Lockdown मध्ये अनुभवलेला निसर्ग १

Lockdown मध्ये अनुभवलेला निसर्ग १

दररोज चालायची सवय लावून घेतली आहे. जमतील तेवढे सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा, थोडे stretching exercises आणि 1 तास walk. बस्स शरीराला थोडी शिस्त लावण्याचा उद्देश. तेवढाच आजूबाजूचा निसर्ग थोडा थोडा जवळून पाहता येतो. काही फोटो काढले आहेत. विचार केला आजच्या पर्यावरण दिनानिमित्त पोस्ट करावेत 😊🌱

पावसाळ्याधीची शेतीची कामं सुरू झाली आहेत. 🌱🌾

 🌅 नेहमीचाच सूर्य पण नेहमी वेगळा भासतो 😇

अत्यंत वेड्यासारखं पसरत जाणारं Water hyacinth, Eichhornia crassipes (Mart) Solms, originating in the amazonian basin, is a warm water aquatic plant. The dense weed of water hyacinth forms dense monocultures that can threaten local native species diversity and change the physical and chemical aquatic environment, thus altering ecosystem structure and function by disrupting food chains and nutrient cycling.

आकाशी झेप घेरे पाखरा 😍

#saltland भरती होती त्यामुळे मिठागरं पाण्याखाली गेली आहेत. कधी ओहोटी असताना परत एकदा फोटो काढेन...


🐟आमच्या बिल्डिंग च्या बाजूचा नाला cum ओढा. अतिक्रमणामुळे त्याची अशी परिस्थिती आहे, असो. मासे पकडायला रापण लावली आहे. रोज जाळी ऍडजस्ट करायला त्या पाण्यात एक बुडालेला माणूस दिसतो. आज कदाचित मी लवकर बाहेर पडले होते किंवा तो तर उशिरा येणार असेल 😄

🎨पालघर हा आदिवासी घोषित जिल्हा आहे. इथे मुख्यत्त्वे वारली समाज वावरताना दिसतो. 

इथल्या जवळच्या शाळेच्या भिंतींवर हे छान painting दिसलं म्ह्णून टिपलं 😊📸

इथे राहायला आल्यापासून त्यांच्या वारली painting च एवढं वेड लागलंय मला, सध्या तिसरं वारली wall painting  चालू आहे माझं घरात. 😁🎨


लक्षवेधी पोपटी रंग 💚🌳

वड-पिंपळ मला एखाद्या पुराणपुरुषाप्रमाणे भासतात. आता मांडी घालून समोर बसलं तर एखादी गोष्ट सांगायला सुरुवात करतील.. 👨🏼‍🦳

There's a sunrise and a sunset every single day, and they're absolutely free. Don't miss so many of them. 🌄🌅

I am a cat person actually, but this little guy manage to seek my attention with his chubby looks 🐶



संजय गांधी नॅशनल पार्क ते तुंगारेश्वर नॅशनल पार्क ला जाणाऱ्या काही पर्वत रांगा ⛰️



मान्सून च्या आगमनाची चाहूल 😍🌥️🌦️☔



~ सुप्रिया घुडे
५-जुन-२०२१

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर