बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग १
बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग १
ऑगस्ट २०२२ मधली सोलापूर ट्रिप यशस्वी झाल्यानंतर आम्हाला पुढच्या ट्रिप चे वेध लागले. खरं सांगायचं तर एक ट्रिप चालू असतानाच आम्ही पुढच्या ट्रिप च प्लांनिंग करायला सुरुवात करतो 😁
पुढची ट्रिप बंगळुरू करायची ठरवली. डिसेंबर महिना नक्की केला. यावेळी आपले काही सण नसतात त्यामुळे घरी काही कामं नसल्याने भटकायला बाहेर पडू शकतो 😃
सोलापूर ट्रिप ला जसे कुडाळ हुन च Ertiga घेऊन निघालो होतो तसच एखादी गाडी घेऊन निघायचं बंगळुरू ला असं ठरलं सुरुवातीला. बंगळुरू ला जायचं म्हणजे ७ दिवसांची तरी ट्रिप होईलच अर्थात समान जास्त असणार. म्हणून मोठी गाडी करून निघायचं ठरवलं.
बंगळुरू जातोच आहोत तर म्हैसूरू सुद्धा बघून येऊ असं ठरलं. ऑक्टोबर मध्ये आमची trip प्लांनिंग ची पहिली बैठक झाली.
त्यात बंगळुरू-म्हैसूरू-चिकमंगळुरू-बदामी-हंपी या ठिकाणचे जवळपास ४०+ जागा बघायचा ठरल्या.
आणि ही सर्व ठिकाणं पाहायला ७ दिवस तर नक्कीच पुरणार नाहीत एवढं लक्षात आलं. मग आता काय करायचं ..
बंगळुरू-म्हैसूरू-चिकमंगळुरू-बदामी-हंपी ही ट्रिप आपण २ वेगवेगळ्या ट्रिप मध्ये divide करायचं ठरवलं. सर काकांना बऱ्याच वर्षांपासून बंगळुरू-म्हैसूरू ट्रिप करायची होती. अगदी बाबा / अजित काका असतानाही बऱ्याच वेळा ठरवता - ठरवता ही ट्रिप राहूनच गेली होती. So आम्ही ठरवलं, महाराष्ट्र बाहेरच्या ट्रिप ची सुरुवात बंगळुरू-म्हैसूरू नेच करू.
Destination तर फायनल झालं. आता प्रवासासाठी गाडी फायनल करायची होती. कुडाळ-बंगळुरू-म्हैसूरू-कुडाळ अशा राऊंड ट्रिप चा खर्च काढला. सामान जास्तच असेल असं गृहीत धरून ertiga पेक्षा मोठीच गाडी असावी त्याप्रमाणे शोधमोहीम आणि cost estimation सुरू झालं. ४० हजार फक्त प्रवासाचा खर्च निघाला 😐 टोल, stay, food, shopping etc ते सगळं वेगळंच.
राजू काकांनी सुद्धा by road गेलात तर कोणत्या route ने कसं जायचं याची माहिती दिली. By road जायला तशी काही हरकत नव्हती परंतु आत्ये-काकी-मी आम्ही real traveller आहोत 😆 अशा प्रवासात एकदाही प्रवासाचा त्रास झाला नाही 🤮 तर आमची ट्रिप पूर्ण होत नाही 🤢🤕😷
त्यात बऱ्याच जणांनी ऊटी-कुर्ग ही २ ठिकाणं आमच्या ट्रिप मध्ये घुसवण्याचा सल्ला दिला. परंतु विषय असा आहे की आम्हाला specially सर काकांना सर्दीचा खूप त्रास होतो त्यामुळे थंड हवेची ठिकाणं आमच्या ट्रिप मधून बाहेरच निघतात. आणि थंड हवेच्या ठिकाणांपेक्षा आम्हाला historical / archeological reserved places मध्ये जास्त interest आहे आणि आम्ही त्यासाठीच भटकायला निघतो. त्यामुळे ऊटी-कुर्ग आपोआप आमच्या ट्रिप मधून वगळले गेले 🥶
नोव्हेंबर उजाडला. जायचं कसं काहीच नक्की होत नव्हतं. डिसेंबर 3rd week आम्हा तिघीना ऑफिस मधून सुट्टी काढायला जमलं असतं. ट्रेन ची तिकीट काढायची तर लवकरच ठरवायला हवं होतं, नाहीतर या वेळी सुद्धा आमची बंगळुरू-म्हैसूरू ट्रिप बारगळली असती. 😢
अनाठायी खर्चापायी गाडीने जायचं जवळपास कॅन्सल च झालं होतं. दादा आणि त्याची फॅमिली या आधी बंगळुरू ला जाऊन आली होती, त्यामुळे त्याने सुचवलं ट्रेन नेच जा.
बऱ्याच वेळा जेव्हा निर्णय घेणं अशक्य होतं, तेव्हा कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने interfere करणं गरजेचं होऊन जातं, बाकी काही नाही, atleast आपला निर्णय फायनल होतो 😁
झालं, १३ नोव्हेंबर ला रात्री आम्ही १३ डिसेंबर ला निघायची आणि परतीची टिकेट्स बुक केली आणि आमच्या ट्रिप चा पहिला महत्वाचा टप्पा पार पडला 🤩
(क्रमशः)
~ सुप्रिया घुडे
यापुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
भाग २ https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post_31.html
भाग ३ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html
भाग ३ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html
भाग ४ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_8.html
भाग ५ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_9.html
भाग ५ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_9.html
Comments
Post a Comment