Lockdown मधील पाककौशल्य भाग ६

 Lockdown मधील पाककौशल्य भाग ६

#foodstory

हल्ली lockdown मुळे रोज नवनवीन पदार्थ बनवणं चालू आहे. महत्वाचं म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती बनवतेय जिला आता कुठे हळू हळू जेवण बनवायला येतंय. 😁

म्हणजे मला आवड होती पण कधी स्वयंपाक करायला वेळ मिळत नव्हता की जास्त इंटरेस्ट घेतही नव्हते म्हणा. लहानपणापासून आई ने काही काम नाही करू दिलं, स्वयंपाक घरात फक्त पाणी पिण्यासाठी म्हणून मी जायचे. कधी शेगडी जवळ गेले नव्हते. बाबांना सुद्धा यात काहीच वावगं वाटलं नाही. आई बाबांचं एवढंच म्हणणं की अभ्यासात लक्ष दे, बाकी आम्ही आहोत. 

म्हणजे मला अजूनही आठवतंय, एकदा हॉस्टेल मधून घरी आले होते सुट्टीत. ठरवलं चिकन बिर्याणी करायची, आई ची मदत न घेता. बनवली. बाबा आधी जेवायला बसले, मी काहितरी पहिलाच पदार्थ बनवला म्हणून excitement. गप गुमान खात होते. मग मी, आई आणि माझी लहान बहीण जेवायला बसलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तळलेला कांदा अजून हवा होता म्हणजे चव छान आली असती. 

मी बोलले बाबांना - "सांगितलं नाही तुम्ही जेवताना.?!" 

त्यावर लगेच बहीण बोलली - "बघा हे असं असतं,.. बायकोच्या हातून जरा मीठ कमी पडलं जेवणात की किती बिचाऱ्या आईला ऐकावं लागतं आणि लेकीने बनवलेल्या जेवणाला जरा चव नाही तरी गपचूप खात होते.."  😁😁 सगळे खूप हसलो यावर.. 😃


शिक्षण-नोकरीसाठी घराबाहेर पडल्यावर खूप प्रॉब्लेम झाले. काहीतरी थातूर मातूर पदार्थ बनवायचे. मामा मावश्या आईला बोलायच्या, लेकीला काहीही नाही शिकवलंस, नुसतं लाडावून ठेवलंय. 

मग आई बोलायची - "वेळ आली की बरोबर जमेल."


स्वतःच घर घेतलं मग तर रोज One pot meal ठरलेलं, रविवारी एखादा नवीन पदार्थ try करायचे. माझ्या हाताला चव आहे हे आई च्या लक्षात आलं होतं एव्हाना तशी आई बोलली बहिणीला - "पाहिलं.., शिकली ना जेवण करायला, मी हात धरून तर नाही ना शिकवलंय. जे माझ्याकडे आहे ते तिच्याकडे आपसूक येणार..."...


Work From Home मुळे सध्या घरुनही १५ तास सतत कामच चालू असत. विचार केला की जेवण तर आपण रोज बनवतोच मग ही वेगवेगळे पदार्थ बनवायला काय हरकत आहे 🤔

तेवढे नवनवीन पदार्थ शिकता येतील आणि चाखता सुद्धा येतील. Good deal yeh! 😎  

आता खूप मजा येतेय खरं. मी कधीच विचार केला नव्हता की मी एवढे पदार्थ बनवेन कधी. 🤗


माझी बहिण टेन्शन मध्ये आली - "Profession वगैरे change करण्याचा तर विचार नाहीये ना तुझा??! हवं तर Youtube channel open करतेस का??!!" 😆

माझं एकच उत्तर - "घाबरू नको. 🤓 माझ्या असंख्य छंदांमध्ये अजून एक भर पडली आहे आता - Cooking 👩‍🍳"

...

आज आई - बाबा दोघेही नाहीयेत. 

जर.. आज आई - बाबा असते तर.. माझी स्वयंपाक घरातली एवढी प्रगती बघून मस्त वाटलं असतं त्यांना...

कसं ना, सगळं आयुष्य जर.. तर.. मध्येच अडकलेलं असत...

.

.

.

असो खूप लांबलं.. एकदा लिहायला घेतलं की थांबवता येत नाही मला.. 


गेल्या काही दिवसांत बनवलेले काही पदार्थ 😇🤤👇


🔻केशर - ड्रायफ्रुटस - मँगो आईस्क्रीम (Kesar-Dry fruits -Mango Ice-Cream recipe in marathi)



बाहेर रणरणतं ऊन मी म्हणत असताना थंडगार आईस्क्रीम खायची इच्छा नाही झाली तर नवलच. त्यात आंब्यांचा season मग घरात असलेले आंबे वापरून, केशर - ड्रायफ्रुटस चा मारा करून (मला कोणत्याही गोड पदार्थात ड्रायफ्रुटस घातल्याशिवाय चैन नाही पडत ;) ) आईस्क्रीम बनवलेलं आहे :)

https://cookpad.com/in-mr/recipes/14974627-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-kesar-dry-fruits-mango-ice-cream-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes


🔻वाटपाचे कोकम सार


सोलकढी पेक्षाहि मला हे वाटपाचे कोकम सार खूप आवडीचं. मी होस्टेलहून घरी आले कि आई खास माझ्यासाठी करायची. मग जे काही २-३ दिवस मी घरी असेन तेवढे दिवस सकाळ-संध्याकाळ पदार्थांची रेलचेल असायची. मग बाबा आणि बहीण बोलायचे - "सुप्रिया घरी आली कि एवढे पदार्थ आम्हाला वासाला तरी मिळतात" :D त्यावर आई चिडून बोलायची - "हो ना, जसं काय तुम्हाला उपाशीच ठेवतेय :-P ती नावं न ठेवता आवडीने खाते, तिथे हॉस्टेल ला काय मिळणार एवढं सगळं, म्हणून तिच्यासाठी बनवते :-* "

आता मी गावी गेले कि माझी काकी माझासाठी असं सार बनवते - बस्स मला आवडतं म्हणून :)

Mother's Day Special - आई ची आठवण म्ह्णून मी पहिल्यांदा असं सार बनवलं, काकी ला विचारून... आई बनवायची किंवा काकी बनवते तशी चव तर आलेली होती :)

https://cookpad.com/in-mr/recipes/14991969-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0?ref=you_tab_my_recipes


🔻रस्सा सांडगे

https://cookpad.com/in-mr/recipes/14992714-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87-rassa-sandge-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes


🔻Coffee Oreo Chocolate Icecream ~


यावेळी मी बाइंडिंग मटेरियल म्हणून कॉर्न फ्लोर / तांदळाचं पीठ / फ्रेश क्रीम यातील कशाचाच वापर केलेला नव्हता. तरीही मस्त real milk icecream तयार झालं :)

https://cookpad.com/in-mr/recipes/15004969-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%9A%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-coffee-oreo-chocolate-icecream-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes


 🔻चिकन करी ~

One pot meal हा घराबाहेर राहणाऱ्यांचा जवळचा विषय आहे :D मी तर हमखास प्रेशर कुकर मधल्या रेसिपी करत असते. पण शाकाहारी. म्हटलं यावेळी मांसाहारी try करू.

मला चिकन - मासे विकत घेता येत नाहीत. म्हणजे कळत नाही. आपली फसवणूक होईल का याची भीती वाटते त्यामुळे घरी कधी चिकन - मासे पदार्थ बनवले नाहीत. बाबा चिकन आणायचे आणि आई बनवायची. एकदा आई बाबा असतानाच काय ती चिकन बिर्याणी बनवली होती. बाबा गेले आणि आम्ही चिकन खायचं बंद केलं. नंतर माझ्या आजारपणामुळे मांसाहार च पूर्ण वर्ज्य झाला. आजारपणातून बाहेर पडले, डॉक्टर बोलले - 'आता मांसाहार सुरु करायला हरकत नाही'. पण तोपर्यंत मला खाऊ घालणारी निघून गेली होती. :(

स्मिता आत्ये बोलली - 'एक मासेवाली आणि चिकन शॉप वाला ओळख करून ठेव तुझ्या एरिया मध्ये, त्यासाठी नेहमी एकाच व्यक्तीकडून खरेदी करायची. एकदा गिर्हाईकावर विश्वास बसला कि ती लोकं फसवत नाही.'

पटलं ते, पण तरी मी काही स्वतःहून घ्यायला गेले नाही आजतागायत.

ऑनलाईन RealGood Chicken ऑर्डर केलं शेवटी, बघू किती वर्षांनंतर स्वतःच्या हिमतीवर बनवायचं आहे. जमलं तर ठीक नाहीतर अंडी जिंदाबाद :D

बऱ्याच रेसिपी मध्ये  चिकन बनवताना दही - तुपाचा वापर दिलेला असतो. पण आमच्याकडे मांसाहारा सोबत दुधाचे पदार्थ नाही वापरत. आई ने कधीच दही तूप चिकन - मटण सोबत वापरलं नाही. त्यामुळे ती सवयच लागली. आज मी चिकन बनवताना मॅरिनेशन साठी दह्या ऐवजी लिंबाचा रस वापरला. जशी आईची style आठवत होती तसं बनवलं. :) जमलं :) बहिणीला सुद्धा आवडलं. आता पुन्हा चिकन बनवायचा कॉन्फिडन्स आलाय :D 

https://cookpad.com/in-mr/recipes/15004238-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80?ref=you_tab_my_recipes


🔻'धोंडस' ~ यालाच गोव्यात तवसाळे आणि इतर ठिकाणी काकडीचा केक म्हणतात :)

पावसाळ्यात मोठी हिरवी काकडी मिळते, तवशी म्हणतात त्यांना कोकणात. त्यांचं धोंडस बनवलं जात. ती काकडी नसेल तर नेहमी बाजारात मिळणाऱ्या काकडीचा सुद्धा बनवू शकतो.

https://cookpad.com/in-mr/recipes/15017719-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B8?ref=you_tab_my_recipes


🔻शरबत - ए - आझम / मोहब्बत का शरबत




जुन्या दिल्ली च्या जामा मस्जिद च्या गल्लीत नवाब कुरेशी नामक व्यक्ती (प्यार मोहब्बत शरबत वाला) बरीच वर्षं एक उन्हाळी पेय विकत असल्याचं वाचलं. 

म्हटलं चला आपण सुद्धा try करू 😊

https://cookpad.com/in-mr/recipes/15018213-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%8F-%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%A4?ref=you_tab_my_recipes


🔻पायसम / फिरणी

गदिमा आणि सुधीर फडकेंचं गीत रामायण सगळ्यांना आठवत असेलच. रामकथेतलं पायस दान जे यज्ञामध्ये दशरथाला पुत्रप्राप्तीसाठी यज्ञातून मिळत. यावरून हे पायस किती पौष्टिक असेल हे सुज्ञानी समजून जावे. पायस / पायसम हेच रमजान ईद ला फिरणी म्हणून आपल्यासमोर येते. हे पायसम म्हणजे तांदूळ दुधात शिजवलेली खीर. हे मिष्टान्न मी बनवलं होतं घरी 😊👍

https://cookpad.com/in-mr/recipes/15018309-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80?ref=you_tab_my_recipes


🔻तवा रवा फ्राय चिकन लॉलीपॉप


https://cookpad.com/in-mr/recipes/15026386-%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%AA-tava-rava-fry-chicken-lollipop-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes


🔻Chilly Garlic घावणे सोबतीला कोलीम भुर्जी आणि Red-Yellow Bell Peppers Salad

https://cookpad.com/in-mr/recipes/15034265-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A3-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87-mirchi-lasun-ghavne-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes


🔻रवा बटाटा pancake

https://cookpad.com/in-mr/recipes/15045658-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-pancake?ref=you_tab_my_recipes


🔻वाटली डाळ - गूळ घालून गव्हाची पोळी

एवढा कामाचा ताण होता त्यात चुकून चणा डाळ कुकर ला लावली. कुकर उघडून बघितला म्हंटल डाळ एवढी मोठी का वाटते, अजून २ शिट्या काढू, बसले पुन्हा कामाला. मग एकदम tube पेटली आपण चुकीची डाळ नाही का धुवून भिजत घातली. बोंबला. आता करायचं काय याचं, तर जुगाड म्हणून केलेला हा "वाटली डाळ - गूळ घालून गव्हाची पोळी" प्रयोग :)

https://cookpad.com/in-mr/recipes/15046761-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80?ref=you_tab_my_recipes


🔻रताळ्याची रबडी


एकादशीला रताळ्याचे पदार्थ नाही केले कि मला चुकचुकल्यासारखं वाटतं :D म्हणून आज स्पेशल - रताळ्याची रबडी :)

https://cookpad.com/in-mr/recipes/15047055-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80?ref=you_tab_my_recipes

~ सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर