अंथरूण पाहून पाय पसरावे

अंथरूण पाहून पाय पसरावे

Scene 1 :
ऐका ना, मला थोडी पैशांची गरज होती. या महिन्यात थोडे देऊ शकता का? तरी ₹10,000/- हवे होते. मी पुढच्या काही महिन्यांमध्ये देऊ शकेन. मी माझा एका मित्राला पैसे दिले होते आणि तो आता मला पैसे परतच करत नाहीये, म्हणून तुमच्याकडे मागतोय..
🤔🤔🤔🤷🤷🤷

Scene 2 :
📞  Hello, ऐक ना, एक काम होतं तुझ्याकडे. लग्न ठरलंय ते तुला सांगितलं आहेच. खर्च हाताबाहेर जातोय थोडा. तशी सगळी व्यवस्था केली आहे. तरी पण emergency म्हणून थोडे हाताशी पैसे ठेवायचं म्हणतेय. तुला माहीत आहे ना, आपली मुलीकडची बाजू, आयत्या वेळी वर पक्षाकडून काय मागण्या येतील माहीत नाही. तर... तू थोडी मदत करू शकते का.. तरी ₹50,000/-..
बघ जेवढं जमत असेल तेवढं..
🤷🤷🤷🤷🤔🤔🤔🤔
(बरं, हे love marriage होतं 🤦)

Scene 3 :
आमच्याकडे कामाला एक बाई येते - माया. ती आमच्या society मधल्या अजूनही काही ठिकाणी घरकाम करते.
अशाच एका सुखवस्तू घरच्या मालकिणीला नेहमी हातात पैसे खेळवत ठेवत, shopping करायचा छंद(?!) आहे. नवऱ्याच्या पैशांवर मजा मारायची हौस. आणि हातचे पैसे संपले की त्या मालकिणीला काही सुधारेनासं होतं. मग ती माया कडे(आपल्या घरी कामाला येणाऱ्या बाईकडे) सुद्धा पैसे मागायला पण कमी करत नाही 🙃 सगळंच अतर्क्य.

रविवारी मला थोडा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा माया शी थोड्या गप्पा मारता येतात. तेव्हा माया बोलताना या 'मालकिणी' विषयी बोलली. म्हणे मला त्यादिवशी त्या म्हणतात - "जा माया, सुप्रिया कडून पैसे मागून घेऊन ये. थोडे तुझ्यासाठी ठेव, थोडे मला दे, तिला काय परत करता येतील आरामात"
यावर काय बोलावं तेच कळेना मला. माया ने माझाकडे पैसे नाही मागितले एवढं मात्र आहे.


Scene 4 :
आमच्या building मधील एक व्यक्ती. Society committee member असल्याने तेवढीच काय ती ओळख. अचानक परवा मी office मध्ये असताना त्याचा whatsaap,
"Hello madam apse ek help chahiye tha i need urgent 5000/- if you have kindly transfer me i will return to you till 31 st of this month.
If you have then i send my bank details"

एका व्यक्तीशी फक्त hi-hello पर्यंत ओळख असताना कसे काय मागू शकता तुम्ही पैसे?
नेमकं रात्री घरी पोचताना तीच व्यक्ती building खाली भेटली. विचारलं मी - काय problem झालाय नक्की. अचानक पैशांची अडचण??
तो - "गावी गेलेलो, सगळे पैसे खर्च झाले. EMI पण जातो ना. आता काही हातात नाही उरलंय"
मी म्हटलं - "बाबा रे, EMI माझा पण जातो. माझेही खर्च आहेत."

असे एक - ना -अनेक अनुभव आहेत. असे बऱ्याच जणां बाबतीत थोड्या बहुत फरकाने होतही असेल. आपण सहज विचार करून जातो - अरे त्याला / तिला काय खर्च आहे. थोडे दुसऱ्याला पैसे दिले तर काय होतंय.
परंतु प्रत्येकाला स्वतःचे problem असतात, स्वतःचे काही खर्च असतात. तुम्ही तुमच्या मजेसाठी, शॉपिंग साठी खर्च करणार. आणि पैसे दुसऱ्याचे वापरणार.? लग्न तुम्ही करणार, मग आपल्या budget मध्येच लग्न बसेल यासाठी का नाही आग्रह धरत? प्रत्येक महिन्यात आपला किती खर्च होणार आहे तो विचार करूनच financial management का नाही करत?

ही एक वृत्ती आहे, वैचारिक वृत्ती - 'अरे तिला/त्याला कुठे संसार - मुलं-बाळ आहेत किंवा त्यांच्याकडे खूप पैसा आहे, काय होतंय दिले तर थोडे.'
अरे पण समोरच्याला अजूनही बऱयाच जबाबदाऱ्या असतील, त्या may be तुमच्याही कल्पनेच्या पलीकडे असतील.

अजून एक मानसिकता दिसून येते -
आता काय ते retired होऊन मस्त pension घेतायत, पोरं पण कमावती आहेत.
Sorry च, कोणी pension घेतंय तुमच्यासाठी नाही. या गोष्टींचा विचार करायला शिकायला हवं.

एखाद्या महिन्यात मलाही पैशांची तंगी जाणवते. सगळेच दिवस सारखेच नसतात. परंतु महिन्याच्या सुरुवातीलाच आपला खर्च कुठे होणार आहे त्याप्रमाणे पैशांचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच कोणापुढे हात पसरायची वेळ नाही येणार.

मला एवढं पटतं की पैशांची गरज असते ती फक्त आणि फक्त medical emergency ला.

माझ्या आई च्या आजारपणात जेव्हा खर्च आवाक्याबाहेर जायला लागला होता, तेव्हा सुद्धा मी कोणाकडेही पैसे मागितले नव्हते. आई ला Cancer detect झाला. Saving चे पैसे ICU च्या खर्चात आटोपत आले होते, दारिद्र्यरेषेखाली नसल्याने कोणत्या संस्थेकडून मदत मिळत नव्हती. शेवटी कर्ज काढायचा विचार केला होता, पण आईने ने तेवढं कारायचीही संधी नाही दिली...

सांगायचा मुद्दा एवढाच की 'अंथरूण पाहून पाय पसरावे'. स्वतःच्या मौज-मजेसाठी दुसऱ्याकडे हात पसरून समोरच्याला awkward करू नये. बाकी सूज्ञास सांगणे न लागो.

- सुप्रिया घुडे

Comments

  1. अगदी खरं होत असे
    हेल्पलाइन वाले पण असेच फोन करतात

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर