निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा - मिथ्य आणि सत्य

 पुस्तक : निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा - मिथ्य आणि सत्य

लेखिका : विभावरी बिडवे






नागरिकत्व कायदा, 1955 हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे, ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटींची माहिती देण्यात आली आहे.

या कायद्यात आतापर्यंत पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे - 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015.


‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक-२०१६ ’ याद्वारे १९५५ सालाच्या कायद्यात दुरूस्ती केले गेली, ज्याद्वारे मुस्लिम देशांमधुन भारतात सीमा ओलांडून आलेल्यांना बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाणार नाही.

अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद असलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, ८ जानेवारी २०१९ रोजी लोकसभेत अखेर मंजूर झाले.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले होते.

धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल, असं भाजप सरकारनं म्हटलं आहे. मात्र विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका केली आहे.

हे कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली. त्यामुळेच दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, उत्तर प्रदेशमधील अलिगढ मुस्लीम विद्यापीठ यांच्यासह अनेक ठिकाणी विद्यार्थी आंदोलनं सुरू होती.

तर काय आहे हा सुधारित नागरिकत्व कायदा??

या आणि संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न केला आहे "निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा" या पुस्तकात लेखिका विभावरी बिडवे यांनी.

त्यासाठी लेखिका आपल्याला सर्व पार्श्वभूमी समजावून सांगत विरोधाची करणे काय आहेत याचीही मीमांसा सवित्तर देतात. 

भारत - पाकिस्तान / बांगलादेश विभाजन, आंतरराष्ट्रीय निर्वासित कायदे, भारतीय कायदे, अवैध घुसखोर आणि स्थलांतरित, अफगाणिस्तान इतिहास, विरोध - निदर्शने आणि त्यांची कारणे ही सर्व अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकातून लेखिकेने दिलेली आहे.

प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचावं / संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे.


हे पुस्तक मी  'ज्ञानसाधना' (राजीव लूटे, परभणी, संपर्क क्र. 9421605019) यांच्याकडून खरेदी केले आहे. 


#CAA #NRC #NPR


Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर