विश्वास
विश्वास
आज दुपारी ऑफीस ला जाताना local मधून उतरून मेट्रो मध्ये बसले. Late निघाल्यामुळे बसायला जागा मिळाली. थोड्या वेळात शेजारी एक बाई आपल्या लहान मुलाला घेवुन बसली. खूप गोड, छोटंसं, आताच मान सावरायला लागलेलं बाळ होतं.
मी शक्यतो प्रवासात अनोळखी लहान मुलांचे लाड करायचे टाळते.. for some security reasons..
बाजूला बसल्यावर बाळाने लगेच माझा दंड धरला.. चौहुबजूने उत्सुकतेने बघत होत. त्याच्या आई ला कळलं बाळाने माझा हात धरून ठेवलाय.. मग ते बाळ सगळीकडे नजर टाकून त्याच्या आई कडे पहायचं, मग माझ्याकडे बघून दात नसलेल्या हिरड्या दख्वत हसायचं 😘
मग माझा हात हातात घेतला आणि माझ्या बोटांशी खेळायला लागला.. wow त्याच्या नाजूक बोटांचा स्पर्श 😘😍माझं अर्ध बोट म्हणजे त्याचं एक बोट असेल 😙इवलुशी बोटं.. इवलस बाळ 😙
तो मऊ, लुसलुशीत स्वर्गीय स्पर्श... 💓बास्स मी अनुभवत होते.... 💖
माझी उतरायची वेळ आली पण त्याची पकड काही सुटेना 😢मनाविरुद्धच पकड सोडवली मग ते अजूनच हसत जवळ यायला लागलं 😭
त्याच्या हाताची kissi घेवून उठले मी तिथून...
Door जवळ जाताना लक्षात आलं, मी उठले म्हणजे माझ्या जागी दुसरी कोणी बाई बसणार, मग ती त्याला हात लावणार 😞
Ohh my god.. त्या १० मिनिटांच्या प्रवासात त्या अनोळखी बाळासाठी मी possessive झाले होते 😪
पाठी वळून पाहिलं तर माझ्या जागी दुसरी बाई बसली होती आणि ती त्या बाळाला हात लावायला पाहत होती 😔
पण बाळाच्या आई ने लगेच त्या बाळाला दुसऱ्या कडेवर घेतलं आणि बाळाला खिडकीबाहेर च जग दाखवायला लागली 😊
आयुष्यात काय जिंकल्याचा आनंद झाला असेल ना मला 😍
त्या बाळाच्या आईने allow केलं होत बाळाला माझ्या जवळ यायला.. म्हणजे तिला माझ्यावर विश्वास वाटला होता.. जो कदाचित दुसऱ्या कोणत्या बाई बद्दल वाटला नसेल.. 😊
पुन्हा एकदा जाता जाता बाळाने आपले दात sorry हिरडी दाखवत bye केलं 😁😍😘
~ सुप्रिया घुडे
06-FEB-2025
Comments
Post a Comment