(मूक) साक्षीदार
(मूक) साक्षीदार
सकाळी देव पूजा करत असताना अचानक safety door वर जोरात थाप पडली - "मावशी, पटकन दरवाजा उघडता का?!!"
दारात माझ्या २ छोट्या शेजारणी उभ्या होत्या 👯
मोठी च्या हातात फुटाणे ची पिशवी आणि लाहानीच्या हातात bun मस्का.. अर्धवट खात या दोघी बहिणी दारात उभ्या...
"Please आमच्या आई ला कॉल लावून देता का?"
यांच्या आईच्या ऑफीस ला शनिवारी सुट्टी नसते. Generally अर्जंट काही आईसोबत बोलायचं असेल तर या दोघी माझ्या दारात उभ्या राहतात नेहमी अशाच 😃
मी नेहमीप्रमाणे त्यांच्या आई ला कॉल लावला, mobile speaker वर ठेवून दिला.
रिंग जातेय तोपर्यंत मोठी ने मला तिच्या हातातले फुटाणे खायला ऑफर केले.. so sweet 🥰
मी - "नको, तू खा. माझी देवपूजा अर्धवट राहिली आहे".
छोटी ला गालाला हात लावून hi केलं 🙋🏻
तिचा बाई मान जातो 🤥
मागच्या वेळी अशाच दोघी common passage मध्ये खेळत होत्या तेव्हा मी मोठीच्या गालाला हात लावला आणि चालत लिफ्ट कडे गेले. तर ही छोटी लगेच बोलते कशी - "मला नाही हात लावला तिने 😤" आणि गाल फुगवून बसली.. माझ्या तर अस काही डोक्यातही नव्हत 🥺
लिफ्ट सोडून मी परत पाठी आले आणि तिचे गालगुच्चे घेतले, पण ती चिडली होती माझ्यावर तो एक दिवस 🥺🥺
२ नंबरची पोरं जाम डांबिस असतात 😋🤣🤣🤣😄😄
तर, त्या छोटी ला गालाला हात लावून मान दिला 🥲
हा.. तर तेवढ्यात त्यांच्या आईने कॉल उचलला..
मोठी - "आई, cylinder संपला"
आई - "अरे देवा.. मावशी सुद्धा घरी नसेल ना.."
(त्यांची मावशी आमच्या च building मध्ये वरच्या floor ला राहते)
मोठी - "मावशी घरी नाहीये, lock आहे"
आई - "..."
मोठी - "आजी फोडणी देत होतीच तेव्हाच गॅस संपला.. काय करायचं.."
मी हळूच मोठी ला म्हटंल की माझ्याकडे आहे extra भरलेला cylinder, तो घे...
तर तिने चक्क डोळे मीच्कवून नको बोलली 😱😱😃
मला कळेना.. झोल क्या हैं 🤔
आणि हळूच आई ला suggest करते कशी.. "आई, बाहेरून काहितरी ऑर्डर करायचं का??"
लगेचच त्या छोटी ने सुद्धा डोळे मिचकावत आनंदाने मान डोलावली...
अच्छा, तो ये झोल है 🤣🤣🤣😃
आई - "ठीक आहे. मी ऑर्डर करते.. तुम्ही बाहेर उन्हात खेळायला जाऊ नका.."
एवढं ऐकून, फोन cut karun, मला thank you मावशी बोलून त्या दोघी ज्या त्यांच्या घरात पळत गेल्या आहेत ना...🏃🏻
मला क्षणभर कळेना नक्की आता माझ्यासमोर झालं काय 😃😃😃😄
हा एक cold minded प्लॅन होता आणि त्या प्लॅन ची मी साक्षीदार होते 😱
बरं या साक्षीदाराने मूक च रहाणं अपेक्षित आहे नाहीतर या छोट्या गुन्हेगारांचा माझ्यावरचा विश्वास उडेल आणि परत कधी माझ्याकडे कॉल करायला येणार नाहीत 🥲😬🥹😜🤣
देवपूजा करताना बोलले - "या cute गुन्ह्याला वाचा न फोडल्या बद्दल या साक्षीदाराला माफ कर रे देवा 😄"
~ सुप्रिया घुडे
०८- फेब्रुवारी - २०२५
Comments
Post a Comment