अंथरूण पाहून पाय पसरावे
अंथरूण पाहून पाय पसरावे Scene 1 : ऐका ना, मला थोडी पैशांची गरज होती. या महिन्यात थोडे देऊ शकता का? तरी ₹10,000/- हवे होते. मी पुढच्या काही महिन्यांमध्ये देऊ शकेन. मी माझा एका मित्राला पैसे दिले होते आणि तो आता मला पैसे परतच करत नाहीये, म्हणून तुमच्याकडे मागतोय.. 🤔🤔🤔🤷🤷🤷 Scene 2 : 📞 Hello, ऐक ना, एक काम होतं तुझ्याकडे. लग्न ठरलंय ते तुला सांगितलं आहेच. खर्च हाताबाहेर जातोय थोडा. तशी सगळी व्यवस्था केली आहे. तरी पण emergency म्हणून थोडे हाताशी पैसे ठेवायचं म्हणतेय. तुला माहीत आहे ना, आपली मुलीकडची बाजू, आयत्या वेळी वर पक्षाकडून काय मागण्या येतील माहीत नाही. तर... तू थोडी मदत करू शकते का.. तरी ₹50,000/-.. बघ जेवढं जमत असेल तेवढं.. 🤷🤷🤷🤷🤔🤔🤔🤔 (बरं, हे love marriage होतं 🤦) Scene 3 : आमच्याकडे कामाला एक बाई येते - माया. ती आमच्या society मधल्या अजूनही काही ठिकाणी घरकाम करते. अशाच एका सुखवस्तू घरच्या मालकिणीला नेहमी हातात पैसे खेळवत ठेवत, shopping करायचा छंद(?!) आहे. नवऱ्याच्या पैशांवर मजा मारायची हौस. आणि हातचे पैसे संपले की त्या मालकिणीला काही सुधारेनासं होत...