Posts

Showing posts from 2025

पंचतारांकित

Image
#२०१९ कधी नव्हे ते आज return ट्रेन मिळाली. मस्त window seat, अजून काय हवं. आज बसून पुस्तक वाचायला मिळणार 🤓 पण एवढं कुठलं नशीब चांगलं. पुढच्या स्टेशन ला एक पोरगी येऊन बसली. एवढ्या मोठ्याने boyfriendशी फोनवर बोलत होती की थोड्या वेळात त्यांच्या दोघांमधले प्रॉब्लेम solve करायला बसू शकले असते मी, एवढी इत्यंभूत माहिती मिळाली मला. 🤦  तिचा एवढा loudspeaker कानाशी चालू असताना मला पंचतारांकित (📖) बाजूला ठेवून डोकं टेकावं लागलं. मला headphones वापरायची सवय नाहीये, आणि त्यात पुढचा अजून एक तास अजिबात मला तिचे आणि तिच्या bf चे प्रॉब्लेम्स ऐकायचे नव्हते.  तेवढयात एक आयडिया ची कल्पना आली डोक्यात 💡 एका friend ला message type केला, मला कळलं की ती माझ्याच मोबाईल मध्ये बघतेय 😁 message sent झाल्यावर पुन्हा डोकं टेकवून मी गप्प बसले, आणि तो msg अगदी पथ्यावर पडला 😆 आपोआप आवाज कमी झाला. शेवटचं बोलणं ऐकलं - "अरे ती शेजारी बसली आहे ना तिला आपल्या बोलण्याचा त्रास होतोय, कोणालातरी msg केला तिने.. पुस्तक वाचतेय ना.."  😁 तिच्या bf ने अखंड शिव्यांची लाखोली वाहिली असेल मला. 😅 anyways who cares.....

18 to 25 Nov 2023 Delhi-Agra-Mathura trip

Image
 🤩यह दिल्ली है मेरे यार.. बस इश्क़ मोहब्बत प्यार 🤩 18 to 25 Nov 2023 मध्ये आमची Delhi-Agra-Mathura trip ठरली. आणि नेमक तिथे पोहोचल्यावर आमच्या लक्षात आलं की इंडियन गवर्नमेंट कडून हाच आठवडा वर्ल्ड हेरिटेज वीक म्हणून declare करण्यात येतो. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून संरक्षित केलेले monument पाहायला जास्तच मजा वाटली. ३ महिने अगोदरच विमानाची बुकिंग केली असल्याने तिकीट दर स्वस्त पडला अनायासे total Trip cost इथेच कमी झाली. नेहमीप्रमाणे ही ट्रिप सुद्धा अगदी शेवटच्या घटकेपर्यंत कॅन्सल च व्हायची होती. अपूर्वा काकी,सुजल, किर्ती या ट्रिप मधून कॅन्सल झाल्या त्यामुळे माझे आधारस्तंभ सुटले. आता मला ३ व्यक्तींना सांभाळून न्यायची जबदारी होती - सर काका, रजू आत्ये आणि स्मिता आत्ये. दिल्ली च्या प्रदूषणाबद्दल आणि थंडी बद्दल एवढ ऐकून होतो की झेपेल की नाही ही ट्रिप इथपासून सुरुवात होती. त्यातकरून माझ्या ऑफिस colleague नि दिल्ली च्या हरयाणवी लोकांच्या attitude बद्दल एवढी मनात भीती भरली की मी जवळपास ट्रिप cancel करण्याच्याच मार्गावर होते. तेवढ्यात एके रात्री कॉल वर सत्येन (दादा)ने एवढ...

(मूक) साक्षीदार

Image
 (मूक) साक्षीदार  सकाळी देव पूजा करत असताना अचानक safety door वर जोरात थाप पडली - "मावशी, पटकन दरवाजा उघडता का?!!" दारात माझ्या २ छोट्या शेजारणी उभ्या होत्या 👯 मोठी च्या हातात फुटाणे ची पिशवी आणि लाहानीच्या हातात bun मस्का.. अर्धवट खात या दोघी बहिणी दारात उभ्या... "Please आमच्या आई ला कॉल लावून देता का?" यांच्या आईच्या ऑफीस ला शनिवारी सुट्टी नसते. Generally अर्जंट काही आईसोबत बोलायचं असेल तर या दोघी माझ्या दारात उभ्या राहतात नेहमी अशाच 😃 मी नेहमीप्रमाणे त्यांच्या आई ला कॉल लावला, mobile speaker वर ठेवून दिला. रिंग जातेय तोपर्यंत मोठी ने मला तिच्या हातातले फुटाणे खायला ऑफर केले.. so sweet 🥰 मी - "नको, तू खा. माझी देवपूजा अर्धवट राहिली आहे". छोटी ला गालाला हात लावून hi केलं 🙋🏻 तिचा बाई मान जातो 🤥 मागच्या वेळी अशाच दोघी common passage मध्ये खेळत होत्या तेव्हा मी मोठीच्या गालाला हात लावला आणि चालत लिफ्ट कडे गेले. तर ही छोटी लगेच बोलते कशी - "मला नाही हात लावला तिने 😤" आणि गाल फुगवून बसली.. माझ्या तर अस काही डोक्यातही नव्हत 🥺 लिफ्ट सोडून मी पर...

विश्वास

 विश्वास आज दुपारी ऑफीस ला जाताना local मधून उतरून मेट्रो मध्ये बसले. Late निघाल्यामुळे बसायला जागा मिळाली. थोड्या वेळात शेजारी एक बाई आपल्या लहान मुलाला घेवुन बसली. खूप गोड, छोटंसं, आताच मान सावरायला लागलेलं बाळ होतं.  मी शक्यतो प्रवासात अनोळखी लहान मुलांचे लाड करायचे टाळते.. for some security reasons.. बाजूला बसल्यावर बाळाने लगेच माझा दंड धरला.. चौहुबजूने उत्सुकतेने बघत होत. त्याच्या आई ला कळलं बाळाने माझा हात धरून ठेवलाय.. मग ते बाळ सगळीकडे नजर टाकून त्याच्या आई कडे पहायचं, मग माझ्याकडे बघून दात नसलेल्या हिरड्या दख्वत हसायचं 😘 मग माझा हात हातात घेतला आणि माझ्या बोटांशी खेळायला लागला.. wow त्याच्या नाजूक बोटांचा स्पर्श 😘😍माझं अर्ध बोट म्हणजे त्याचं एक बोट असेल 😙इवलुशी बोटं.. इवलस बाळ  😙 तो मऊ, लुसलुशीत स्वर्गीय स्पर्श... 💓बास्स मी अनुभवत होते.... 💖 माझी उतरायची वेळ आली पण त्याची पकड काही सुटेना 😢मनाविरुद्धच पकड सोडवली मग ते अजूनच हसत जवळ यायला लागलं 😭 त्याच्या हाताची kissi घेवून उठले मी तिथून...  Door जवळ जाताना लक्षात आलं, मी उठले म्हणजे माझ्या जागी दुसरी...