बाप 👨👧
बाप 👨👧
स्वतः आयुष्यात कितीही वेदना सहन केलेल्या असल्या तरी लेकीच्या जराश्या खर्चटण्यानेनी जो भावुक होतो तो बाप असतो... 👨👧
हल्लीच एका छोट्याशा accident ला सामोरं जावं लागलं. मी खूप safe / slow drive करते generally, पण असो, वेळ खराब होती.
दोन्ही गुढघे फुटले, पण त्या वेळी डोळ्यातून एक टिपूस काढलं नाही. आले कशी-बशी घरी. पण नंतर अंग ठणकायला लागलं तेव्हा खूप रडले, एकदाच.
मला घरातले विचारतात,
'आई - बाबा असते तर काय केलं असतंस गं? पडल्यावरच भोकाड पसरलं असतंस ना? आता एकटी होतीस म्हणून गप्प राहिलीस. बाबा सोबत असते तर bike तिथेच टाकून घरी आली असतीस, बाबांना बोलली असतीस ऑटो ने जाऊया घरी'
खरंच आहे म्हणा ते. आई-बाबा असले की सगळे रडण्याचे लाड होतात.. व्हायचे!
शाळेत असताना silencer ने बराच पाय भाजला होता. (हो मी खूप लवकर gear bikes चालवायला सुरू केली होती 😁). तर.. पाय भाजला, घरी पोहोचले तर बाबा ऑफिस ला गेले होते आणि आई आठवडा बाजारात भाजी आणायला गेलेली. अजिबात रडले नाही, गपचूप tv लावला आणि बसले. लक्ष tv मध्ये नव्हताच. तेवढ्यात मामा आजोबा आले बोलायला, मी जेवढ्यास तेवढी उत्तरं देऊन गप्प. ते पण बाजूला बसून राहिले. खूप वेळानंतर आई आली, आणि आई दिसल्यावर जे मी भोकाड पसरलं असेल. मामा-आजोबांना पण कळेना इतका वेळ तर शांत होती पोरगी. 🤔 आई पाय बघून अजून tension मध्ये. बाबा ऑफिस मधून आल्यावर तर माझी अजून रडारड सुरू.
मी आणि बाबा जोशी डॉक्टर कडे पोहोचलो. भाजलेली काळी skin काढणं गरजेचं होतं. बाबांना कल्पना आली होती आता बराच तमाशा होणार आहे तो. 😹
nurse dressing करण्यासाठी मला घेऊन जात असताना बाबा लगेच आले -
'मी येतो सोबत. माझी पोरगी खूप नाजूक आहे. थोडं आरामात करा dressing. त्रास होईल तिला.'
nurse ने doctor कडे पाहिलं.
जोशी डॉक्टर - ' साहेब तुम्ही बसा बघू इथे माझ्यासमोर, nurse करतील व्यवस्थित सगळं.'
dressing करताना मी गुरासारखी ओरडत होते ते सांगायला नकोच 😝 मी बाहेर आल्यावर डॉक्टर बोललेच -
'अगं तुला लागलंय की तुझा बाबांना लागलंय? ते बघ किती टेन्शन मध्ये आलेत.'
बाबांजवळ आल्यावर पुन्हा माझा रडण्याचा कार्यक्रम झालाच म्हणा.
नंतर पाय बरा होईपर्यंत बाबा मला सोडायला यायचे शाळेत, तेव्हा शिक्षक बोलायचे - यासाठी पोरांचे जास्त लाड नाही करायचे. पण बाबांनी कधीच कोणती बंधनं नाही घातली माझ्यावर. पाय बरा झाल्यावर पुन्हा bike चालवायला सुरू 🙈
नंतर कॉलेज मध्ये असताना पहिल्यांदाच रूट कॅनॉल करायची वेळ आली. खूप chocolates खायचे त्यामुळे ते कधीतरी व्हायचंच होतं म्हणा 🤦🍫🍬🍭
कुडाळ मध्ये च एका डेंटिस्ट कडे गेले बाबांसोबत. 👩⚕️
पहिल्याच sitting ला मी एवढी किंचाळले असेन.
डॉक्टर ओळखीचीच होती तशी, सर काकांची माजी विद्यार्थिनी. त्यामुळे बिचारीने समजून घेतलं. पण बाबा घरी येउन आई ला बोलले - 'next sitting पासून तू जा तिच्यासोबत, ती रडते ते बघवत नाही मला '. 🤷
next sitting ला डॉक्टर बोललीच - 'मागच्या वेळी 2 patient पळवून लावलेस माझे'. 😛
आई - 'हो, तिचे बाबा पण घाबरून आले नाही यावेळी' 🤐
लहाणपणी दुधाचे दात पडत होते तेव्हा पण दात घासताना एवढी रडारड असायची माझी. बाबा उचलून घ्यायचे आणि आई दात घासायची. 👨👩👧
हॉस्टेल ला असताना फोनवर माझा आवाज जरा जरी रडवेला वाटला तर next saturday - sunday बाबा आई ला घेऊन लागलीच पुण्यास पोहोचायचे.
.
..
.
You don't know the pain until you crave a conversation with someone who is no longer alive.....
आता हे सगळं रडणं कमी झालंय, कारण ते रडणं ऐकायला - समजून घ्यायला दोघही नाहीयेत.
मनावर ठेवलेल्या दगडाची रुक्षता आता डोळ्यात आलीये...
१४-फेब्रुवारी-२०२०
🚸 आई च्या वाढदिवसाला बाबांची आठवण येतेय... 🚸
~ सुप्रिया घुडे

Comments
Post a Comment