देशप्रेम
१४ ऑगस्ट २०१४. सकाळची वेळ, साधारण ०८ वाजून ४५ मिनिट … ऑफिस ला निघायला खूपच उशीर झालाय मला आज … बस ने जावं कि रिक्षा … बस ने खूपच उशीर होयील. रिक्षा आयत्या वेळी एकही थांबणार नाही. नको असेल तेव्हा ४ जण येतील समोर. शेवटी शेअर रिक्षाच्या रांगेत उभी रहिले. माझा समोर अजून १० माणसं. आज नक्की ०९.०३ ची लोकल चुकणार … "… आज ऑफिस मध्ये tri -color theme आहे. सहाजिकच दरवर्षीप्रमाणे या निमित्ताने देश प्रेम उफाळून येत सगळ्यांच, तसंच आज माझा बाबतीत झालंय. whatsapp वरच्या सगळ्या messeges ची एकदा मनात उजळणी सुरु झाली … देशाचा अपमान होयील असा काही वागू नये … तिरंगा रस्त्यावर टाकू नये … सिग्नल तोडू नये … हवालदाराला चिरी-मिरी देऊन वेळ निपटवून नेवू नये … वगैरे वगैरे … " तेवढ्यात माझा नंबर लागला आणि माझी विचारांची शृंखला तुटली. मी शेअर रिक्षात बसले. मन पण आपलं कसं असतं ना. जर मोकळी जागा मिळाली कि विचारांची गर्दी व्हायलाच हवी. रिक्षावाला जोरात रिक्षा पळवत होता. आणि लगेच पुढच्या चौकात Red सिग्नल लागला … रिक्षावाल्याची सिग्नल तोडायची लगबग सुरु झाली. आम्हा passengers ना सुद्ध...