगाचच आपण इंग्लिश नावं शोधत असतो असं वाटतं.  आपल्या पूर्वजांना असलेलं विस्तृत, सखोल आणि अचूक ज्ञान आणि त्याचा चितमपल्ली यांनी केलेला अभ्यास श्लोकासाहित दिलेला वाचताना अचंबित व्हायला होतं. चितमपल्ली हे साक्षात वनऋषीच. म्हणतात ना एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या सहवासात तासभर रहा, सतत नवीन शिकायला मिळतं. त...