Happy Wedding Anniversary


Happy Wedding Anniversary



मी - "लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..." 💃🕺
बाबा - "आज १० तारीख आहे??
बरोबर... हाच तो माझ्या आयुष्यातला काळा दिवस.. माझ्या आयुष्याची वाट..."
आई - "हो वाट लागली म्हणे.. मी होते म्हणून तुमचा संसार केला "
(जगातील समस्त बायकांचा typical dialogue).. 😋



अशी चेष्टा मस्करी करत २९ वर्षं सहजीवनात काढली दोघांनी. मग ३० वा लग्नाचा वाढदिवस साजरा करायला बाबा नाही राहिले.

पण बाबा कितीही काही बोलले तरीही बाबांचा आईवर स्वतःहीपेक्षा जास्त विश्वास होता. गेल्या दहा वर्षांत ऑफिस सोडून कुठेही एकटे गेले नसतील, नेहमी आई सोबत.

माझी आजी (म्हणजेच उषाताई) शी नेहमी बाबांचे वाद चालू असायचे ☺️. नेहमी काहीतरी माय-लेकरांची भांडणं सुरू. 😋

एकदा असेच वैतागून बोलले - "हे यासाठीच ना मला तूझ्यापेक्षा जास्त शितल(माझी आई) आवडते" 🙃

झालं.. 🤦
आपल्या मुलाने तोंडावर आपल्यापेक्षा बायको जास्त आवडते म्हणणं म्हणजे.. 🙆
यावर काय महाभारत झालं असेल हे सांगायला नकोच 🏃

अशी ही दोघ, आधीसुद्धा एकत्र होते, आजही एकत्र आहेत.....
.
.
.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई-बाबा ....
🌸🌼

- सुप्रिया घुडे
१०-मे-२०१९

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर