काळेपाणी ~ स्वातंत्र्यवीर सावरकर
काळेपाणी ~ स्वातंत्र्यवीर सावरकर 'मला काय त्याचे' अथवा 'मोपल्यांचे बंड' या पहिल्या कादंबरी नंतर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' हा आपल्या आत्मचरित्राचा भाग लिहिला होता. ह्या आत्मचरित्रात अंदमानात काळ्या पाण्यावर सश्रम कारावासाची भयानक शिक्षा भोगणार्या राजबंद्यांचे जीवन दिलेले आहे. औट घटकेचे टीचभर हिंदू राज्य ही संकल्पना 'माझी जन्मठेप' मध्ये आलेली आहे. ह्या पुस्तकाचे गुजराती भाषांतर झाल्यानंतर काही राजकारण्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे 'माझी जन्मठेप' पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. त्याप्रमाणे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी 'माझी जन्मठेप' पुस्तकावर दि. १७ एप्रिल १९३४ ला बंदी घातली. म्हणून सावरकरांनी 'काळे पाणी' ही दुसरी कादंबरी लिहिली. यात त्यांनी अंदमानच्या बंदीगृहातील अत्यंत कष्टकारक, तापदायक, अमानुष गुंडगिरीचे जीवन कसे जगावे लागते होते, ते दर्शविले आहे. हे कथानक एका बंदिवानाच्या न्यायालयातील अभियोगावर आधारलेले आहे. रफीउद्दीन, योगानंद, मालती आदि नावे काल्पनिक असली तरी त्या अभियोगांतील मूळच्या नावाशी मिळतीजुळती च आहेत. सुप्रसिद्ध गायक...