Baby Sitting

 Baby Sitting


आज आम्हा दोघींकडे साधारण ३ तासांसाठी baby sitting च काम होत. म्हणजे तसंही आम्ही कुठेही असलो; इथे किंवा रत्नागिरीत म्हणा, तर जवळपासची लहान पोरं आमच्या घरात असतात. आज आमच्या शेजारील(दांपत्य) घरातलं समान आणण्यासाठी DMart ला जायचे होते. दोघा लहान मुलांना घेऊन या covid परिस्तिथी त बाहेर पडायचं टेन्शन आलेलं त्यांना. त्यामुळे मोठ्या तन्मय ला आमच्याकडे २-३ तासांसाठी सोडून त्यांचं जाऊन यायचं ठरलं. मग तन्मय school ला जातो तसं खाऊ-पाणी घेऊन आमच्याकडे दाखल झाला 😀

माझं तर ऑफिस च काम चालू होतं. माझ्या बहिणीसोबत त्याचं Ludo, साप शिडी, housie खेळून झालं. मग शाळेतल्या- building मधल्या गप्पा गोष्टी झाल्या. 

लहान मुलांसमोर काही महत्वाचं बोलू नये, कुठे काही पचकतील सांगू नाही शकत 😀 दुसऱ्या एका शेजारच्या घरातल्या गोष्टी, ज्या त्याच्या आईसमोर बोलून झाल्या असतील, त्या त्याने आम्हाला सांगून टाकल्या 😂

तो आहे north indian परंतु हिंदी, गुजराती, मराठी, इंग्रजी सगळ्या भाषा सरमिसळ बोलतो. आणि आमच्या बहिणीची हिंदी तर इतकी भयानक 😄 त्या दोघांचा चेष्टामस्करी संवाद चालला होता -

ती - कोनसे स्टॅण्डर्ड मे हो?

तो - Sr. Kg 

ती - ये क्या रेहता हैं?

तो - अरे रेहता हैं दीदी.

ती - मै देख, बालवाडी से सीधा पेहली मैं गयी?

तो - बालवाडी?

ती - तुमको नही पता बालवाडी? श्या.. तुम जैसे ढ लोक वो jr sr kg जाते हैं. हम जैसे हुशार लोक बालवाडी जाते हैं.

(मग माझ्याकडे point out करून)

ये देखो, ये बडी दीदी तो extra max pro हुशार हैं. वो तो बालवाडी भी नही गयी, वो तो डिरेक्टली पहिली मैं जाके बैठ गयी.. 😆😅😄😃🤣


यावर मला हसावं की रडावं तेही कळेना 😝😂


मध्येच त्याला आई बाबांची आठवण यायला लागली. अशा वेळी पोरं रडायला लागायची भीती असते. मग त्याने आपल्या टिफिन मधली biscuits, सफरचंद खाल्ली. 😊 मध्येच एक राऊंड आमचा तिघांचा maggi खाऊन झाला 😋🍝


मग जरा change म्हणून आम्ही त्याच्या हातात वही आणि शिसपेन्सिल दिली. आणि त्याने सहज बोलून - चलो मैं एक drawing निकालता हु, असं बोलत बहिणीचं चित्र काढलं. अगदी नाक चष्मा व्यवस्थित. आम्ही अवाक. 

त्याचा बाबा सुद्धा आर्टिस्ट आहे. अगदी लहानपणापासून पोराचे पाय पाळण्यात दिसतात, ते असं.

मी बोलले - मेरा चित्र निकाल, देख मेरी वेणी भी दीखनी चाहीये. आणि त्याने मी लॅपटॉप समोर काम करत बसली आहे, अगदी वेणी सकट असं चित्र काढलं 😃😃😄😅

आम्ही त्या चित्रांमध्येच खुष 😃

अशी आजची दुपार तन्मय ने अगदी सत्कारणी लावली 👩‍🎨🎨👦

 ~ सुप्रिया घुडे

१९-सप्टेंबर-२०२०

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर