Posts

Showing posts from June, 2021

Lockdown मधील पाककौशल्य भाग ७

Image
 Lockdown मधील पाककौशल्य भाग ७ 🔻Walnut Balls / अक्रोड चे लाडू #walnuttwists अक्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते. विसराळूपणा जास्त जाणवत असेल तर रोज सकाळी ४-५ अक्रोड खावेत. त्यासोबत प्राणायाम व ध्यानधारणा नियमितपणे करावी. यामुळे विस्मरण कमी होऊन बुद्धीवर्धन होते. अशा या अक्रोड चे मी लाडू बनवलेत. लाडू चा बेस म्हणून खोबरं वापरलंय आणि बाईंडींग एजन्ट म्हणून सोबत खजूर चा वापर केला आहे. https://cookpad.com/in-mr/recipes/15027079-walnut-balls-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82-akrod-che-ladoo-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes 🔻मेथांबा https://cookpad.com/in-mr/recipes/15015408-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-methamba-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes 🔻आंब्याचं रायतं  #amr कोकणात आंब्याच्या मोसमात कैरीचे आणि आंब्याचे अनेक पदार्थ केले जातात. त्यातीलच एक "रायतं", चवीला आंबट गोड असतं आणि साध्या जेवणाची लज्जत वाढवणारं म्ह...

Lockdown मध्ये अनुभवलेला निसर्ग १

Image
Lockdown मध्ये अनुभवलेला निसर्ग १ दररोज चालायची सवय लावून घेतली आहे. जमतील तेवढे सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा, थोडे stretching exercises आणि 1 तास walk. बस्स शरीराला थोडी शिस्त लावण्याचा उद्देश. तेवढाच आजूबाजूचा निसर्ग थोडा थोडा जवळून पाहता येतो. काही फोटो काढले आहेत. विचार केला आजच्या पर्यावरण दिनानिमित्त पोस्ट करावेत 😊🌱 पावसाळ्याधीची शेतीची कामं सुरू झाली आहेत. 🌱🌾  🌅 नेहमीचाच सूर्य पण नेहमी वेगळा भासतो 😇 अत्यंत वेड्यासारखं पसरत जाणारं Water hyacinth, Eichhornia crassipes (Mart) Solms, originating in the amazonian basin, is a warm water aquatic plant. The dense weed of water hyacinth forms dense monocultures that can threaten local native species diversity and change the physical and chemical aquatic environment, thus altering ecosystem structure and function by disrupting food chains and nutrient cycling. आकाशी झेप घेरे पाखरा 😍 #saltland भरती होती त्यामुळे मिठागरं पाण्याखाली गेली आहेत. कधी ओहोटी असताना परत एकदा फोटो काढेन... 🐟आमच्या बिल्डिंग च्या बाजूचा नाला cum ओढ...

Lockdown मधील पाककौशल्य भाग ६

Image
 Lockdown मधील पाककौशल्य भाग ६ #foodstory हल्ली lockdown मुळे रोज नवनवीन पदार्थ बनवणं चालू आहे. महत्वाचं म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती बनवतेय जिला आता कुठे हळू हळू जेवण बनवायला येतंय. 😁 म्हणजे मला आवड होती पण कधी स्वयंपाक करायला वेळ मिळत नव्हता की जास्त इंटरेस्ट घेतही नव्हते म्हणा. लहानपणापासून आई ने काही काम नाही करू दिलं, स्वयंपाक घरात फक्त पाणी पिण्यासाठी म्हणून मी जायचे. कधी शेगडी जवळ गेले नव्हते. बाबांना सुद्धा यात काहीच वावगं वाटलं नाही. आई बाबांचं एवढंच म्हणणं की अभ्यासात लक्ष दे, बाकी आम्ही आहोत.  म्हणजे मला अजूनही आठवतंय, एकदा हॉस्टेल मधून घरी आले होते सुट्टीत. ठरवलं चिकन बिर्याणी करायची, आई ची मदत न घेता. बनवली. बाबा आधी जेवायला बसले, मी काहितरी पहिलाच पदार्थ बनवला म्हणून excitement. गप गुमान खात होते. मग मी, आई आणि माझी लहान बहीण जेवायला बसलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तळलेला कांदा अजून हवा होता म्हणजे चव छान आली असती.  मी बोलले बाबांना - "सांगितलं नाही तुम्ही जेवताना.?!"  त्यावर लगेच बहीण बोलली - "बघा हे असं असतं,.. बायकोच्या हातून जरा मीठ कमी पडलं जेवणात ...