बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग २
याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग २
(क्रमशः)
ट्रेन Booking केलं खरं परंतु नेहमीप्रमाणे निघायच्या आदल्या रात्रीपर्यंत ट्रिप कॅन्सल व्हायच्या मार्गावर होती. आमच्या प्रत्येक ट्रिप ला कोणती न कोणती आडकाठी असतेच 😖 काहीही कारणं निघू शकतात. जसं मागच्या सोलापूर ट्रिप ला आमची ट्रेन च कॅन्सल झाली होती 😔😓😟😞
राहण्याची व्यवस्था :
बंगळुरू ला पोहोचल्यावर १ दिवस / रात्र तिथे स्टे करायचा आणि बाकी २ रात्री म्हैसूरू ला राहायचं ठरलं. Online booking करून ठेवणं गरजेचं होतं, तिथे जाऊन lodge शोधायला वेळ ही नसणार होता आमच्याकडे. परंतु अनोळखी ठिकाणी डायरेक्ट राहायला जायचं म्हटलं की तिथला एरिया कसा असेल याची काहीच कल्पना नसते आपल्याला. असो जे मिळेल lodge तो बघू, काही पर्याय नव्हता.
MakeMyTrip वरून काकांनी बंगळुरू मधील Hotel Sapphire च बुकिंग केलं.
आणि म्हैसूरू मधील Hotel Garden City (https://www.google.com/travel/hotels/s/iLePV6VZ9NKpS4Aq7) च बुकिंग केलं. Google वर गार्डन सिटी चे फोटो अगदी प्रसन्न वाटत होते आणि location सुद्धा चांगली वाटली. तेवढ्या आत्ये ची नजर
Hotel Sapphire च्या location वर गेली, आणि या हॉटेल पेक्षा दुसरं कोणतं lodge बघूया असा सर्वानुमते ठराव झाला. Hotel Garden City च्याच owner ला आत्ये ने डायरेक्ट कॉल करून बंगळुरू मधलं चांगलं lodge सुचवण्याची विनंती केली आणि त्यांनी आम्हाला Sri Vijaya Palace (https://g.co/kgs/n3PFAC) सुचवलं. मग Sapphire च बुकिंग कॅन्सल करून Sri Vijaya Palace च lodging आम्ही फायनल केलं 😊
एवढे उद्योग करूनही शेवटी तिथे पोहोचल्यावर च कळणार होतं की दोन्ही lodge कसे आहेत 🤞
सुट्टी :
सुजल आणि माझी सुट्टी शेवटपर्यंत approve झालेली नव्हती. त्यात किर्ती चा तर वेगळाच प्रॉब्लेम. नेमके त्यांचे commissioner 4th week मध्ये येणार होते आणि आमची ट्रिप 3rd week ला प्लॅन केलेली होती. कामं complete होणार नाही म्हणून किर्ती ची सुट्टी आमची ट्रिप निघायच्या आदल्या दिवशी कॅन्सल झाली 😳
मी तर माझ्या ऑफिस मध्ये सांगायच्या तयारीत होते की माझी trip कॅन्सल झाली म्हणून, leave application revoke करते 😔 सर काकांचा खूपच मूड ऑफ झाला 😕
मी लगेच पुढच्या कोणत्या dates ट्रिप साठी मिळतील आणि ट्रिप arrange करता येईल यासाठी कॅलेंडर ही हातात घेऊन बसले😐
तेवढ्यात किर्ती च्या मदतीला तिच्याच ऑफिस मधले एक व्यक्ती जे बाबांचे सहकर्मचारी होते, ते धावून आले. (अनुकंपे पोटी बाबांच्या च department ला किर्ती ची नियुक्ती झालेली आहे.) ते तिच्या वरिष्ठांशी बोलले आणि सुट्टी मंजूर झाली 🤩
बाबांची पुण्याई 😶 हो बाबांची च पुण्याई 🙏
बरीच वर्षे झाली त्या गोष्टीला.. बाबांचे "ते" सहकर्मचारी काका नुकतेच डिपार्टमेंट ला नवीनच रुजू झाले होते. आणि नेमकं त्यांना कोकणातलं हवामान मानवल नसेल की काय ते खूप आजारी पडले. Bachlor व्यक्ती, नवीन जागा, नोकरी आणि जातिव्यवस्था मानणारे ईतर सहकर्मचारी त्यामुळे त्यांची काळजी घेणारं कोणी नव्हतं. माझे बाबा जात पात मानण्याच्या पलीकडे होते. तेव्हा आमच्या आई बाबांनी त्यांना खूप मदत केली होती. आजही "ते" काका आवर्जून सांगतात - घुडे साहेबांनी मला मदत केली 🙏
त्यामुळे सुट्टी कॅन्सल व्हायच्या बेतात असताना "ते" काका दत्त म्हणून उभे ठाकले आणि त्यांनी वरिष्ठांना समजावलं 🤩😍
Packing :
Private गाडी करून नाही जायचं म्हटल्यावर आपोआप आमच्या समानावर बंधनं आली 😕 दक्षिणेकडे थंडी असेल म्हणून आधी आम्ही रग, बुरणुस सुद्धा बांधून नेणार होतो. आता तर आम्ही 2 दिवस एकाच ड्रेस repeat करायला तयार होतो 😂 तसं काही केलं नाही म्हणा, एकाच ड्रेसवर सगळे फोटो येतात ना 😝😃 नव नवीन ड्रेस दिसणार कसे 😋 तरी माणशी २ बॅग झाल्या 👛👜👝🛍️🎒
(क्रमशः)
~ सुप्रिया घुडे
यापुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
Comments
Post a Comment