बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग २
याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 भाग १ https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग २ (क्रमशः) ट्रेन Booking केलं खरं परंतु नेहमीप्रमाणे निघायच्या आदल्या रात्रीपर्यंत ट्रिप कॅन्सल व्हायच्या मार्गावर होती. आमच्या प्रत्येक ट्रिप ला कोणती न कोणती आडकाठी असतेच 😖 काहीही कारणं निघू शकतात. जसं मागच्या सोलापूर ट्रिप ला आमची ट्रेन च कॅन्सल झाली होती 😔😓😟😞 राहण्याची व्यवस्था : बंगळुरू ला पोहोचल्यावर १ दिवस / रात्र तिथे स्टे करायचा आणि बाकी २ रात्री म्हैसूरू ला राहायचं ठरलं. Online booking करून ठेवणं गरजेचं होतं, तिथे जाऊन lodge शोधायला वेळ ही नसणार होता आमच्याकडे. परंतु अनोळखी ठिकाणी डायरेक्ट राहायला जायचं म्हटलं की तिथला एरिया कसा असेल याची काहीच कल्पना नसते आपल्याला. असो जे मिळेल lodge तो बघू, काही पर्याय नव्हता. MakeMyTrip वरून काकांनी बंगळुरू मधील Hotel Sapphire च बुकिंग केलं. आणि म्हैसूरू मधील Hotel Garden City ( https://www.google.com/travel/hotels/s/iLePV6VZ9NKpS4Aq7 ) च बुकिंग...