Lockdown मधील पाककृती भाग ३
Lockdown मधील पाककृती भाग ३
🍱 भाकरी आणि वांग्याचं भरीत
आजची foodstory खास भाकरी साठी आहे 😉
lockdown मुळे कामाला बाई यायची बंद झाली त्यामुळे आमचं चपात्या / पोळ्या खायचं बंद झालं. त्यात आम्ही कोकणातली कायम भात खाणारी माणसं. करायला पण सोयीस्कर. पण डॉक्टरना आमचं ते सुख काही पाहवलं नाही 😁 भात बंद आणि पोळी/ भाकरी खायला सुरू करा म्हणे. झाली का पंचाईत. इथे चपात्या नाही बनवता येत मग भाकरी तर लांबची गोष्ट.
आता वेळ मिळतोच आहे तर थोडाफार जेवण बनवायला शिकूनच घेऊ म्हटलं. आधी चपात्या बघू, घडीच्या नाही फुलके तरी. एक आठवड्यात नाही म्हटलं तरी जम बसला. आणि गेले २-३ महिने मस्त पोळ्या बनायला लागल्या 🤗
या महिन्यात दळण घेताना विचार केला की multigrain पीठ वापरून पाहू. तसं आमच्या चक्की वाली ला सांगितलं, प्रमाण काय ते तुम्ही बघा. पीठ घरी आणलं खरं, पण चपात्या काही व्यवस्थित होईनात. काहीतरी गडबड झाली खरी. पोळी पेक्षा भाकरी च पीठ जास्त वाटतंय. कॉल केला तिला, नक्की कसलं पीठ दिलंत, प्रमाण काय. तर म्हणजे ज्वारी-बाजरी-नाचणी ९०% आणि गहू १०%. 🤦
अहो, मग हे भाकरी च पीठ नाही का झालं. आता काय बोलून उपयोग. चला आता भाकरी शिकायला लागणार पीठ संपेपर्यंत 🙎
पाहिले दोन दिवस त्या भाकर्यांची दुर्दशा झाली 🙍
परंतु आता भाकरी सुद्धा जमायला लागली 😸
आधी पोळपाटावर च थापायचो, मग ताटलीत छान थापली जाते भाकरी हे लक्षात आलं.
'आधी हाताला चटके, मग मिळते भाकर, याचा प्रत्यय येतोच भाकरी तव्यापर्यंत पोहोचली की 🙆
अगदी ती पातळ, आगीवर फुलत वगैरे नाही. पण खाण्यालायक असते 😄 हातावर भाकरी थापणे इतक्यात तरी शक्य नाहीये 😋
या कोरोना काळात नाही म्हणायला एक फायदा झाला, जेवण बनवायला शिकल्या पोरी 😁
मग आज भरीताचा menu केला. शेगडीवरच वांग भाजून, सगळा आतला गर काढून, त्यात कांदा- ठेचलेल्या मिरच्या-कोथिंबीर-शेंगदाणा पूड-थोडं खोबरं-मीठ घालून कालवलं. गरमागरम भाकरी सोबत लसूण-खोबरं सुकी चटणी होतीच. मग काय, असा ताव मारला की यंव! 🤤
Comments
Post a Comment